Home Search

धर्म - search results

If you're not happy with the results, please do another search

गणितातील गोडवा (Melody in Mathematics)

2
गोव्याचे गणित शिक्षक, कवी, नाटककार मुकेश थळी यांचा ‘सौंदर्यशास्त्र गणिताचे’ हा लेख आपण यापूर्वी वाचला आहे. आज मुकेश थळी सांगत आहेत गणितात दडलेल्या सुरेल गोडव्याविषयी. गणिताविषयीचे गैरसमज दूर व्हावेत, गणितातल्या काही संकल्पनांचा परिचय व्हावा, या संकल्पना कुठे, कशा उपयोगात आणल्या जातात हे सांगावे हा या लेखांचा उद्देश आहे. एका सजग शिक्षकाने गणित शिकवताना केलेल्या गमतीही समजतील. शाळा-कॉलेजच्या दिवसांनतर गणिताचा हात सुटतो. त्याची या लेखांच्या निमित्ताने आठवण व्हावी इतकेच...

गुढीपूर – काल आणि आज

मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना कुडाळमध्ये पिंगुळी हे छोटे कलाग्राम आहे. या पिंगुळी गावात गुढीपूर नावाची ठाकर लोककलाकारांचीची वाडी आहे. ठाकर लोककलाकारांमध्ये पिंगळी, पांगुळ, गोंधळी व बावलेकर असे लोककलाकार आहेत. ते सगळे एकाच समूहाचा भाग असले तरी लोककलेच्या सादरीकरणामधली त्यांची कामे आणि साधने वेगवेगळी आहेत. गुढीपूर वाडीविषयी, तेथील लोककलाकारांविषयी, कलेविषयी आणि जगण्याच्या धडपडीविषयी आत्मियतेने सांगताहेत पिंगुळी, चित्रकथी या लोककलेच्या अभ्यासक माणिक वालावालकर...

नाटककार-संपादक विद्याधर गोखले

1
विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दीचे 2024 हे वर्ष आहे. 1960 ते 1980 ही दोन दशके मराठी संगीत नाटक म्हणजे विद्याधर गोखले असे जणू समीकरणच होते. मराठी संगीत नाटक ही मराठी संस्कृतीलाच नव्हे तर जागतिक रंगभूमीला असलेली देणगी आहे. गोखले यांनी पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर अध्यापन काही वर्षे केले. त्यानंतर त्यांनी ‘दैनिक लोकसत्ता’मध्ये नोकरी पत्करली. अनेक वर्षे ‘लोकसत्ता’मध्ये काम करून पत्रकारितेमधील कारकीर्द गाजवली. त्यांनी ‘लोकसत्ता’मध्ये संपादक म्हणूनही जवळजवळ पाच वर्षे काम केले...

गोविंद विनायक करंदीकर ऊर्फ विंदा करंदीकर (Vinda Karandikar)

0
मराठीतल्या मोजक्याच ज्ञानपीठ विजेत्यांपैकी असलेल्या विंदा करंदीकर यांचे साहित्यिक कर्तृत्व मोठे आहे. अमृतानुभवापासून ते नवकवितेपर्यंत त्यांची प्रतिभा आणि लेखणी लीलया फिरली आहे. त्यांनी कवितेच्या आशयामध्ये आणि रूपबंधांमध्ये अनेक प्रयोग केले. जबाबदारीच्या भावनेतून, मराठीच्या अभ्यासकांसाठी भाषांतरे केली. अशा या चतुरस्त्र साहित्यिकाची 14 मार्च रोजी पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने गीता जोशी यांनी विंदांच्या साहित्याचा धावता आढावा घेतला आहे...

स्त्रीपुरूष तुलना – काल आणि आज (Comparing Men and Women – Yesteryears...

ताराबाई शिंदे यांचा ‘स्त्रीपुरूष तुलना’ हा निबंध सन 1882 मध्ये प्रकाशित झाला. एका विधवा स्त्रीने केलेल्या भ्रूणहत्येमुळे खवळून उठलेल्या आणि त्या स्त्रीला धारेवर धरणाऱ्या समाजावर धारदार लेखणीने ताराबाईंनी या निबंधात अक्षरश: कोरडे ओढले आणि त्यावर मीठही चोळले. हिंदू शास्त्र-पुराणांविषयी आणि देवादिकांविषयी तर त्यांचे विचार असे जहाल आहेत की ते वाचताना आज त्या हयात नाहीत हे लक्षात येऊन हायसे वाटते. त्या स्वदेशी उद्योगधंद्यांच्या -हासाचीही चिकित्सा करतात...

माणूसपणाच्या वाटेवरील प्रवासी

कुमार शिराळकर हे डाव्या विचारांचे कार्यकर्ते होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या मुख्यत: सीटू या कामगार युनियनचे कार्यकर्ते यांनी मिळून ‘माणूसपणाच्या वाटेवरील प्रवासी’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ औरंगाबाद येथे 7 जानेवारी रोजी आयोजित केला होता. या पुस्तकात ‘मागोवा’च्या मित्रमंडळींना कुमार कसा दिसला याची मांडणी पाच लोकांनी केली आहे आणि बाकी दहा लेख हे आदिवासी कार्यकर्ते व युनियनमधील कार्यकर्ते यांनी लिहिलेले आहेत. प्रत्येक लेख हा कुमारबद्दलच्या कृतज्ञतेने गहिरून लिहिलेला आहे...

मी पाहिलेले दैनिकांचे संपादक

रवींद्र पिंगे यांचा दैनिकांच्या संपादकांबद्दलचा जुना लेख. त्यात ते म्हणतात, दैनिकांची वाट पाहणाऱ्यांपैकी मी नव्हेच नव्हे. दैनिके चार दिवस दिसली नाहीत तर माझे मन बिलकुल अस्वस्थ होणार नाही. अनेकदा, वर्तमानपत्र घरात येऊनही मी इतर व्यापांमुळे त्यांच्याकडे पाहतसुद्धा नाही. गेल्या अर्धशतकात मी जी काही वर्तमानपत्रे वाचली, त्यात तीन संपादकांची शैली मला अप्रतिम वाटली: फ्रँक मोराईस, रावसाहेब पटवर्धन आणि ग. प्र. प्रधान. त्यांच्यात अभिजात असा खानदानीपणा आहे. भाषाप्रभुत्व असामान्य आहे. विचारांना नैतिक अधिष्ठान आहे. आविष्कार सौम्य आहे. आवाहन आहे. आव्हान नाहीच आणि आग्रहाचे नावच नाही. तसे घरंदाज लेखन मला भुरळ घालते...

विद्याधर गोखले : एक हजरजबाबी व्यक्तिमत्त्व !

आपल्याकडे पराभूत उमेदवारानं संमेलनाकडे फिरकायचं नसतं, अशी रीत आहे. त्या दृष्टीनं गोखले बंडखोर, पुरोगामी प्रवृत्तीचे; रीतीभातींना ते जुमानत नाहीत ! खिलाडूपणा रोमरोमी भिनलेला...

करावे गावातील तांडेलवाडा (Tandel Vada in Karave Village, New Mumbai)

नव्या मुंबईतील ‘करावे’ नावाच्या गावात तांडेल कुटुंबाचा तब्बल चाळीस खोल्यांचा वाडा आहे. सन 1770 च्या सुमारास बांधलेल्या ह्या वाड्याचे सागवानी लाकडाचे बांधकाम सुस्थितीत आहे आणि वाडा नांदता आहे. तेथे पूर्वीइतकी माणसे रहात नसली तरी सामाजिक, धार्मिक उत्सव उत्साहाने साजरे होतात. एकत्र कुटुंबपद्धतीची जागा विभक्त कुटुंब पद्धतीने घेऊनही चार पिढ्या लोटल्या आहेत, तरीही समाजमनाला एकत्र कुटुंब पद्धतीचे एक सुप्त आकर्षण आहे. जुन्या देशी बांधकामाचा नमुना म्हणूनही ह्या वाड्याचे महत्त्व आहे आणि म्हणून तो जतन करणेही आवश्यक आहे...

अर्थशास्त्राचे आद्य चार ग्रंथ (The first four books of Economics In Marathi)

मराठीतील अर्थशास्त्राविषयीचे पहिले चार ग्रंथ 1843 ते 1855 या दरम्यान, म्हणजे 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धापूर्वी आणि कंपनी सरकारचा अंमल जाऊन ब्रिटिश पार्लमेंटचा भारतावर अंमल येण्याआधी लिहिली गेली आहेत. मुंबई विद्यापीठ 1857 साली स्थापन झाले. त्यापूर्वी मराठीतून ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी निसर्गविज्ञानाची व मानवविज्ञानाची पुस्तके लिहिणारे लेखक त्यांच्या काळातील ज्ञान मराठीतून लोकांना देत होते ! या चार ग्रंथांमध्ये अर्थशास्त्राविषयी मांडलेले विचार, त्या काळात मराठी वाचकांना फार नवे होते...