Home Tags लेखसूची

Tag: लेखसूची

वागदरी येथील सूर्यनारायण मंदिर (Wagdari’s SuryaNarayan Temple)

वैशिष्ट्यपूर्ण सूर्यनारायण देवालय हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत असलेल्या वागदरी येथे पाहण्यास मिळते. ते वास्तवात आहे शिवमंदिर, पण उगवत्या सूर्याची किरणे मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या महादेवाच्या पिंडीवर पडत असल्यामुळे मंदिराचे सूर्यनारायण असे नाव पडले आहे. ते मंदिर वागदरीचे ग्रामदैवत श्री परमेश्वर मंदिराच्या खूप आधीपासून आहे. मंदिरात पुरातन शिवलिंग असून भलामोठा नंदी आहे.

दक्षिण कोरिया : कोरोनाची सतर्क हाताळणी (South Korea : Prompt Action Against Corona)

दक्षिण कोरिया हा पूर्व आशियातील छोटा देश. तो चीनच्या दक्षिणेला आहे. कोरियन  द्वीपकल्पाचे विभाजन दुसऱ्या महायुद्धानंतर, 1945 साली झाले. त्यातून दोन देश जन्माला आले -उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया. दक्षिण कोरिया हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला देश आहे. त्यांनी हिरवेगार डोंगर, चेरीच्या बागा, सागर किनारा व अनेक सुंदर बेटे ही नैसर्गिक संपत्ती खूप छान जोपासली. कोरियाची लोकसंख्या सव्वा पाच कोटी आहे. 

कोरोना : मलेशियात मॉल्स खुले, प्रवास खुला! (Corona in Malaysia Lockdown is Over)

मी मूळ मुलुंडची (मुंबई) आहे. माझा जन्म हुबळी येथे आणि संगोपन मुंबईमध्ये झाले. मी मुंबई विद्यापीठातून वाणिज्य पदवी मिळवली आहे. मी मुंबईच्या  लोअर परळमधील रिझलट्रिक्स पब्लिक्स इंडिया या कंपनीत काम करत होते.

कोरोना : सिंगापूर प्रशासनाचे तीन मंत्र (Corona : Strong Singapore Govt.)

सिंगापूरच्या प्रगतीला कोविद-19 ने खीळ घातली आहे. त्याचे व्यापार उद्योगावर फारच दूरगामी-निगेटिव्ह परिणाम होणार आहेत. सिंगापूर हे आशियामधील सर्वात प्रगत आर्थिक व्यवहाराचे केंद्र मानले जाते. सेवाक्षेत्रासाठी दिल्या जाणाऱ्या सोयींसाठी जगातील सर्व राष्ट्रांमध्ये सिंगापूरचा क्रमांक सर्वांत वरचा आहे.

कै. अरूण साधू स्मृती पाठ्यवृत्ती योजना 2020-21 (Arun Sadhu Memorial Fellowship 2020-21)

1
अरूण साधू स्मृती पाठ्यवृत्ती योजना' ह्यावर्षी अर्ज करण्याची अंतिम मुदत 18 ऑगस्ट 2020 आहे. प्रसिद्ध लेखक कै. अरुण साधू यांच्या स्मरणार्थ एका तरुण पत्रकाराला अभ्यासासाठी दीड लाख पर्यंतची पाठ्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी तरुण मराठी भाषिक पत्रकारांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.

वारीची परंपरा (Wari Tradition)

0
श्री ज्ञानेश्वर महाराज स्वत: ज्येष्ठ वद्य अष्टमीला ‘माझ्या जीवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी।।’ असे म्हणत पंढरपुरास साडेसातशे वर्षांपूर्वी प्रस्थान ठेवते झाले. तेथपासून वारीची परंपरा सुरू झाली असे मानले जाते.

पंढरीची वारी- मराठी संस्कृतीची आत्मखूण! (Pandharpur Wari – Marathi Cultural Symbol)

माऊलींच्या पालखीचा आळंदी ते पंढरपूर हा पायवारीचा सोहळा होणार नाही हे ऐकून एकीकडे गलबलून येत आहे, तर दुसरीकडे माऊलींच्या पादुका हेलिकॉप्टरने पंढरपुरास जाणार याचा आनंदही वाटत आहे. वारकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तो निर्णय योग्यच आहे.

प्रज्ञा गोखले- वारीच्या लयीत दंग! (Pradnya Gokhale – On Pandharichi Wari)

मुलुंडच्या (मुंबई) प्रज्ञा गोखले यांना विठ्ठलाचे आणि वारीचे जणू वेड लागले आहे!गोखले त्या भक्तिभावनेतच दंग असतात. त्यांनी 1992-93सालापासून नित्यनेमाने आषाढी वारी केली आहे.सध्या,त्या प्रकृतीमुळे प्रत्यक्ष वारी करत नाहीत, पण त्यांच्या कार्यक्रमांतून आणि सादरीकरणांतून त्या त्यांच्या मनातील विठुमाऊलीचे दर्शन सर्वांना घडवत असतात.

कलारसिकतेची बहुविधता: संकेत-मधुरा ओक (Art and Entertainment : Dombivali’s VEDH)

मी संकेत आणि मधुरा ओक यांना भेटलो, त्यांच्याशी बोललो आणि मला, माझ्या गेली पंधरा-वीस वर्षें छळणाऱ्या प्रश्नाला उत्तर मिळाल्यासारखे वाटले. ती दोघे डोंबिवली-ठाणे-कल्याण येथे वेध अॅक्टिंग अकॅडमी चालवतात. अभिनय व इतर कलाविष्कार शिकवणारे अनेक भुरटे अभ्यासक्रम, कार्यशाळा, शिबिरे यांच्याबाबत लोकांनी ऐकलेले असते.

कोरोना : विकेंद्रीकरण ही तातडीची गरज (Corona : Decentralization is the key)

कोरोनाचा फैलाव गर्दीमध्ये जास्त होतो हे आता सरकारला व जनतेलाही कळून चुकले आहे. त्यामुळे सरकारने विकेंद्रीकरणाचा अजेंडा ताबडतोब हाती घ्यावा. जनतेची त्यास साथ मिळेल. शहरांतून होणारी गर्दी कमी करण्यासाठी विकेंद्रीकरण हा पर्याय शासनाने वापरणे आवश्यक आहे. 'वर्क फ्रॉम होम' मोठ्या प्रमाणावर सुरू झाले असल्यामुळे शहरांचे चित्र बदलणार आहे.