Home Tags इंदिरा गांधी

Tag: इंदिरा गांधी

कोळथरे येथील आगोमचे मामा महाजन

दापोली तालुक्याच्या कोळथरे गावचे मामा महाजन यांनी राजकारण, समाजकारण आणि उद्योग या तिन्ही क्षेत्रांत स्वतःचा असाधारण असा ठसा स्थानिक पातळीवर उमटवला आहे. मात्र त्यांची ओळख ‘आगोमचे जनक मामा महाजन’ हीच आहे...

नरकतीर्थ बाबा फाटक

खादीची गोल गांधी टोपी, खादीची अर्धी विजार व खादीचा अर्ध्या बाह्यांचा शर्ट असा पेहराव,कामात सतत गर्क असणारे तरी हसरा चेहरा,वापरायला जुनी सायकल असे व्यक्तिमत्व म्हणजे बाबा फाटक.अशा नरकतीर्थ बाबांना १९७२ साली भारत सरकारने ताम्रपट व सन्मानपत्र देऊन गौरविले ...

बाळासाहेब भारदे यांची काँग्रेसनिष्ठा…

बाळासाहेब भारदे यांची कुशल राजकारणी, गांधीवादी नेता अशी ओळख आहे. त्यांना इंदिरा गांधी यांनी यशवंतराव चव्हाण यांची साथ सोडून मुख्यमंत्री व्हावे असा निरोप दिला. बाळासाहेबांनी काळाची पावले ओळखून पदत्याग केला, परंतु निष्ठा सोडली नाही...

लोकनेता वसंतदादा (Vasantdada Patil – Man of the Masses)

वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चार वेळा झाले. ते अल्पशिक्षित होते, परंतु मुलींना मोफत शालेय शिक्षण, मुक्त विद्यापीठाची स्थापना, विनाअनुदानित तत्त्वावर अभियांत्रिकी / वैद्यकशास्त्राची महाविद्यालये काढण्याचा निर्णय यांमुळे शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले. ‘मायबाप सरकार’ हा शब्दप्रयोग दादांना समोर ठेवूनच प्रचारात आला की काय असे वाटावे, अशी दादांची कार्यशैली असे...

सीडींना अर्थशास्त्रातील प्राविण्य लाभले कोठे? (Biographical writing about C D Deshmukh – a missing...

'लोकसत्ता' दैनिकाने सीडी ऊर्फ चिंतामणराव देशमुख ह्यांच्या कार्याचा वेध घेणारा एक विशेषांक त्यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त, प्रसिद्ध केला आहे (30 मे 2021). तो वाचताना मला त्यात काही उणिवा जाणवल्या. वाटले, इतक्या महान व्यक्तीचे कार्य ग्रंथित करताना, तो अंक सत्याधारित, सर्वसमावेशक आणि सखोल संशोधनपूर्वक व्हायला हवा होता. महाराष्ट्रात सीडींबद्दल आदर व प्रेम आहे. ते अर्थशास्त्रावर अधिकारवाणीने लिहू/बोलू शकणारे मान्यवर आहेत. तेव्हा सीडींना अर्थशास्त्रात जे प्राविण्य प्राप्त झाले ते त्यांनी कोठे व केव्हा मिळवले?...

पिनकोडचे जनक : श्रीराम वेलणकर (Shriram Velankar – Father of Pincode System)

श्रीराम भिकाजी वेलणकर हे ‘पिनकोड’चे जनक म्हणून ओळखले जातात. ‘पिनकोड’शी प्रत्येक भारतीयाचे नाते घट्ट जोडलेले आहे. त्याच्या नावासमोर नुसता पिनकोड नंबर लिहिला, तरी ती व्यक्ती देशाच्या कोणत्या भागात राहते हे कळून येते. वेलणकर हे गणितज्ञ होते. त्यामुळे त्यांनी सहा आकड्यांमध्ये संपूर्ण देशाचा नकाशा मांडला आणि पिनकोड नंबरची निर्मिती केली...