Tag: दापोली तालुका
आदिलशाही स्थापत्यशैली – दाभोळची मशीद (Adilshahi architecture – Dabhol Mosque)
विजापूरची एक राजकन्या आयेशाबिबी (तिला माँ साहेब असेही म्हणत) मक्केला जाण्यासाठी तिच्या लवाजम्यासह (तिच्या सोबत वीस हजार घोडेस्वार होते) दाभोळ बंदरात येऊन पोचली. त्यावेळी मुहम्मद आदिलशहाची कारकीर्द तेथे चालू होती. एवढ्या लोकांसह एवढा लांब प्रवास करण्यासाठी लागणारी मोठी रक्कम - लाखो रूपयांची संपत्ती तिच्याकडे होती. परंतु तिने तिचा पुढील प्रवास रद्द केला. त्या रकमेचा सदुपयोग करण्यासाठी मौलवी आणि काझी यांच्या सल्ल्याप्रमाणे दाभोळातच एक छान मशीद उभी करावी असे ठरले. त्या मशिदीचा स्थपती होता कामिलखान...
आदिलशाही आणि स्थापत्य (Architecture in Adilshahi Period)
प्राचीन दाभ्यपुरी म्हणजे आजचे दाभोळ ! ते कोकणातील बंदर. ते विदेशी व्यापारामुळे प्राचीन काळापासून भारताच्या मध्ययुगीन काळापर्यंत गजबजलेले असे. अनेक राजवटींचा तेथे संबंध आला. त्यांपैकीच एक आदिलशाही. पोर्तुगीज सेनापती आफांसो द आल्बुकर्कने गोवा जेव्हा 1510 साली जिंकून घेतले, तेव्हा आदिलशाहीकडे दाभोळ हेच एक मोठे बंदर उरले !...
थोरोच्या गावात रजनी देवधर (Rajani Deodhar in Thoreau’s Village)
मी लॉकडाऊन काळातील धावत्या नोंदींमध्ये लिहित असलेल्या काही लेखांबाबत विशेष औत्सुक्य येणाऱ्या प्रतिसादावरून जाणवते. ते प्रल्हाद जाधव याच्या 'थोरो-दुर्गा भागवत भेटी'च्या कल्पनेबाबत तसेच घडले. त्यावर प्रतिक्रिया वेगवेगळ्या स्तरांतून वेगवेगळ्या प्रकारच्या आल्या.
कणकवलीचे भालचंद्र महाराज
भालचंद्र महाराज वास्तव्याला आले म्हणून कणकवली हे कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाव ‘श्रीक्षेत्र कणकवली’ झाले. भालचंद्र यांचा जन्म वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण या गावी परशुराम ठाकूर...
स्त्रियांचे उद्धारकर्ते – महर्षी धोंडो केशव कर्वे (Maharshi Dhondo Keshav Karve)
महर्षी धोंडो केशव कर्वे हे एक लोकोत्तर सेवामूर्तीच होते. महर्षी कर्वे यांचे नाव सामाजिक सुधारणेच्या कार्यात महात्मा फुले, आगरकर, पंडिता रमाबाई यांच्याबरोबरीने घ्यावे लागेल....
र.धों. कर्वे यांचे फ्रेंच भाषेतून अनुवाद
र.धों. कर्वे यांचा इंग्रजी व फ्रेंच भाषा व वाङ्मय यांचा अभ्यास दांडगा होता. विशेषत: त्यांचे फ्रेंच भाषेवरील प्रभुत्व वादातीत असावे. ते ती भाषा शिकले...
दापोली तालुक्याचा त्रिकोण व त्याची महत्ता (Dapoli Tehsil)
दापोली परिसरात भेट द्यावी अशी पालगड, मुरुड, वणंद व जालगाव ही चार गावे आहेत. दापोली हे गाव ब्रिटिशांनी त्यांच्या कारभाराच्या सोयीसाठी वसवले. दापोली गावाचा...
दापोली तालुक्यातील बुद्धिवैभव!
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (23 जुलै 1856 – 1 ऑगस्ट 1920) - टिळकांचे मूळ गाव दापोली तालुक्यातील ‘चिखलगाव’. टिळकांचा जन्म रत्नागिरी येथे झाला. त्यांचे...
महर्षि धोंडो केशव कर्वे
कर्वे यांचा जन्म मुरुड येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुरुड येथे झाल्यावर ते उच्च शिक्षणासाठी मुंबई येथे गेले. ते पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते....
नवभारत छात्रालय – दापोलीचे लेणे
दापोलीचे ‘नवभारत छात्रालय’ हे नाव सुचवते त्याप्रमाणे फक्त विद्यार्थ्यांसाठी निवास, भोजन यांची सोय नाही. ते परिसरातील सर्वात जुने छात्रालय असूनही ते जोमाने वाढत आहे!...