Home Tags व्यक्ती

Tag: व्यक्ती

किरणची कविता पोचली जगामध्ये (Kiran’s Poetry Brings Funds to the Village)

किरण भावसार हे वडांगळी, तालुका सिन्नर येथील रहिवासी आहेत. ते कवी-ललित लेखक आहेत. त्यांच्या 'शनिखालची चिंच' या ललित लेखाने चमत्कार घडवून आणला. ई-साहित्य प्रतिष्ठानने त्यांचे त्याच नावाचे पुस्तक प्रकाशित केले. ते इंग्लंडमधील सुधीर बर्वे यांनी वाचले...

अर्चना आंबेरकरची ग्लोबल भाषा (Archana Amberkar’s Global Language)

भाषाशास्त्राची अभ्यासक अर्चना आंबेरकर दोन-अडीच वर्षांपूर्वी मला भेटली, ती तिला इंटरनेटवरील मराठी भाषेतील 'डेटा' हवा होता म्हणून. आम्ही 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलवर मराठी भाषा-संस्कृतीबाबत अडीच-तीन हजार लेख संकलित केले आहेत. अजून खूप मोठे काम बाकी आहे.

कोरोना काळातील संयम व शिस्त (Can Corona Benefits Be Maintained?)

रेखा नार्वेकर हे नाव मुंबई-कोकण परिसरात तरी, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सर्वपरिचयाचे आहे. लेखिका-कवयित्री-ज्ञानेश्वरीच्या रसाळ प्रवचनकर्त्या आणि साहित्यिक समारंभातील जिव्हाळ्याचा वावर...सदैव हसतमुख आणि प्रसन्न चेहरा. त्या शिकल्या विज्ञानशाखेत, पण त्यांनी कास धरली साहित्यकलेची. त्यांनी हौसेने कथा, ललित गद्य लिहिले, कविता केल्या. त्यांच्या त्या साहित्याचे संग्रह प्रसिद्ध आहेत...

संदीप – निराधारांचा आधार (Sandip’s Home for Destitutes)

इतिहास-पुराणकथांत वर्णन केलेली माणसे असतात तशी माणसे सभोवताली दिसली, की प्रत्येक वेळी अचंबित व्हायला होते. कुडाळच्या संदीप परबची गोष्ट तशीच आहे. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट त्याचा गुणसमुच्चय वाढवतच गेलेली आहे. तो शालेय वयात असताना त्याने शेजारच्या बालविधवेची पीडा जाणली. ती माहेरी आलेली होती.

थोरोच्या गावात रजनी देवधर (Rajani Deodhar in Thoreau’s Village)

मी लॉकडाऊन काळातील धावत्या नोंदींमध्ये लिहित असलेल्या काही लेखांबाबत विशेष औत्सुक्य येणाऱ्या प्रतिसादावरून जाणवते. ते प्रल्हाद जाधव याच्या 'थोरो-दुर्गा भागवत भेटी'च्या कल्पनेबाबत तसेच घडले. त्यावर प्रतिक्रिया वेगवेगळ्या स्तरांतून वेगवेगळ्या प्रकारच्या आल्या.

अपर्णा-विदुर महाजन यांचा ध्यास (Vidur-Aparna Mahajan: Art Loving Couple)

तळेगावचे विदुर आणि अपर्णा महाजन हे जोडपे प्रेमळ आणि लाघवी आहे. ती दोघे विचाराने आणि वृत्तीने वेगवेगळी व स्वतंत्र आहेत, पण परस्परांना पूरक आहेत. विदुर सतारवादक-अभ्यासक-संशोधक-प्रचारक आणि अपर्णा तळेगाव जवळच्या चाकण येथे कला व वाणिज्य महाविद्यालयात इंग्रजी विषयाची प्राध्यापक व प्रमुख आहे.

थोरो, दुर्गा भागवत आणि प्रल्हाद (Thoreau, Durga Bhagwat And Pralhad Jadhav)

दोनशे वर्षांपूर्वीचा अमेरिकन हेन्री डेव्हिड थोरो, शंभर वर्षांपूर्वीच्या दुर्गा भागवत आणि आजचा प्रल्हाद जाधव यांच्यात नाते काय आहे? थोरो हा जगद्विख्यात विचारवंत व ललित लेखक आहे. त्याने जगभर अनेक थोरामोठ्यांना प्रेरणा दिली आहे. त्यामध्ये महात्मा गांधी, मार्टिन ल्युथर किंग, टॉलस्टॉय इत्यादींचा समावेश होतो. त्याने सविनय कायदेभंगाचे तत्त्व प्रथम मांडले.

कोरोना – किती काळ? (Corona – How Long?)

कोरोनाहे एक अटळ वास्तव म्हणून लोकांनी आता स्वीकारले आहे. त्या संबंधातील चर्चा दोन मुद्द्यांभोवती फिरताना दिसते. म्हणजे आर्थिक मंदी, सामाजिक-सांस्कृतिक संभाव्य बदल हे प्रश्न भविष्यावर सोडून देऊन सध्या लोकांना त्रस्त करणार्‍या दोन गोष्टी कोणत्या?

शेखरचा शेतजीवनाचा आनंद ( Engineer Seeks Happiness in Farming)

शेखर भागवत मुंबईचा स्ट्रक्चरल इंजिनीयर शेखर भागवत हा हरहुन्नरी, निसर्गप्रेमी आहे. तो आयआयटीत शिकत असताना पक्षीनिरीक्षण, निसर्गात भटकंती यांचे वेड त्याला लागले. त्याने तेव्हाच ठरवले, की वयाच्या पन्नाशीच्या आसपास व्यवसाय-नोकरी सोडून छंद आणि हौशी जोपासत जगायचे.

जयंत खेर – वृद्धत्वी आनंद (Jayant Kher – Economist turned Painter)

'ग्रंथाली'मधून निर्माण झालेल्या आमच्या विशाल स्नेही मंडळात जयंत खेर हा वेगळा होता. तो स्टेट बँकेत उच्चाधिकारी होता. ती नोकरी सोडून तो खाजगी कंपनीत गेला. त्याचे वागणे-बोलणे शिस्तशीर, नेमस्त, तरी आग्रही असे.