Home Search

कथासंग्रह - search results

If you're not happy with the results, please do another search

सव्विसावे साहित्य संमेलन (Twenty Sixth Marathi Literary Meet – 1941

सव्विसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विष्णू सखाराम ऊर्फ भाऊसाहेब खांडेकर हे होते. ते संमेलन 1941 साली सोलापूर येथे झाले. खांडेकर हे शिक्षकी पेशातील, सतत दारिद्र्याशी झुंज देत असलेले सात्त्विक प्रकृतीचे गृहस्थ होते. साहित्य हे मनात उच्च हेतू ठेवून लिहिले गेले पाहिजे अशी त्यांची धारणा होती.

पंचविसावे साहित्य संमेलन (Twenty Fifth Marathi Literary Meet – 1940)

पंचविसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ना. सी. फडके हे होते. ते संमेलन रत्नागिरी येथे 1940 साली भरले होते. ना. सी. फडके यांची जनमानसात प्रतिमा प्रतिभासंपन्न, चतुरस्त्र लेखन करणारा लोकप्रिय साहित्यिक अशी होती.

कवी यशवंत यांच्या ‘आई’ची शताब्दी (Hundred Years of a Poem titled Aai by Yashwant)

कवी यशवंत यांनी ‘आई’ ही कविता 1922 साली लिहिली, त्यास शंभर वर्षे होत आली. या प्रदीर्घ काळात प्रत्यक्षातील आई पार बदलून गेली आहे, पण त्या कवितेची गोडी काही कमी झालेली नाही. ‘आई कुणा म्हणू मी?

साहित्यव्रती – अशोकदेव टिळक (Ashokdev Tilak’s Contribution to Marathi Literature)

आधुनिक मराठी पंचकवींतील कविवर्य नारायण वामन टिळक आणि साहित्यलक्ष्मी लक्ष्मीबाई टिळक हे आजी-आजोबा. कवयित्री असलेली आजोबांची आई जानकी वामन टिळक ही पणजी. काही भक्तिगीतं आणि स्वत:च्या आईवडिलांच्या 'खिस्तायना'चा समारोपाचा अध्याय लिहिणारे, 'महाराष्ट्राची तेजस्विनी- पंडिता रमाबाई'

सोळावे साहित्यसंमेलन (Sixteenth Marathi Literary Meet – 1930)

मडगाव (गोवे) येथे भरलेल्या सोळाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते ‘रागिणी’कार वामन मल्हार जोशी. कादंबरीकार वि.स.खांडेकर यांनी वामन मल्हार यांचा ‘नैतिक उंचीचा आदर्श’ असा उल्लेख केला होता. वामन मल्हार यांचे सर्व साहित्य हे सजीव ध्येयवादाने भारलेले आणि विचारांना प्रेरणा देणारे होते. त्यांच्या कादंबऱ्यांतून नवी स्त्री आणि स्त्रियांच्या प्रश्नांची जाणीव प्रभावीपणे व्यक्त झाली आहे...

मागील पिढीवरील वाचन संस्कार (Reading – key to the personality development)

4
मराठी भाषाभ्यासासाठी वि.स. खांडेकर, आचार्य अत्रे वगैरे दिग्गजांनी संपादित केलेली पाठ्यपुस्तके जुन्या पिढीत होती; खेरीज पुरवणी वाचनासाठी नेमलेली अवांतर पुस्तके असत. त्यातील गद्य विभाग हे गद्य बिलकुल नव्हते, तर अतिशय रोचक आणि समृद्ध होते. त्यातील साहित्याची विविधता तेव्हा जाणवली नाही, पण आता ती आठवली, की स्तिमित व्हायला होते.

बालगिर्यारोहक शर्विका म्हात्रे – विक्रमच विक्रम! (Sharvika Mhatre – child she is but walks...

शर्विका म्हात्रे महाराष्ट्राची ‘हिरकणी’ म्हणून ओळखली जाते ! तिने दीड वर्षे वयापासून गिर्यारोहण क्षेत्रात पदभ्रमणाला सुरुवात केली. तिने त्यांनंतर अडीच वर्षात म्हणजे वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत गिर्यारोहण क्षेत्रातील यशाचे शिखर गाठले.

झाडीपट्टीतील वाडे : एका लुप्त संस्कृतीचे दर्शन (Remnants of Palace’s Show History of Zadipatti...

झाडीपट्टी म्हणजे पूर्व विदर्भ. जुन्या सी.पी. ॲण्ड बेरार प्रांतामधील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली हे चार जिल्हे; तथा सध्याच्या महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्याचा मौदा-रामटेककडील काही भाग त्यात येतो.

नासिकचा प्राणवायू विश्वाला! (Nasik Area Has Exclusive Vegetation)

नासिक शहरात इतिहास विपुल प्रमाणात असण्याचे कारण आहे तेथील भौगोलिक परिस्थिती, जैवविविधता अन् भरपूर आयुर्वैदिक वनस्पती, दुर्मीळ फुले, शुद्ध हवा...यांमुळे रूग्णांना नासिकला राहण्याचे सूचित केले जाते.

तोरणमाळ: खानदेशचे सौंदर्य! (Toranmal : Hill Station From Khandesh)

तोरणमाळ हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे पर्यटनस्थळ. महाबळेश्वर हे पहिले. तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्याच्या शहाद्याच्या उत्तरेस सातपुडा पर्वतात आहे. ते धडगाव तालुक्यात येते. ते नंदुरबारपासूनपंच्याण्णव किलोमीटर अंतरावर आहे.