Tag: वाचन
‘निबंधमाला’कार विष्णुशास्त्री चिपळूणकर : व्यक्तिवेध
विष्णुशास्त्री चिपळूणकर हे आधुनिक मराठी गद्याचे जनक आणि मराठी भाषेतील श्रेष्ठ ग्रंथकार होत. त्यांना ‘सामाजिक सुधारणेचा वाहता झरा’ ही उपमा दिली गेली. त्यांचे ‘निबंधमाला’ हे नियतकालिक फार गाजले. त्यांना अवघे बत्तीस वर्षांचे आयुष्य लाभले होते. तेवढ्या अल्प आयुष्यात त्यांनी साहित्य, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात दिलेले योगदान अजोड आहे...
मेधा पाटकर व जीवनशाळा
आदिवासी समाज हा शहरी समाजापासून दूर, आडरानात राहतो. त्यांच्याकडे नैसर्गिक संसाधने असतात. सरकारने आदिवासी भागांमध्ये शाळा काढल्या आहेत, पण तेथे मुले येत नव्हती. उलट, जीवनशाळांमध्ये मुले हौसेने येतात. त्या जीवनशाळांना मेधा पाटकर यांचे मार्गदर्शन लाभते...
गोष्ट फलटणमधील दीडशे गाव-ग्रंथालयांची (Rural School Libraries to Promote Reading)
गाव-ग्रंथालयांचा प्रयोग हे सिद्ध करू पाहत आहे, की लेखी मजकूर वाचणे आणि त्याचा अर्थ लावणे ही जादू मुलांना येऊ लागली, की मुले वाचनाला, पर्यायाने पुस्तकाला चिकटून राहतात. त्यांच्या हातात येणारी पुस्तके सुंदर चित्रांची, त्यांच्या भावविश्वातील विषयांची असतील तर पुस्तकांशी जोडली जातात. अन त्यांना मोकळ्या अभिव्यक्तीची संधी मिळाली, की ती कल्पनेत रमतात, व्यक्त होऊ लागतात आणि हीच किमया आहे, पुस्तकांच्या दीडशे गाव-ग्रंथालयांची…
‘मर्मभेद’ पुस्तक कोणाचे? .(Who is the author of the book, ‘Marmbhed’?)
‘मर्मभेद’ ही राजकारणाची कटकारस्थाने अशी कथा असलेली कादंबरी. ती मानवी प्रवृत्ती-विकृती, रूपकात्मक-प्रतीकात्मक अशा मांडणीतून उलघडत जाते. कथेची भाषाशैली संस्कृतप्रचुर, जड असली तरी तिच्या भावनानुसारी प्रवाहीपणामुळे वाचकाला संमोहित करत गुंतवून ठेवते...
अनंत भालेराव – लोकनेता संपादक
‘मराठवाडा’ वृत्तपत्र आणि संपादक अनंतराव यांची भाषा या दोन्हींचे ‘मराठवाडा’ या भूप्रदेशाच्या संस्कृतीशी अजोड नाते आहे. मराठवाड्यात सर्वसामान्य माणसे जी भाषा बोलत, जे वाक्प्रचार...
वाचन व विकासाच्या प्रसारक!
अहमदनगरच्या बेबीताई गायकवाड यांची व्यावसायिक ओळख भाजीविक्रेती अशी आहे. मात्र सामाजिक ओळख- ‘महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा संवर्धक पहिल्या पुरस्काराच्या (2015-16) मानकरी’! त्या गावातील साध्या,...
वाचन कसे आणि का शिकायचे?
मूल शाळेत येते पण शिकत नाही यास पालक निश्चितच जबाबदार नाहीत. शिक्षणव्यवस्थेने मुलांच्या शिकण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे शिक्षणव्यवस्था मुलांच्या शिकण्या-न शिकण्यास जबाबदार आहे....
आजची वाचनसंस्कृती
'साहित्य अकादमी'ला चौसष्ट वर्षें पूर्ण झाली (संस्थेची स्थापना 12 मार्च 1954). त्या निमित्ताने अकादमीने रामदास भटकळ यांचे 'आजची वाचनसंस्कृती' या विषयावर व्याख्यान आयोजित केले...
साहित्य सम्राट न.चिं. केळकर ग्रंथालय – सोमवार ग्रंथप्रेमाचा!
ग्रंथालयांचे, वाचनालयांचे अस्तित्व हे शहरात सांस्कृतिकपणा जिवंत असल्याचे लक्षण असते. त्यात ते ग्रंथालय दुर्मीळ संदर्भग्रंथांनी समृद्ध असेल तर मौल्यवान पाचू, माणके, हिरेच त्या शहराने...
‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजना आणि विनायक रानडे
नाशिकच्या ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’चे विनायक रानडे. ते प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि वाचनालय समितीचे अध्यक्ष आहेत. रानडे हा माणूसच अवलिया आहे. त्यांच्या कल्पनेतून साकारलेली ‘ग्रंथ तुमच्या दारी’...