Home Search

रायगड - search results

If you're not happy with the results, please do another search

अचलपूर – आधुनिक नाट्यपंढरी (Achalpur – The origin of Marathi stage)

अचलपूरला समृद्ध नाट्यपरंपरा लाभली आहे. विदर्भातील कालिदास आणि भवभूतींसारख्या नाट्य विभूतींनी नाट्यक्षेत्रात अजरामर कार्य केल्यानंतर तेथे आधुनिक रंगभूमी रुजली. अचलपुरातील बहुतेक नाट्यगृहे ही नाटके सादर करणाऱ्या मंडळांची स्वतःची आहेत. विशेष म्हणजे अचलपूरच्या जुन्या संस्था रंगमंचाची पूजा करताना नाटकांतील स्त्रीपात्रांचीही पूजा करत. कालौघात ती नाट्यगृहे नाहीशी झाली, पण नाट्यगृहांच्या समोरील मंदिरे जोरात चालू आहेत…

प्रभाकर अंबिके -सिमेंट-क्राँक्रिटमधील साहित्यसंस्कृती (Prabhakar Ambike – Literary culture in New Mumbai)

प्रभाकर अंबिके यांनी नव्या मुंबईची ‘सिडको’ नगरी वसवण्यात मोठाच वाटा उचलला. त्यांनी सिमेंटकाँक्रिटच्या नव्या वसाहतीत साहित्यसंस्कृती रुजवण्याचा आग्रह धरला ही गोष्ट आम्हा नवी मुंबईवासीयांच्या मनी विशेष कोरली गेली आहे...

Map Raigad

सोबतच्या यादीतील तालुक्यावर क्लिक करून त्या तालुक्यातील लेख वाचता येतील. पनवेल पेण कर्जत खालापूर उरण अलिबाग सुधागड माणगाव रोहा मुरूड श्रीवर्धन म्हसळा महाड पोलादपूर ...

सीडींना अर्थशास्त्रातील प्राविण्य लाभले कोठे? (Biographical writing about C D Deshmukh – a missing...

'लोकसत्ता' दैनिकाने सीडी ऊर्फ चिंतामणराव देशमुख ह्यांच्या कार्याचा वेध घेणारा एक विशेषांक त्यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त, प्रसिद्ध केला आहे (30 मे 2021). तो वाचताना मला त्यात काही उणिवा जाणवल्या. वाटले, इतक्या महान व्यक्तीचे कार्य ग्रंथित करताना, तो अंक सत्याधारित, सर्वसमावेशक आणि सखोल संशोधनपूर्वक व्हायला हवा होता. महाराष्ट्रात सीडींबद्दल आदर व प्रेम आहे. ते अर्थशास्त्रावर अधिकारवाणीने लिहू/बोलू शकणारे मान्यवर आहेत. तेव्हा सीडींना अर्थशास्त्रात जे प्राविण्य प्राप्त झाले ते त्यांनी कोठे व केव्हा मिळवले?...

देवरुखचे शहीद स्मारक : कोकणातील एकमेव, अद्वितीय ! (Devrukh’s unique Martyr’s Memorial in Konkan)

0
सैनिकी परंपरा घाटावर अनेक गावांत दिसते, तशी ती कोकणात नाही. रायगड येथील सैनिकी शाळा वगळता अन्य ठिकाणी तशी शाळा नाही. तरी देवरुख येथे 2018 साली शहीद स्मारक तयार करण्यात आले. ते कोकणाच्या पाच जिल्ह्यांतील एकमेव स्मारक आहे आणि ते वैशिष्ट्यपूर्ण आहे. शहीद स्मारकच्या जोडीला तयार करण्यात आलेले परमवीर चक्र दालन आणि सैनिक मानवंदना उद्यान तर कोकणाची ओळख होऊ पाहत आहे !...

समर्थ रामदासांची स्थाने (Saint Ramdas left footprints at many a places)

समर्थ रामदास यांचे प्रभू रामचंद्र हे परमदैवत; तसेच, रामदास हे हनुमानाचे परमभक्त. समर्थांच्या जीवनाशी निगडित महाराष्ट्रातील काही स्थाने...

गोविंद भागा कांबळे (Govind Bhaga Kambale and Mahar Regiment of Indian Army)

0
स्वतंत्र भारताने पाच युद्धे लढली. त्यांपैकी 1962 साली चीन बरोबर झालेले युद्ध हे पराभूताचा इतिहास म्हणून ओळखले जाते. तरीही त्या युद्धात भारतीय सैनिकांचे शौर्य समोर आले.

सिन्नरचा नटसम्राट मस्तान मणियार (Sinnar’s Stage Activity And Mastan Maniyar)

नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील वडांगळी हे गाव सांस्कृतिक दृष्ट्या पुढारलेले; तेथील प्रथा-परंपरा आगळ्यावेगळ्या. तेथील हौशी नाट्यचळवळही शंभर वर्षांहून जुनी. तो वारसा प्रत्येक पिढीने नेटाने पुढे चालवला आहे.

कानसेसरांचे विद्यार्थी त्यांची मुले झाली (Experiment in Online Education)

शिक्षक, विद्यार्थी आणि शाळा यांच्या नात्यामध्ये, अध्यापन करताना घडणाऱ्या क्रिया-आंतरक्रिया महत्त्वाच्या असतात. शिक्षकांची प्रत्येक हालचाल मुलांचे कौतुक करताना, त्यांना समजावून सांगताना, प्रसंगी चुकल्यास त्यांना दटावताना, बोलत असते.

विसावे साहित्य संमेलन (Twentyth Marathi Literary Meet 1934)

साव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नारायण गोविंद ऊर्फ नानासाहेब चापेकर हे होते. संमेलन बडोदे येथे 1934 साली भरले होते. त्या संमेलनातच कृष्णराव मराठे यांनी अश्लीलतेविरुद्धचा ठराव आणला होता.