Home Tags गावगाथा

Tag: गावगाथा

कोंडगाव-साखरपा हीच तर जुनी पेठ इभ्रामपूर! (Historical Reference of Kondgoan- Sakharpa)

11
साखरपा आणि कोंडगाव ह्या दोन्ही गावांचा उल्लेख साधारणत: एकत्रच केला जातो. ती दोन्ही गावे एकमेकांना लागून, जुळ्या भावांसारखी आहेत. ती गावे गड व काजळी या दोन नद्यांच्या संगमावरवसलेली आहेत.

न्हैचिआडच्या रेग्यांचा गणपती (Ganpati From Nhaichiaad)

6
सिंधुदुर्गजिल्ह्यात वेंगुर्ल्याहूनशिरोड्याला जाताना वाटेत मोचेमाडची खाडी लागते. ती खाडी ओलांडली की डाव्या कुशीला लागतं आमचं न्हैचिआड. न्है म्हणजे नदीअथवा खाडी. त्यांच्या आड वसलेलं, म्हणून...

नवरात्रातील तुणतुणे परंपरा (Tuntune Tradition In Konkan)

4
कोकणातील  नवरात्रोत्सवाचा अविभाज्य भाग म्हणजे नऊ दिवस तुणतुणे घेऊन आरती म्हणत गावागावातून फिरणारे देवीचे भुत्ये. भुत्ये हे सरवदे समाजाचे लोक असतात. संगमेश्वर तालुक्यात ती परंपरा चारशे वर्षांची आहे.

तोरणमाळ: खानदेशचे सौंदर्य! (Toranmal : Hill Station From Khandesh)

तोरणमाळ हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे पर्यटनस्थळ. महाबळेश्वर हे पहिले. तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्याच्या शहाद्याच्या उत्तरेस सातपुडा पर्वतात आहे. ते धडगाव तालुक्यात येते. ते नंदुरबारपासूनपंच्याण्णव किलोमीटर अंतरावर आहे.

रापण : किनारपट्टीवरील नयनरम्य देखावा (Rapan – Old Fishing Technique Disappears From the Sea...

‘रापण’ हे कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारीचे मुख्य साधन होते; त्याच बरोबर ती गावची घटना होऊन गेली होती. आमच्या तांबळडेग गावाला पहाटे कोंबडा आरवला की जाग येत असे.

ग्रामगीतेचा आमगावातील प्रत्यय (Aamgav Uses Gramgeeta In Practice)

तुकडोजी महाराजांनीत्यांच्या हयातीत ग्रामगीतेचा प्रयोग करून भंडारा जिल्ह्यातील आमगाव ह्या, शहाण्णव घरे असलेल्या एका लहानशा खेड्याचे रुपांतर आदर्श आमगावात 1953 साली सर्वांच्या समन्वयाने करून दाखवले. प्रेमानुज नावाच्या लेखकाने आदर्श होण्यापूर्वीच्या आमगावचे वर्णन केले ते असे

ग्रामजीवनाची ऊबदार गोधडी (Village Life In Lockdown Period)

तांदळाची लुसलुशीत भाकरी. सोबत घरचे ओले काजू आणि बटाटा घातलेली झणझणीत भाजी. त्याने डब्यातून असा घास घेत न्याहरी संपवली. मोठ्ठी ढेकर ऐकू आली. तृप्ततेची... त्याने मी दिलेला कोरा चहा घेतला... आलं, गवती चहाची पात, भरपूर साखर आणि चहाची पावडर घातलेला.. दूध नाही हं त्यात.

ते ‘पुल’कित दिवस (P.L.Deshpande With Aachre Villagers)

आचरे गावातील रामनवमी उत्सवात, पु.ल.देशपांडे आणि त्यांच्या महाराष्ट्रातील ख्यातकीर्त सत्तर कलावंतांचा चाळीस वर्षांपूर्वी, 1975ला आचरेवासीयांना जो सुखद सहवास लाभला तो आम्ही समस्त आचरेवासीय आजन्म विसरू शकत नाही. ‘कलासक्त हे गुणीजन मंडित पुण्यग्राम आचरे’ ही

माझे साधे गाव – मोहटा (Mohata Village)

मोहटा हे माझे छोटेसे गाव दक्षिण अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यात वसलेले आहे. सह्याद्रीची डोंगररांग अहमदनगर जिल्ह्यात आल्यानंतर तिला गर्भगिरी हे नाव पडते. त्या गर्भगिरीच्या कुशीमध्ये वसलेले आहे माझे छोटेसे गाव- ‘श्री क्षेत्रमोहटादेवी’. त्यालाच मोहटे किंवा मोहटा या नावानेदेखील ओळखले जाते.
_rangoli

महागाव – रांगोळी कलेचे गाव

कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यामधील ‘महागाव’ला रंगांच्या उधळणीचा, ‘रांगोळींचा वारसा’ लाभला आहे! तोही फार जुना नव्हे, जेमतेम चाळीस वर्षांचा, पण तो मुरला आहे असा, की...