Home Search

शिल्प - search results

If you're not happy with the results, please do another search
_Katalshilpe_2.jpg

कोकणातील कातळशिल्पे

कोकणात रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये कातळशिल्पांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. इंग्रजीमध्ये त्याला पेट्रोग्लिफ असा शब्द आहे. कातळावर ठरावीक अंतराची चौकट खोदून घेतली जाते...
carasole

मनमोकळी ‘निळ्या डोळ्यांची’ लेखिका शिल्पा कांबळे

‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ या कादंबरीची लेखिका शिल्पा कांबळे हिचा खरेपणा प्रथमदर्शनीच जाणवतो. ती वागण्यात नम्र पण विचारांनी बेधडक असल्याचेही स्पष्ट जाणवते. तिने ‘मराठी युवा...
carasole

अद्भूत शिल्पकृतींचे भुलेश्वर मंदिर (Bhuleshwar Temple)

पुण्यापासून पन्नांस किलोमीटर अंतरावर असलेले भुलेश्वर हे ठिकाण तेथे तेराव्या शतकात बांधण्यात आलेल्या शंकराच्या प्राचीन मंदिरासाठी ओळखले जाते. देवगिरी राजांच्या कालखंडात हेमाडपंथी मंदिरे मोठ्या...
carasole

खिद्रापूरचे कोपेश्वर शिवमंदिर – शिल्पकृतींचा साक्षात्कार

कोल्हापूरनजीकचे खिद्रापूर येथील कोपेश्वर शिवमंदिर म्हणजे भारतातील श्रद्धा व शिल्प संस्कृतीचा उत्तम नमूना आहे. रामायण, महाभारत, भौगोलिक विश्वसंस्कृती, प्रेम, साहित्य, पर्यावरण, वन्यजीव, स्थापत्य...
_Dipmala_Carasole

दीपमाळ – महाराष्ट्रीय शिल्पप्रकार

दीपमाळ हा महाराष्ट्रीय शिल्पप्रकार आहे. तो मंदिरवास्तूचा अविभाज्य घटक. महाराष्ट्रातील मंदिरांसमोर तसेच देवांच्या मूर्तीसमोर दिवे लावण्यासाठी जे दगडी स्तंभ उभारलेले असतात, त्यांना दीपमाळ असे...

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम (Dr. Bhau Daji Lad Museum- Glorious...

म्युझियम्स म्हणजेच वस्तुसंग्रहालये ही अनौपचारिक शिक्षणाची साधने असतात. समाजाच्या कर्तृत्वाची ओळख असतात आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वारसा सोपवण्याचे साधनही असतात. कलेतिहासाच्या अभ्यासक असलेल्या शर्मिला फडके क्रमश: मुंबईतील म्युझियम्सची आणि कलादालनांची ओळख करून देणार आहेत. त्यापैकी एक डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम. हे मुंबई शहरातील पहिले म्युझियम. ते काही काळ विस्मरणात जाऊन आता पुन्हा नव्या झळाळीने उभे राहिले आहे...

मुंबई नगरीतील महापालिका (Brihanmumbai Mahanagarpalika Building in Mumbai)

1
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या लांबलचक नावाच्या रेल्वेस्टेशनवर पहिल्यांदा उतरणारा माणूस अनेक गोष्टींना बिचकतो, चकित होतो. मग ती त्या स्टेशनची भव्य इमारत, तिथली गर्दी असो की स्टेशनबाहेर पडल्यावर दिसणारी मुंबई महापालिकेची इमारत ! स्टेशनच्या दोन्ही दिशांना अनेक वारसा इमारती म्हणजे हेरिटेज बिल्डिंग्ज आहेत, ज्या आवर्जून बघायला हव्यात. त्यातील अनेक इमारतींमध्ये सर्वसामान्य मुंबईकर काम करत असतात पण ते रोजच्या जगण्याच्या लढाईत इतके गुंतलेले असतात की स्वतःच्या कार्यालयाची इमारतही ते साक्षेपाने बघत नाहीत. ‘मुंबई नगरीतली महापालिका’ या लेखात मुंबई महापालिकेच्या भव्य ऐतिहासिक इमारतीचा इतिहास आणि वर्तमान स्थिती याविषयी माहिती दिली आहे...

जगाचे नेतृत्व करणारी दहा शहरे (The Cities that Led the World: From Ancient Metropolis...

‘द सिटीज् दॅट लेड द वर्ल्ड: फ्रॉम एन्शन्ट मेट्रोपोलिस टू मॉडर्न मेगासिटी’ हे पॉल स्ट्रॅदन लिखित पुस्तक जगातील दहा अस्तित्वात असलेल्या आणि नसलेल्या महानगरांच्या माध्यमातून जवळपास सहा हजार वर्षांच्या मानवी इतिहासाचा आढावा घेते. महानगरे ही संस्कृती-संकराची वाहक असतात. त्यांच्यामुळे मानवी संस्कृतीला आजचे रूप येत गेले आणि पुढेही येत राहील. या संस्कृतिकारणाचा शोध इसवी सन पूर्व चार हजार वर्षे बॅबिलॉन या शहरापासून सुरू होतो तो आजच्या बिजिंग आणि मुंबई या शहरांपर्यंत येऊन थांबतो. इतिहासाचा हा दीर्घ पल्ला आहे. या चित्तवेधक पुस्तकाचा परिचय करून देत आहेत नामवंत वास्तूविशारद आणि शहर नियोजनकार सुलक्षणा महाजन...

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (Chhatrapati Shivaji Maharaj Vastusangrahalay)

म्युझियम म्हणजेच वस्तुसंग्रहालय हे अनौपचारिक शिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या कलादालनात चित्रांचा अभ्यास करणारे विद्यार्थी पाहिले की या विधानाचा प्रत्यय येतो. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय हे मुंबई शहराचा मानबिंदू आहे. देशातील कला-इतिहास-संस्कृतीचा वारसा काळजीपूर्वक जतन करणारे आणि त्याचबरोबर समकालीन कला-संस्कृतीच्या वाढीकडेही तितक्याच डोळसपणे व कृतिशीलतेने पाहणारे ते देशातील एक महत्वाचे सांस्कृतिक केंद्र बनले आहे...

मनकर्णिका ऊर्फ मनू – झाशीची राणी (Queen of Zhansi was Manu before she was...

झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे चरित्र लिहिण्याचा प्रयत्न, द.ब. पारसनीस यांनी लिहिलेले पहिले चरित्र प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील शेसव्वाशे वर्षांत अनेक लोकांनी विविध अंगांनी केला आहे, त्या सर्वांमध्ये प्रतिभा रानडे यांचे ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई’ हा चरित्र ग्रंथ सर्वांगसुंदर आहे. त्या वेळच्या लोकांच्या भावना; तसेच, आजूबाजूची परिस्थिती याचे उत्तम दर्शन त्या पुस्तकामधून घडते...