Tag: दिनकर गांगल
फलटणचा संस्कृतिशोध !
फलटण तालुका संस्कृती महोत्सवात स्थानिक परिसरातील मुद्यांना स्पर्श करणाऱ्या बौद्धिक व अनुभवाधारित चर्चा चालू असताना, दुसऱ्या बाजूला वातावरण जत्रेचे, हलकेफुलके होते. माहोल अनौपचारिक गप्पांचा होता. येणारे पाहुणे आणि श्रोतेही प्रदर्शनातील मोजक्याच स्टॉलना भेटी देऊन विविध माहिती गोळा करत होते. आकर्षणे वेगवेगळी होती. त्यात फलटणचा दुष्काळी टापू जलमय कसा झाला येथपासून शहराच्या समस्यांची विद्यार्थ्यांनी मांडणी केली होती, बचतगटाच्या महिलांनी उभे केलेले जग होते, फलटण तालुक्यातील लेखकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक कार्यालयाने पुरवलेली मताधिकाराची विविध तऱ्हेची माहिती होती...
आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी
योगीराज बागूल यांनी ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी’ हे पुस्तक लिहिले. त्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर हर्षदीप कांबळे (आय ए एस) आणि दंतवैद्य विजय कदम यांनी ‘डॉ.बाबासाहेब विचार मंचा’च्या माध्यमातून बाबासाहेबांच्या त्या शिलेदारांचे एकवीस जिवंत वारस शोधून काढून त्यांचा मुंबईत भव्य सत्कार घडवून आणला ! त्यावेळी तेथे जमलेल्या त्या सत्कारमूर्तींच्या चेहऱ्यावरील कृतज्ञतेची भावना ही योगीराज यांच्या त्या अथक परिश्रमांची पावती होती...
बोजेवार आणि अध्वर्यू
थिंक महाराष्ट्र’चे संपादक दिनकर गांगल यांनी संस्कृतिकारण हा शब्द मराठीत रूढ केला. तो त्यांनी ‘ग्रंथाली’च्या ग्रंथप्रसार यात्रेत 1982 साली प्रथम वापरला. त्या यात्रेची भूमिकाच साहित्यातील संवाद व समन्वय अशी होती. त्या धर्तीचे बरेच कार्यक्रम त्या यात्रेत आणि ‘ग्रंथाली’च्या नंतरच्या ग्रंथएल्गार, संवादयात्रा, ग्रंथमोहोळ, वाचकदिन अशा विविध उपक्रमांमध्ये होत गेले...
दिवाळी अंक मराठी संस्कृतीचे लेणे
दिवाळी अंक हे मराठी संस्कृतीचे गेल्या शतकातील लेणे आहे. ते जपले गेले पाहिजे हे खरे; मात्र सध्या अस्थिर सामाजिक–सांस्कृतिक परिस्थितीत ते कसे घडणार हा...
अशोक दातार- वाहतूकवेडा!
वाढवून मिळालेले आयुष्य सत्कारणी कसे लावावे हे अशोक दातारकडून शिकावे! त्याने सन 1995 च्या सुमारास, तो वयाच्या पंचावन्नच्या आसपास असताना करिअरमधील लक्ष काढून घेतले;...
थंड गोळ्याला चेतना
समाजातल्या विचारवंतांनी एकत्र येऊन विचारविनिमय केला, चर्चा घडवल्या, तर त्यामधून काहीतरी चांगले आणि समाजोपयोगी असे निर्माण होण्याची शक्यता असते.. हे प्रत्यक्षात घडवून आणण्याकरता आज आपल्यापाशी इण्टरनेट हे जागतिक स्वरूपाचे व अत्यंत बलशाली असे साधन उपलब्ध आहे. हा एक नवा ‘चवाठा’ बनला आहे. याचा उपयोग करून असा विचारविनिमय घडवून आणण्याची कल्पना दिनकर गांगल यांनी अनेक वर्षांपूर्वी ‘मराठी विद्यापीठ’ या संकल्पनेद्वारे मांडली होती. सध्याचे प्रस्तुत थिंकमहाराष्ट्र वेबपोर्टल हे त्याचेच मूर्त स्वरूप आहे असे...