Home Search

भटकंती - search results

If you're not happy with the results, please do another search

स्थलांतरित मुलांचे शिक्षण – दौंडचा अनुभव (Education of Migrant Children -Daund’s Experience)

शालेय मुलांचे ऑनलाईन शिक्षण लॉकडाऊनमुळे 2020 मध्ये सुरू झाले, परंतु स्थलांतरित मुलांच्या शिक्षणाची मोठी अडचण निर्माण झाली. तशा मुलांच्या अनेक झोपड्या नांदूर गावात कोरोनाच्या सर्वेक्षणाच्या निमित्ताने जुलै 2020 महिन्यात दिसून आल्या. परंतु ऊसतोडीला पालकांबरोबर दिवसभर गेलेली ती मुले संध्याकाळीच माघारी येत. त्यांचे सर्वेक्षण करणे कठीण होते...

कल्याणचे प्रेरक, साहसी अवि सर (Kalyan’s Avirat Shete Inspires Students & Young ones)

कल्याणचे अविरत शेटे हे विद्यार्थ्यांचे लाडके ‘अवि सर’ आहेत. ते त्यांच्या जिवाची धन्यता युवापिढी व विद्यार्थी यांना प्रेरणा देण्यात मानतात. ते साहसी आहेत आणि आव्हाने स्वीकारण्यास नावाप्रमाणेच सतत तयार असतात.

साहित्यव्रती – अशोकदेव टिळक (Ashokdev Tilak’s Contribution to Marathi Literature)

आधुनिक मराठी पंचकवींतील कविवर्य नारायण वामन टिळक आणि साहित्यलक्ष्मी लक्ष्मीबाई टिळक हे आजी-आजोबा. कवयित्री असलेली आजोबांची आई जानकी वामन टिळक ही पणजी. काही भक्तिगीतं आणि स्वत:च्या आईवडिलांच्या 'खिस्तायना'चा समारोपाचा अध्याय लिहिणारे, 'महाराष्ट्राची तेजस्विनी- पंडिता रमाबाई'

उद्धव महाराजांचे वाठार (How Wathar is connected with saint Eknath!)

बुवांचे वाठार हे सांगलीपासून जवळ असलेले गाव प्रसिध्द आहे. ते कोल्हापूर जिल्ह्यात येते. उद्धव महाराजांचे वास्तव्य वाठार या गावी होते. हे उद्धव महाराज म्हणजे एकनाथांचे नातू. वाठार गाव निसर्ग संपन्न आहे.

सतरावे साहित्य संमेलन (Seventeenth Marathi Literary Meet – 1931)

हैदराबाद येथे भरलेल्या सतराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्ञानकोशकार डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर हे होते. केतकर हे मराठी भाषेतील कोशयुगाचे प्रवर्तक होत. त्यांचे आयुष्य ज्ञानाच्या उपासनेतच व्यतित झाले. त्यांनी ‘गोविंदपौत्र’ या टोपणनावाने कविता लिहिल्या...

कुकटोळीचा दुर्लक्षित गिरीलिंग डोंगर (Giriling Neglected mountain temple in sangli District)

गिरीलिंगचा डोंगर सांगली जिल्ह्याच्या कवठेमहांकाळ तालुक्‍यातील कुकटोळी गावाजवळ आहे. त्या डोंगरावर चढणे तसे अवघड आहे. जाण्यासाठी आता रस्ता झाला आहे, त्यावरून पायी जाता येते.  डोंगरमाथ्यावर पोचल्यानंतर सात-आठ पायऱ्या चढून गेल्यावर महादेवाचे पूर्वाभिमुख मंदिर दिसते. मंदिर पुरातन आहे; मंदिरावरील शिखर मात्र पुरातन वाटत नाही.

सांगलीचे सायकलिंग जगाशी जोडलेले! (Bicycle is trending in Sangali)

सायकल हा नवा ट्रेंड समाजामध्ये तंदुरुस्तीसाठी म्हणून रुजत, वाढत आहे. सायकलस्वारी (सायकलिंग) हा खेळ, छंद, हौस म्हणून सर्वत्र मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. सायकल हे वाहन अनेक वाहनांच्या गलबल्यात स्थानिक प्रवास, छोट्या जा-ये करण्यासाठीदेखील उपयुक्त ठरत असल्याची जाणीव पुन्हा जनमनावर ठसत आहे...

ओरायन, आर्क्टिक होम : टिळक यांची बौद्धिक झेप (Orion And Arctic Home in The...

स्वातंत्र्यपूर्व भारताच्या खदखदणाऱ्या राजकारणात आत्यंतिक महत्त्वाची भूमिका बजावत असतानाही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे ‘द ओरायन’ आणि ‘द आर्क्टिक होम इन वेदाज्’ या ग्रंथांसाठीचे संशोधन करत होते! ते संशोधन म्हणजे त्यांच्या बुद्धिकौशल्याची चुणूक आहे.

नवाश्मयुग (Navashmayug)

मानवी जीवनातील उत्क्रांतीच्या टप्प्यातील पाषाणयुगाचा कालखंड हा सर्वात मोठा कालखंड आहे.  पाषाणयुगाची विभागणी केली असता पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग असे तीन टप्पे पडतात. नवाश्मयुग हा अश्मयुगाचा उत्तरार्ध होय. 

भीक – भिक्षा : संस्कार व समाजव्यवस्थेतील सोय (Begging Has Cultural Shade)

गरजवंत मनुष्य गरज भागण्यासाठी दुसऱ्याकडे गरजेच्या वस्तूची मागणी करतो, हात पसरतो. म्हणजे याचना करतो. त्याला ‘भीक मागणे’ असे उपहासाने म्हटले जाते. ज्याला मागण्यास लाज वाटते, शरम वाटते, संकोच वाटतो त्याला सल्ला दिला जातो, की ‘भीक मागता येत नसेल तर विडी ओढायला शीक.’