Home Search

होळी - search results

If you're not happy with the results, please do another search

माझी वाडवळी बोली (Wadwali dialect)

वाडवळ ज्या बोलीतून त्यांचा व्यवहार करतात त्या बोलीला ‘वाडवळी’ म्हटले जाते. वाडवळी ही माझी प्रथम भाषा आहे. प्रमाण मराठी ही माझ्या आयुष्यात वाडवळीनंतर आलेली दुसरी भाषा होय. वाडवळी बोलीची गुणकीर्ती गाताना मला एकेका शब्दामागे अनेक शब्दांचे सर सहज सुचत राहतात ....

झाडीचा हिरा – मानाचा तुरा : हिरालाल पेंटर (Hiralal Painter – Versatile Actor...

हिरालाल पेंटर हा विनोदाची खाण आणि टायमिंगची उत्तम जाण असणारा विदर्भातील कसदार अभिनेता आहे. तो ‘विनोदाचा बादशहा - हिरालाल पेंटर’ म्हणून झाडीपट्टीत प्रसिद्ध आहे. त्याचा जन्म ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी या छोट्याशा गावात झाला. तो त्याची ओळख ‘आठवी पास, नववी नापास !’ अशीच करून देतो...

सोलापूरचे मार्शल रामकृष्ण गणेशराम जाजू (Ramkrishna Jaju- Solapur’s martial in Freedom Struggle)

‘मार्शल’ हे खरे तर लष्करी संबोधन, परंतु तेच संबोधन महात्माजींना दैवत मानून ज्याने अहिंसेची व अनात्याचाराची शपथ घेतलेली आहे अशा जाजू नावाच्या सोलापूरातील गांधीवादी समाजसेवकाच्या नावापुढे पाहून मोठा विरोधाभास वाटतो. रामकृष्ण गणेशराम जाजू !

आम्ही वसईकर – वाडवळ, पानमाळी, भंडारी, कोळी… (Vasai – The picture of integration)

होय. आम्ही वसईकर आहोत. कारण आमचा धर्म, गोत्र, जात, आर्थिक परिस्थिती, रंग, रूप, काहीही असले, तरी आम्हाला बांधते ते एकच नाते - आम्ही वसईकर ! भारत देश किती मोठा आणि विस्तीर्ण; आणि किती विविधतेने भरलेला आहे !

चपाती व पोळी (Chapati, Poli Marathi Versions of Loaf)

1
मराठी भाषेत ‘पोळी’ व ‘चपाती’ हे पर्यायशब्द म्हणून जवळजवळ वापरले जातात. उच्चभ्रू समाजात ‘पोळी’ व तदितर समाजात ‘चपाती’ हा शब्द वापरला जातो असे ढोबळपणे म्हणता येते.

तेविसावे साहित्य संमेलन (Twenty Third Marathi Literary Meet – 1938)

मुंबई येथे भरलेल्या तेविसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होते. विज्ञाननिष्ठ, प्रखर बुद्धिवादी आणि तरीही कविहृदयाचे ते प्रचंड ताकदीचे लेखक. त्यांनी संपूर्ण आयुष्य देशसेवेत अर्पण केले.

वीतभर कपडा टीचभर पोट – वास्तव, झाडीपट्टी रंगभूमीचे ! (Experiences of Zadipatti stage by...

‘झाडीपट्टी रंगभूमी’ नावाची एक अनोखी रंगभूमी आहे असे ऐकले होते- वाचलेही होते. त्यामुळे उत्सुकता होती, की ती रंगभूमी कशी आहे ते बघावे. कारण प्रायोगिक रंगभूमी, हौशी रंगभूमी, समांतर रंगभूमी, बाल रंगभूमी, व्यावसायिक रंगभूमी हे प्रकार मला माहीत होते.

चंद्रपूरचे सृजन- सांस्कृतिक यज्ञाचे तप ! (Srujan – Unique Cultural Platform From Chandrapur)

नाशिकचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 26-27-28 मार्चला होऊ शकले नाही, परंतु त्याच तारखांना नाशिकहूनच एका आभासी साहित्य संमेलनाची सूत्रे हलवली गेली आणि ते तिन्ही दिवस एक झकास मराठी साहित्य संमेलन घडून आले ! ते योजले होते चंद्रपूरच्या ‘सृजन’ संस्थेने आणि त्याचे सूत्रसंचालन केले होते मृणाल पात्रीकर-धर्माधिकारी यांनी, नाशिकहूनच...

फडावरचा गुढीपाडवा (Sugarcane Cutters celebrate Gudhipadwa in their Style)

फड म्हणजे साखर कारखान्याच्या शेजारी वसलेली गाडीवाल्या ऊसतोडणी कामगारांची हंगामी वस्ती. ती काही महिन्यांसाठी असते आणि तेथे येणारे कामगार स्थलांतरित असतात.

परीटाचा दिवा – कोकणातील मानसन्मानाची रीत (Washerman Community – Ritual in Konkan)

6
‘परीटाचा दिवा’ हा शब्द कोकणात एकेकाळी प्रसिद्ध होता. तेव्हा परीट समाजाकडून दिवाळीत दिव्यांनी होणारी ओवाळणी सन्मानाची, प्रतिष्ठेची गावोगावी मानली जात असे.