Home Tags पंढरपूर

Tag: पंढरपूर

निळोबारायांची अभंगार्तता

0
ज्ञानदेवांनी जी भक्ती कल्पना मांडली, संत नामदेवांनी ज्या भक्तीचा प्रसार पंढरी ते पंजाबपर्यंत केला, तुकोबांनी ज्या भक्तीचे गोडवे गायले; निळोबांनी त्याच भक्तीचा प्रसार पुढे, दोन शतकांनंतर केला. देव आणि भक्त एक होऊनही भक्तीच्या सुखासाठी वेगवेगळे राहतात ही अद्वैतातील भक्तीची त्यांची कल्पना. त्या भक्तीमुळे आत्मज्ञान प्राप्त होते असा साऱ्या संतांचा अनुभव आहे...

शांतीचा कल्पवृक्ष श्री संत रामजी महाराज (Ramji Maharaj- Saint from Vidarbha)

0
शांतीसागर श्री संत रामजी महाराज नावाचे साधू पुरुष अमरावती जिल्ह्यात बग्गी (जावरा) या गावी होऊन गेले. त्यांना शांतीचा कल्पवृक्ष म्हणत. त्यांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांना समानतेची शिकवण दिली, त्यांनी आमलोकांमध्ये आध्यात्मिक व नैतिक मूल्यांची बीजे रोवली हे त्यांचे खास वैशिष्ट्य...

स्थलांतरित मुलांचे शिक्षण – दौंडचा अनुभव (Education of Migrant Children -Daund’s Experience)

शालेय मुलांचे ऑनलाईन शिक्षण लॉकडाऊनमुळे 2020 मध्ये सुरू झाले, परंतु स्थलांतरित मुलांच्या शिक्षणाची मोठी अडचण निर्माण झाली. तशा मुलांच्या अनेक झोपड्या नांदूर गावात कोरोनाच्या सर्वेक्षणाच्या निमित्ताने जुलै 2020 महिन्यात दिसून आल्या. परंतु ऊसतोडीला पालकांबरोबर दिवसभर गेलेली ती मुले संध्याकाळीच माघारी येत. त्यांचे सर्वेक्षण करणे कठीण होते...

पिंपळगाव – विदर्भातील पंढरपूर ! (Pimpalgaon – Saintly town in Vidarbha)

पिंपळगाव (भोसले) हे चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्यात वैनगंगेच्या काठावर वसलेले समृद्ध गाव आहे. परिसरात पाणी मुबलक आहे. शेतजमीनही सुपीक आहे.

कोल्हापूरचा चालता बोलता ज्ञानकोश (Ram Deshpande : Kolhapur’s Encyclopedia)

"ज्या वेळी संग्रहाचं, जतनाचं हे काम तुमच्या आवाक्याबाहेरचं आहे असं वाटेल तेव्हा मला कळवा." लंडन युनिव्हर्सिटीचे डॉ. ग्रॅहम स्मिथ यांनी मला आश्वासक सुरात पाठिंबा दिला...

सावंताचे सौरघट संशोधन – कोल्हापुरातून कोरियात झेप ! (Kolhapur boy Sawanta in solar energy...

8
सावता माळी पंढरपूर संतपीठाजवळच्या अरण गावचे. त्यांनी संत परंपरेत असाधारण स्थान मिळवले. तसा सावंता माळी हा कोल्हापूरजवळच्या शिवाजी विद्यापीठाचा तरुण स्नातक. तो जगातील सौर संशोधन क्षेत्र गाजवून राहिला आहे.

वाचकांना वारीचे आवाहन (Appeal to Contributors)

0
पंढरपूरच्याआषाढी वारी निमित्ताने ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर दोन दिवसांत चार लेख प्रसिद्ध केले आहेत. पैकी प्रज्ञा गोखले या सुशिक्षित वारकरी. त्या संत साहित्याने भाववेड्या होऊन गेल्या आणि त्यांनी तत्संबंधात विविध माध्यमांतून अभ्यासपूर्ण व भावनापूर्ण अनुभवपर कथन चालू ठेवली आहेत.

वारीची परंपरा (Wari Tradition)

0
श्री ज्ञानेश्वर महाराज स्वत: ज्येष्ठ वद्य अष्टमीला ‘माझ्या जीवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी।।’ असे म्हणत पंढरपुरास साडेसातशे वर्षांपूर्वी प्रस्थान ठेवते झाले. तेथपासून वारीची परंपरा सुरू झाली असे मानले जाते.

पंढरीची वारी- मराठी संस्कृतीची आत्मखूण! (Pandharpur Wari – Marathi Cultural Symbol)

माऊलींच्या पालखीचा आळंदी ते पंढरपूर हा पायवारीचा सोहळा होणार नाही हे ऐकून एकीकडे गलबलून येत आहे, तर दुसरीकडे माऊलींच्या पादुका हेलिकॉप्टरने पंढरपुरास जाणार याचा आनंदही वाटत आहे. वारकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तो निर्णय योग्यच आहे.