Tag: दादर
डॉ. एकनाथ गोळे – कोकणविकासाचा ध्यास !
डॉ. एकनाथ मधुसूदन गोळे हे मुंबईच्या दादरचे की दापोली तालुक्यातील हर्णेचे असा प्रश्न पडावा इतके ते या दोन्ही गावांशी एकरूप झालेले होते. त्यांनी रेडिओलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस मुंबईत केली, परंतु त्यांनी हर्णे-दापोलीच्या विकासाचा ध्यास आयुष्यभर घेतला. तसे अनेक उपक्रम त्यांनी त्या तालुक्यात केले...
कोळथरे येथील आगोमचे मामा महाजन
दापोली तालुक्याच्या कोळथरे गावचे मामा महाजन यांनी राजकारण, समाजकारण आणि उद्योग या तिन्ही क्षेत्रांत स्वतःचा असाधारण असा ठसा स्थानिक पातळीवर उमटवला आहे. मात्र त्यांची ओळख ‘आगोमचे जनक मामा महाजन’ हीच आहे...
प्रताप टिपरे – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची सावली (Pratap Tipre)
बाबासाहेब पुरंदरे यांचे स्वीय सहाय्यक व सचिव यांचे नाव राणाप्रताप असावे हा गमतीदार योगायोग आहे ना! त्यांचे पूर्ण नाव राणाप्रताप प्रभाकर टिपरे ते पुरंदरे प्रेमींमध्ये प्रतापकाका म्हणून ओळखले जातात. त्यांचे प्रथम वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे हस्ताक्षर सुंदर, वळणदार, सुवाच्च आहे...