Home Tags मुंबई शहर

Tag: मुंबई शहर

हिजड्यांच्या टाळीला समाजाची हाळी! (Transgender Community and Social Reaction)

मुलं पहिली-दुसरीच्या वर्गात अक्षरओळख शिकत असताना ‘छ’ अक्षर आलं की दोन शब्द हमखास सांगतात ‘छत्री’ आणि ‘छक्का’. छक्का म्हणत असताना मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या चोरट्या हसण्यात त्यांचा ‘छक्का’ या शब्दाबद्दलचा, तो शब्द धारण करणाऱ्या व्यक्तींबद्दलचा भाव लपलेला असतो.

चले जाव : भारतीय स्वातंत्र्याचा अखेरचा लढा (Quit India – Last Phase of the...

'चले जाव'ची घोषणा 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथील गवालिया टँक मैदानावर काँग्रेसच्या वतीने केली गेली. 'ब्रिटिशांनी तत्काळ हा देश भारतीयांच्या हाती सोपवून चालते व्हावे' असा निर्वाणीचा इशारा त्या वेळी देण्यात आला.

ग्रामजीवनाची ऊबदार गोधडी (Village Life In Lockdown Period)

तांदळाची लुसलुशीत भाकरी. सोबत घरचे ओले काजू आणि बटाटा घातलेली झणझणीत भाजी. त्याने डब्यातून असा घास घेत न्याहरी संपवली. मोठ्ठी ढेकर ऐकू आली. तृप्ततेची... त्याने मी दिलेला कोरा चहा घेतला... आलं, गवती चहाची पात, भरपूर साखर आणि चहाची पावडर घातलेला.. दूध नाही हं त्यात.

गुरव म्हणजे शंकराचे पुजारी (Gurav – ShivShankar’s Speciel Priests)

गुरव जातीची निर्मिती भारतीय समाजात विशिष्ट परिस्थितीत झाली. गुरवकीचा व्यवसाय ग्रामदेवतांची पूजाअर्चा रोज व्हावी, नंदादीप लावला जावा,मंदिराची स्वच्छता राखली जावी या गरजेतून निर्माण झाला व त्यासाठी देण्याच्या सेवामूल्याची तरतूद बलुता पद्धतीत करण्यात आली.

शिव उपासक – शैव संप्रदाय (Worshipping Shiv)

0
शैव हा शिवदेवतेला उपास्य दैवत मानणारा संप्रदाय आहे. शिवाची उत्पत्ती प्रागवैदिक काळातील आहे. वैदिक युगाच्या प्रारंभी शिव नावाचा देव आढळत नाही. तथापी शिवलिंग उपासनेचे पुरावे हे हडप्पा संस्कृतीमध्येही सापडले आहेत. हडप्पा संस्कृतीमधील समाज हा शिवाची पूजा करत असावा असे निदर्शनास आले आहे.

कोरोना : मलेशियात मॉल्स खुले, प्रवास खुला! (Corona in Malaysia Lockdown is Over)

मी मूळ मुलुंडची (मुंबई) आहे. माझा जन्म हुबळी येथे आणि संगोपन मुंबईमध्ये झाले. मी मुंबई विद्यापीठातून वाणिज्य पदवी मिळवली आहे. मी मुंबईच्या  लोअर परळमधील रिझलट्रिक्स पब्लिक्स इंडिया या कंपनीत काम करत होते.

प्रज्ञा गोखले- वारीच्या लयीत दंग! (Pradnya Gokhale – On Pandharichi Wari)

मुलुंडच्या (मुंबई) प्रज्ञा गोखले यांना विठ्ठलाचे आणि वारीचे जणू वेड लागले आहे!गोखले त्या भक्तिभावनेतच दंग असतात. त्यांनी 1992-93सालापासून नित्यनेमाने आषाढी वारी केली आहे.सध्या,त्या प्रकृतीमुळे प्रत्यक्ष वारी करत नाहीत, पण त्यांच्या कार्यक्रमांतून आणि सादरीकरणांतून त्या त्यांच्या मनातील विठुमाऊलीचे दर्शन सर्वांना घडवत असतात.

कलारसिकतेची बहुविधता: संकेत-मधुरा ओक (Art and Entertainment : Dombivali’s VEDH)

मी संकेत आणि मधुरा ओक यांना भेटलो, त्यांच्याशी बोललो आणि मला, माझ्या गेली पंधरा-वीस वर्षें छळणाऱ्या प्रश्नाला उत्तर मिळाल्यासारखे वाटले. ती दोघे डोंबिवली-ठाणे-कल्याण येथे वेध अॅक्टिंग अकॅडमी चालवतात. अभिनय व इतर कलाविष्कार शिकवणारे अनेक भुरटे अभ्यासक्रम, कार्यशाळा, शिबिरे यांच्याबाबत लोकांनी ऐकलेले असते.

जलसंवर्धनाचे एकात्म व सुदृढ प्रयत्न हवेत! (Water Scarcity: Integrated Efforts Needed)

स्टॉकहोम जलपुरस्कार माधव चितळे यांना 1993 मध्ये मिळाला. तो नोबेल पुरस्कारच मानला जातो. तो भारतात प्रथमच मिळत होता, तोही मराठी माणसाला! त्यामुळे आम्ही 'विज्ञानग्रंथाली'तर्फे त्यांचा सत्कार व त्यांची मुलाखत असा कार्यक्रम मुंबईत योजला. भा.ल.महाबळ व मीना देवल यांनी मुलाखत घेतली.

जपान: कोरोनाने ऑलिम्पिक पुढे ढकलले… (Japan Olympic Next year)

18
आम्ही जपानमध्ये 2007 साली मुंबईहून आलो आणि गेली बारा वर्षे तेथे वास्तव्यास आहोत. नैसर्गिक आपत्ती जपानला नवीन नाहीत. वारंवार होणारे भूकंप -त्यामुळे येणाऱ्या त्सुनामी, टायफून(सागरी वादळ), पावसाने 2019 साली केलेला कहर...