Home Search

कवितासंग्रह - search results

If you're not happy with the results, please do another search

वावटळ : ग्रामीण दुःखाचे वास्तव चित्रण (Vavtal – Representative Poetry collection of rural life)

‘वावटळ’ हा प्राध्यापक द.के. गंधारे यांचा पहिला काव्यसंग्रह कवितेच्या दालनात आत्मविश्वासाने प्रवेश करतो. ‘वावटळ’मधील कविता ग्रामीण वास्तवाला साक्षात करते. काटेवनाची मोठी अरण्ये जागतिकीकरणानंतर झाली आहेत. त्यांतील अडचणींच्या वावटळींनी अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. तीच वावटळ गंधारे यांच्या कवितेतून साकार झाली आहे. कवी बालपणापासून ग्रामीण जीवनाशी एकरूप झालेला आहे. त्यामुळे त्याच्या अनुभवांनी त्याच्या कवितांत प्रातिनिधिक रूप धारण केले आहे...

संघर्षवाटा – आंबेडकरी राजकारणाचे ताणेबाणे (Dalit politics analyzed in the book)

डॉ. संजय दामू जाधव यांचा एका दशकाचा विविधांगी अनुभव ‘संघर्ष वाटा’ या पुस्तकात शब्दबद्ध झाला आहे. जाधव यांनी अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून जे यश संपादन केले आणि त्यासाठी जो संघर्ष केला त्याचे चित्रण पुस्तकात वाचण्यास मिळते.

पुस्तकांचा सुकाळ वाचकांचा दुष्काळ (Marathi books in plenty but readers are scarce)

4
वाचकांच्या तीन पायर्‍या असतात- जे उपलब्ध होईल ते वाचणारे भाबडे वाचक, अभिरुचिसंपन्न वाचक आणि उच्च अभिरुचिसंपन्न वाचक. पहिल्या पायरीवरील वाचक प्रगती करत तिसर्‍या पायरीवर जाऊ शकतो...

नदीष्ट – नदीकाठच्या निसर्गाची निरागसता (Nadishta – Marathi novel that depicts life along the...

कवी मनोज बोरगावकर यांनी त्यांच्या नदीकाठच्या वेगवेगळ्या जीवनानुभवांची गाथा ‘नदीष्ट’ या कादंबरीतून साकार केली आहे. नदीकाठचे जनजीवन तेथील अनेकस्तरीय तळकोपऱ्यांसह कादंबरीत अधोरेखित झाले आहे. माणसाने त्याचे निसर्गाशी असणारे नाते जवळपास संपुष्टात आणले आहे. त्याने नद्यांच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळे आणले, भरमसाठ वाळू तिच्या उदरातून उपसली, पाणी दूषित केले. जंगले तोडून टाकली.

सत्ताविसावे साहित्य संमेलन (Twenty Seventh Marathi Literary Meet – 1942)

सत्ताविसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे होते. ते संमेलन 1942साली नाशिक येथे भरले होते. अत्रे हे महाराष्ट्राचे हसते-खेळते, चैतन्यदायी, 'प्रचंड' व्यक्तिमत्त्व होय. त्यांनी वाङ्मयाचे वेड जीवनाच्या आनंदामधून आयुष्यभर जपले, जोपासले व स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा मराठी वाङ्मयावर, संस्कृतीवर, मराठी वृत्तपत्रसृष्टीवर, मराठी बोलपटांवर आणि मराठी नाटकांवर उमटवला.

अबब! पंधरा हजार कार्टून्स!… जयवंत काकडे (Jayvant Kakade – The Cartoonist from Warora-Chandrapur)

व्यंगचित्रकार जयवंत काकडे यांनी तब्बल पंधरा हजारांवर कार्टून्स, रेखाचित्रे आजतागायत काढली आहेत. ते रेषांचे अवलिया म्हणूनच ओळखले जातात. त्यांची कार्टून्स महाराष्ट्रातील व बाहेरील शंभरांहून अधिक नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाली आहेत.

स्मरण, यशवंतांच्या महाराष्ट्र गीताचे (Lyric Yashwanta’s Dedicated Poetry to the State of Maharashtra)

कोरोनाच्या या प्रदीर्घ काळात वातावरण चिंताग्रस्त आहे. आजारपणाच्या बातम्या सतत येत असतात आणि मनात भेटण्याची ओढ वाटत असूनही कोरोनाच्या विचित्र परिस्थितीमुळे कोणी कोणाला भेटण्यास जात नाही.

गडकरी – नाटककाराची विविधांगी प्रतिभा (Tribute to playwright Ram Ganesh Gadkari)

राम गणेश गडकरी हे नाटककार म्हणून त्यांच्या अलौकिक प्रज्ञेने, प्रतिभाविलासाने, भाषावैभवाने मराठी साहित्यसंस्कृती जगतात वेगळे उठून दिसतात. मराठी नाट्यपंचायतन असे किर्लोस्कर, देवल, कोल्हटकर, खाडिलकर व गडकरी या पाच जणांना म्हटले जाते.

दुसरे सरफोजी – तंजावूरचे अखेरचे मराठा राजे (Sarfoji, the second – Thanjavur’s last Maratha...

दुसरे सरफोजी राजे यांची तंजावूरमधील कारकीर्द तेथील मराठी प्रभावाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. तंजावूर हे दक्षिण भारतातील प्रसिद्ध नगरराज्य आहे. ते चेन्नईपासून दोनशेअठरा मैल, तर कुंभकोणमपासून चोवीस मैल अंतरावर आहे.

भाषा: लोकसंस्कृतीचे वाहन (Culture expresses itself through Language)

10
भाषा हे लोकसंस्कृतीचे वाहन आहे. भाषेचा जन्म लोकसंस्कृतीतून होत असतो. लोकसंस्कृतीतील वस्तूंचा जसजसा लोप होऊ लागतो तस तसा त्या संदर्भातील भाषेचाही र्‍हास होऊ लागतो व भाषा नवे रूप घेते.