Home Search
साहित्य - search results
If you're not happy with the results, please do another search
एकतिसावे साहित्य संमेलन (Thirty-first Marathi Literary Meet -1947)
एकतिसावे साहित्य संमेलन हैदराबाद येथे 1947 साली झाले. नरहर रघुनाथ फाटक हे तेथे अध्यक्ष होते. फाटक यांच्या आयुष्याची सुरुवात वृत्तपत्र लेखनाने आणि संपादन सहकार्याने झाली. पुढे, ते नाथीभाई ठाकरसी विद्यापीठ व रुईया कॉलेजात मराठीचे अध्यापक झाले...
साहित्यविक्री
महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित (‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वरील निवडक साहित्याचे प्रकाशन) ही वर्षाला एक पुस्तक अशी मालिका योजली होती. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यांचे स्वागत...
तिसावे साहित्य संमेलन (Thirtieth Marathi Literary Meet – 1946)
गजानन त्र्यंबक माडखोलकर हे बेळगाव येथे 1946 साली झालेल्या तिसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ते कादंबरीकार, निबंधकार, पत्रकार आणि संपादक म्हणून प्रसिद्ध होते. राजकीय कादंबरी ही त्यांची खासीयत.
एकोणतिसावे साहित्य संमेलन (Twenty Nineth Marathi Literary Meet – 1944)
भार्गवराम विठ्ठल ऊर्फ मामा वरेरकर हे धुळे येथे 1944 साली झालेल्या एकोणतिसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांचा लौकिक श्रेष्ठ नाटककार, बंगाली साहित्याचे भाषांतरकार आणि कादंबरीकार असा होता. त्यांचा जन्म चिपळूण येथे 27 एप्रिल 1883 रोजी झाला.
अठ्ठाविसावे साहित्य संमेलन (Twenty Eighth Marathi Literary Meet – 1943)
श्रीपाद महादेव माटे हे सांगली येथे 1943साली भरलेल्या अठ्ठाविसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. श्री. म. माटे यांचे नाव उच्चारता क्षणीच, त्यांनी त्यांचे आयुष्य पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांसाठी झोकून दिले होते त्याची आठवण होते. जणू ह्या दलितेतर माणसाने दलित चळवळीची सुरूवातच केली !
सत्ताविसावे साहित्य संमेलन (Twenty Seventh Marathi Literary Meet – 1942)
सत्ताविसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे होते. ते संमेलन 1942साली नाशिक येथे भरले होते. अत्रे हे महाराष्ट्राचे हसते-खेळते, चैतन्यदायी, 'प्रचंड' व्यक्तिमत्त्व होय. त्यांनी वाङ्मयाचे वेड जीवनाच्या आनंदामधून आयुष्यभर जपले, जोपासले व स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा मराठी वाङ्मयावर, संस्कृतीवर, मराठी वृत्तपत्रसृष्टीवर, मराठी बोलपटांवर आणि मराठी नाटकांवर उमटवला.
सव्विसावे साहित्य संमेलन (Twenty Sixth Marathi Literary Meet – 1941
सव्विसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विष्णू सखाराम ऊर्फ भाऊसाहेब खांडेकर हे होते. ते संमेलन 1941 साली सोलापूर येथे झाले. खांडेकर हे शिक्षकी पेशातील, सतत दारिद्र्याशी झुंज देत असलेले सात्त्विक प्रकृतीचे गृहस्थ होते. साहित्य हे मनात उच्च हेतू ठेवून लिहिले गेले पाहिजे अशी त्यांची धारणा होती.
पंचविसावे साहित्य संमेलन (Twenty Fifth Marathi Literary Meet – 1940)
पंचविसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ना. सी. फडके हे होते. ते संमेलन रत्नागिरी येथे 1940 साली भरले होते. ना. सी. फडके यांची जनमानसात प्रतिमा प्रतिभासंपन्न, चतुरस्त्र लेखन करणारा लोकप्रिय साहित्यिक अशी होती.
चोविसावे साहित्य संमेलन (Twenty fourth Marathi Literary Meet – 1939)
नगर येथे 1939 साली भरलेल्या चोविसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष महामहोपाध्याय पद्मभूषण दत्तो वामन पोतदार हे होते. ते इतिहाससंशोधक होते. ते पट्टीचे वक्ते होते.
तेविसावे साहित्य संमेलन (Twenty Third Marathi Literary Meet – 1938)
मुंबई येथे भरलेल्या तेविसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होते. विज्ञाननिष्ठ, प्रखर बुद्धिवादी आणि तरीही कविहृदयाचे ते प्रचंड ताकदीचे लेखक. त्यांनी संपूर्ण आयुष्य देशसेवेत अर्पण केले.