Home Search

node - search results

If you're not happy with the results, please do another search

गाविलगड – स्थलानुरूप जल नियोजनाचा वारसा (Gavilgad – Bahamani fort is known for its...

गाविलगड किल्ला हे विदर्भाचे भूषण आहे. तो किल्ला अमरावतीतील चिखलदऱ्याजवळ, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधे आहे. तो सातपुडा पर्वतरांगांच्या मध्यावर येतो. मेळघाटातील डोंगरद-यांमध्‍ये विखुरलेली किल्‍ल्‍याची व्यापकता आणि गडावरील वास्तुशिल्पातील कलाकुसर पाहून मन थक्‍क होऊन जाते.

भीमसेन जोशी – शेरच तो ! (Remembering Bhimsen Joshi on his birth centenary)

पंडित भीमेसन जोशी यांच्या जन्माला नव्याण्णव वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1922 ला कर्नाटकात झाला. पण समस्त महाराष्ट्रीयनांच्या व भारतीयांच्या मनात, हृदयांत भीमसेन आहेत ते पुण्याचे.

मागील पिढीवरील वाचन संस्कार (Reading – key to the personality development)

4
मराठी भाषाभ्यासासाठी वि.स. खांडेकर, आचार्य अत्रे वगैरे दिग्गजांनी संपादित केलेली पाठ्यपुस्तके जुन्या पिढीत होती; खेरीज पुरवणी वाचनासाठी नेमलेली अवांतर पुस्तके असत. त्यातील गद्य विभाग हे गद्य बिलकुल नव्हते, तर अतिशय रोचक आणि समृद्ध होते. त्यातील साहित्याची विविधता तेव्हा जाणवली नाही, पण आता ती आठवली, की स्तिमित व्हायला होते.

बालगिर्यारोहक शर्विका म्हात्रे – विक्रमच विक्रम! (Sharvika Mhatre – child she is but walks...

शर्विका म्हात्रे महाराष्ट्राची ‘हिरकणी’ म्हणून ओळखली जाते ! तिने दीड वर्षे वयापासून गिर्यारोहण क्षेत्रात पदभ्रमणाला सुरुवात केली. तिने त्यांनंतर अडीच वर्षात म्हणजे वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत गिर्यारोहण क्षेत्रातील यशाचे शिखर गाठले.

शिक्षणातील क्रांतीचे पाऊल : ग्राममंगल (Grammangal- innovative educational method)

‘ग्राममंगल’च्या तीन शाळा ह्या नव्या शिक्षणपद्धतीचा ब्रँड आहेत. म्हणजे शिक्षणविषयाची ती संकल्पना जुनी आहे, पण सध्या त्यांबाबतचे औत्सुक्य वाढले आहे. त्या शाळा पाहण्याचा योग आला.

चौलची खाडीसफर आणि नौकांची शर्यत (‘Creek Jaunt’ at Chaul and Korlai)

कोर्लई, रेवदंडा, चौल आणि आग्राव या, रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळच्या चार गावांतील कोळीबांधव गुढी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी नौकानयन स्पर्धा योजतात. त्यात परंपरा आहे आणि मौजमस्तीही आहे.

चौल, शूर्पारक आणि ‘मडफ्लॅट्स’ (Chaul, Shurparak and Mudflats)

चौल हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील अतिप्राचीन बंदर. त्याचा उल्लेख चिम्युला, टिम्युला, साइभोर, चेऊल अशा विविध नावांनी इतिहासात आढळतो. चौलचा उल्लेख घारापुरीच्या लेण्यातील शिलालेखातदेखील आढळतो. चौल बंदरात 1470 साली आलेल्या रशियन दर्यावर्दीचे नाव – अफनासी निकीतीन.

नाशिकच्या रेडिओवर अमेरिकी शाळा (US Marathi Schools have programme on Nasik Vishwas radio)

मी लॉकडाऊनच्या काळात रेडिओ विश्वास वर 'समन्वयक' म्हणून काम करू लागले. रेडिओ विश्वास हा कम्युनिटी रेडिओ आहे. तो मोबाईल अॅपद्वारे जगभरात कोठेही ऐकता येतो. त्याचे मुख्य केंद्र नाशिक येथे आहे.

गडकरी – नाटककाराची विविधांगी प्रतिभा (Tribute to playwright Ram Ganesh Gadkari)

राम गणेश गडकरी हे नाटककार म्हणून त्यांच्या अलौकिक प्रज्ञेने, प्रतिभाविलासाने, भाषावैभवाने मराठी साहित्यसंस्कृती जगतात वेगळे उठून दिसतात. मराठी नाट्यपंचायतन असे किर्लोस्कर, देवल, कोल्हटकर, खाडिलकर व गडकरी या पाच जणांना म्हटले जाते.

यशवंतराव आणि हॅम्लेट (Did Y B Chavhan face Hamlet’s crisis in public life?)

यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चार वेळा झाले. ते मुरब्बी राजकारणी व दूरदृष्टीचे समाजकारणी होते. त्यांनी महाराष्ट्रातील ‘माळावरचा माणूस’ उभा केला, सहकाराचे अमृत सर्वसामान्यांपर्यंत पोचवले, शिक्षणाचा संदेश घरोघरी नेला - त्यांनी हवालदिल शेतकऱ्यांसाठी ‘कसेल त्याची जमीन’ हा कायदा राबवून त्याची मातीशी जोडलेली नाळ घट्ट केली.