Home Search
जत्रा - search results
If you're not happy with the results, please do another search
बहिरमचं झगमग स्वप्न
ऋणमोचन आणि बहिरम या जत्रा वऱ्हाडीतील प्रसिद्ध म्हणाव्या अशा आहेत. लेखक मधुकर केचे यांनी बहिरमच्या यात्रेचे वेधक असे चित्रण त्यांच्या लेखनातून केले आहे. त्यांनी या जत्रेचे वर्णन सातपुड्याच्या पायथ्याशी महिनाभर मुक्कामाला येणारे एक झगमग स्वप्न असे केले आहे...
…आणि भैरवनाथाच्या धडका बंद झाल्या!
दलितांकरवी फलटण तालुक्याच्या गुणवरे आणि जावली या गावांत धडका घेण्याची अघोरी प्रथा दीडशे वर्षांपासून सुरू होती. ती अमानुष प्रथा नष्ट करण्यासाठी महादू गेणू आढाव या लढाऊ कार्यकर्त्याने दलित बांधवांची मोट बांधून, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने कसोशीचे प्रयत्न केले. अखेरीस प्रशासकीय यंत्रणेच्या साहाय्याने धडका प्रथा बंद करण्यात यश 2006 साली मिळाले...
पुरोगामी विचारांचा वारसा – सासकल
फलटण तालुक्यातील सासकल हे एक छोटेसे गाव. त्या गावातील ग्रामस्थ ग्रामविकासाबाबत सजग आहेत. पारंपरिक धर्मभावनेला आधुनिक विचारांची जोड देणाऱ्या सासकल या गावाने त्याचा ठसा क्रीडा क्षेत्रातही आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला आहे...
रतनबाई – तरुण विवाहितेचे शब्दचित्र
हिंदुस्थानी महिलेने लिहिलेले आणि इंग्लंडमध्ये प्रकाशित झालेले पहिले पुस्तक मराठी लेखिकेचे होते. ते लंडनमध्ये 1895 साली प्रसिद्ध झाले. त्या पुस्तकाचे नाव Ratanbai - A Sketch of a Bombay High Caste Young Wife. त्या पुस्तकाच्या लेखक शेवंतीबाई निकंबे या होत्या. पुस्तकाच्या सतरा आवृत्त्या 1895 ते 2017 या काळात निघाल्या...
अचलपूर तालुका
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर ही धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेली प्राचीन भूमी ! अचलपूर शहरावर मोगल, मराठा आणि निजाम अशा तिघांनी राज्य केले. पूर्वी या शहराचे नाव नौबाग होते. ती नाग देवांची जन्मभूमी, म्हणून नौबाग नाव पडले अशी आख्यायिका आहे...
Competitions
थिंक महाराष्ट्र डॉट कॉम
मराठी राजभाषादिनानिमित्ताने जाहीर करत आहोत
अचलपूर, बदनापूर, शेवगाव, फलटण व दापोली तालुक्यासंबंधी
लेख आणि लघू माहितीपट स्पर्धा
विषय - वरील पाच तालुक्यांतील कोणतेही गाव,...
मोराणे सांडस : काय कमावले, काय गमावले ! (Morane Sandas- Village in change)
मोराणे सांडस हे माझे आजोळ; म्हणजे मामाचे गाव. ते नाशिक जिल्ह्याच्या सटाणा (बागलाण) या तालुक्यात आहे. मोराणे हे फड बागायती असणारे संपन्न गाव होते. हे टुमदार खेडे मोसम नदीच्या तीरावर वसले आहे. ते सटाणा या तालुक्याच्या गावापासून वीस किलोमीटर अंतरावर आहे...
माहिती संकलन मोहीम – 2023
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ वेबपोर्टलचा आरंभ करत असताना, ते पोर्टल जगातील देश-प्रदेशांना जागतिकीकरणाच्या लाटेत मॉडेल ठरू शकेल असा विश्वास होता. साहित्य जमा होत गेले...
किल्ले भवानीगड : संगमेश्वर तालुक्याचा पहारेदार (Sangameshwar’s Bhavanigad fort)
भवानीगड हा भुईकोट ह्या प्रकारात येणारा किल्ला आहे. किल्ले भवानीगड हा शिवकाळात टेहळणी गड म्हणून महत्त्वाचा होता. त्या गडाच्या आसपास किल्ले महिपतगड आणि किल्ले प्रचीतगड हे दोन महत्त्वाचे किल्ले येतात. तसेच, राणी येसुबार्इंचे माहेर असलेले शृंगारपूर गाव आणि संभाजी राजांच्या कारकिर्दीत सरसेनापती असलेले म्हाळोजी घोरपडे यांचे कारभाटले ही गावेही हाकेच्या अंतरावर आहेत. त्यामुळे किल्ले भवानीगड त्या सगळ्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी उपयोगात येत असे...
मसुरे- वाड्यांचे गाव (Masure – Scenic Village)
मसुरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील गाव. गाव मालवणपासून सतरा किलोमीटरवर आहे. त्या गावाला छान निसर्गरम्य परिसर लाभला आहे. मशहूर या नावाचे हे गाव...