Tag: कीर्तनकार
गंधर्वतुल्य गायन करणारे नट – भाऊराव कोल्हटकर
मराठी रंगभूमीवरील गायक नट म्हणून भाऊराव कोल्हटकर हे त्यांच्या ‘शकुंतला’, ‘सुभद्रा’, ‘मंथरा’ या त्यांनी साकारलेल्या स्त्रीभूमिकांमुळे विशेष गाजले. परंतु पुढे, त्यांनी ‘सुभद्रे’चा अपवाद वगळता 1889 सालानंतर मुख्यत्वे पुरुष भूमिका साकारल्या त्या अखेरपर्यंत. भाऊराव त्यांचा मधुर गळा, त्यांचे सौंदर्य आणि त्यांचा उत्तम अभिनय यांमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोचले…
आधुनिक विज्ञानयुगात वारीचे औचित्य
पंढरीची वारी ही भागवत धर्माची जगातील एकमेवाद्वितीय परंपरा. ती आठशे वर्षांपासून नुसती टिकूनच राहिलेली नाही तर वृद्धिंगत होत आहे. वारी सर्वसमावेशक असल्याने तिचे औचित्य आधुनिक विज्ञानयुगातही आहे. कर्म, ज्ञान, भक्ती यांचा यथायोग्य मेळ आणि व्यवस्थापन कौशल्याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे पंढरीची वारी. परम संगणककार विजय भटकर यांनी विज्ञान व आध्यात्म यांचा पायाच मुळात श्रद्धा आहे, ती अंध असू शकत नाही असे सांगून, त्यांची परस्पर पूरकता लेखाद्वारे उलगडून दाखवली आहे...
शोध गाडगेबाबांचा
गाडगेबाबांचा उल्लेख संत, समाजसुधारक, प्रबोधनकार, कर्मयोगी अशा अनेक प्रकारे केला जातो. मात्र तो माणूस अध्यात्माच्या नावाखाली पोपटपंची करणारा हभप नव्हता. त्यांचे कीर्तन माणसांच्या मन आणि मेंदू यांना प्रथा, परंपरा, कर्मकांड यांचे जे झापड लागले आहे, ते दूर करणारे होते...