Home Tags ऋग्वेद

Tag: ऋग्वेद

आख्यान, व्याख्यान, उपाख्यान आणि उखाणा

0
शब्दांचे धागे एकमेकांत गुंतलेले असतात. धाग्यांतील रंग वेगवेगळया भाषांतील असतात. आख्यान, व्याख्यान, उपाख्यान हे शब्द ऐकताना सारखे वाटतात. परंतु, हे वेगवेगळे शब्द आहेत. या शब्दांची निर्मिती कशी झाली असेल? उखान्यांचा नाव घेणे याच्याशी काय संबंध आहे ते शब्दशोधच्या या लेखाद्वारे जाणून घेऊया...

भारतरत्न पां.वा. काणे (BharatRatna P.V. Kane)

भारतरत्न पांडुरंग वामन अर्थात पां.वा. काणे हे अलौकिक व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी एका मानवी आयुष्यात विविध तऱ्हांचे ज्ञानसंशोधनात्मक व संघटनात्मक अफाट कार्य केले. त्यांचे सर्वात मोठे काम म्हणजे त्यांनी ‘भारतीय धर्मशास्त्राचा कोश’ आधुनिक काळात संकलित केला. तो पाच खंडांत व काही हजार पृष्ठांत आहे...

कालगणनेसाठी पंचांगांचा विकास (Astronomy, Astrology and Religion)

पंचांग ही भारताची संस्कृती आहे. भारतीय पूर्वज आकाश निरीक्षण करणारे, खगोल गणित जाणणारे होते. त्यांनी त्या ज्ञानाचा वापर करून त्यांचे आयुष्य निसर्ग नियमात अधिकाधिक बसवण्याचा प्रयत्न केला. भारतीय लोकांचे धार्मिक आचरण निसर्गाच्या नियमांधारे आणि आयुर्वेदाच्या माध्यमाने जोडले गेले. परंतु धर्मशास्त्रात कालानुरूप बदल करणे गरजेचे आहे. पंचांगकर्ते, धर्मशास्त्र जाणकार, आयुर्वेद तज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, हवामान तज्ज्ञ यांनी एकत्रितपणे येऊन ते बदल केले व तसे सर्वांना समजावून सांगितले तर लोक त्यांचा नक्की स्वीकार करतील...

भारतीय संस्कृती तलावांकाठी वाढली! (Water supply lakes and tanks is a special feature of...

0
स्थलांतर करावे लागू नये म्हणून भारतीय पूर्वजांनी वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे अगदी उंचावर, पठारांवर तलावांची निर्मिती करून ठेवली. त्या ठिकाणी पाणी साठवून, त्या त्या ठिकाणच्या प्राणी जीवनाला, मानवी जीवनाला आधार दिला. भारत देशात पाच लाख खेडी होती, म्हणजे साधारणतः प्रत्येक गावाला कमीत कमी दोन तलाव होते! भारतीय जीवन इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तलावांच्या काठी वाढलेले आहे...

गोत्र आणि विवाह संबंध

0
गोत्र हा शब्द ‘गौक्षेत्र’ या नावापासून बनला गेला. प्रत्येक परिवारास पशुधन चारण्यासाठी गावातील एक ठरावीक क्षेत्र राखीव असे, त्याला गोक्षेत्र म्हटले जाई. त्या परिवाराची ओळख पुढे त्या क्षेत्रावरूनच होऊ लागली. पुढे त्यालाच गोत्र म्हटले जाऊ लागले...