Home Search

मतिमंद - search results

If you're not happy with the results, please do another search

दिलासा – रुग्णांच्या चेहऱ्यावरील हसू (Smiles on the faces of patients at Dilasa)

व्याधिग्रस्त वृद्ध लोकांना सांभाळणे, त्यांचे औषधपाणी करणे, त्यांना त्यांचा शारीरिक त्रास, वेदना कमी होण्यासाठी मदत करणे, विकलांग, मतिमंद मुलांना आयुष्य चांगले जगण्याकरता मदत करणे अशी कामे करणारी ‘दिलासा’ ही नाशिकमधील अठरा वर्षे जुनी संस्था आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले सतीश जगताप आणि राज्यसेवेच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उज्ज्वला जगताप या दाम्पत्याने नेहमीच्या वाटा बदलून स्वतःची स्वतंत्र वाट निर्माण केली...

कमला निंबकर – व्यवसायोपचाराच्या प्रवर्तक (Pioneer of occupational therapy in India)

व्यवसायोपचाराचे तंत्र भारतातच नव्हे तर आशियातही प्रथम आणले ते कमलाबाई निंबकर यांनी. त्या अमेरिकन जन्माच्या भारताच्या स्नुषा. विष्णुपंत निंबकर यांनी त्यांच्याशी लग्न करण्याचे ठरवले. कमलाबाईंनी भारतात येऊन राहायचे आणि त्यांच्या शिक्षणाचा व अनुभवाचा फायदा नव्या देशाला करून द्यायचा हे नवराबायकोंत आधीच ठरले होते. कमलाबाईंनी नवऱ्याबरोबर केलेल्या त्या कराराचे तंतोतंत पालन केले ! त्यांनी त्याही पुढे जाऊन, भारतात गरज कशाची आहे ते पाहून, त्याचे प्रशिक्षण घेऊन त्याचा प्रचार व प्रसार भारतात केला. विष्णुपंतांनी त्यांना त्यांच्या त्या सगळ्या कामांत पूर्ण पाठिंबा कायमच दिला...

व्यवसायोपचार (Occupational Therapy)

व्यवसायोपचार हा रुग्णाला त्याच्या स्वत:च्या पायावर उभा करतो. त्याला जीवन जगण्याची जिद्द देतो. शारीरिक अथवा मानसिक दृष्ट्या अपंग असणाऱ्यांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन तज्ज्ञांनी वैद्यकशास्त्राच्या सूचनेनुसार विकसित केलेल्या विकासात्मक कृतींद्वारे दिला जाणारा उपचार म्हणजे व्यवसायोपचार. विशिष्ट अवयवाला व्यायाम देण्यासाठी त्या उपचार पद्धतीत एखाद्या व्यवसायाची निवड केली जाते...

सिनेमातील (सुमित्रा) भावे-प्रयोग

1
सुमित्रा भावे यांचा सिनेमा पहिल्यांदा पाहताना तो जितका आकळतो, भावतो आणि आवडतो त्याहून तो सिनेमा दुसऱ्यांदा पाहताना होणारे आकलन अधिक खोल असते. सुमित्रा भावे यांच्या बरोबर सुनील सुकथनकर हे दिग्दर्शक म्हणून असतच. त्या जोडीने पूर्ण लांबीचे सतरा सिनेमे, लघुपट सत्तरच्या आसपास आणि दूरदर्शन मालिका पाच दिग्दर्शित केल्या आहेत...

अनाथांचा बाप – शंकरबाबा पापळकर (Achalpur’s Papalkar adopted hundred children!)

गाडगेबाबांनानंतरच्या पिढ्यांनी पाहिलेले नाही; परंतु गाडगेबाबांच्या समाजसेवेचा आदर्श घेतलेला, स्वत:च्या ऐषआरामाच्या जीवनावर पाणी सोडून अनाथांसाठी त्यांचे आयुष्य दान देणारा, मातृहृदयी, कृतिशील बाप बघायचा असेल तर तो शंकरबाबांमध्येच बघता येतो ! अचलपूरचे शंकरबाबा पापळकर ! त्यांची वैचारिक जातकुळी बुद्धाच्या तत्त्वज्ञानाशी जमते, म्हणून ते रोज बुद्धाचे स्मरण करतात.
sahvas_dance

विशेषांचे मनसोक्त जगणे! – ‘सहवास – अ केअर!’

समाधान सावंत यांची जळगावला कासोदा येथे विशेष (मतिमंद) मुलांची काळजी घेणारी ‘सहवास - अ केअर’ नावाची संस्था आहे. संस्था सुरू होऊन चार वर्षें झाली. जळगाव जिल्ह्यात विशेष (मतिमंद) मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था बोटावर मोजण्याइतपत आहेत; त्या मुख्यत: अठरा वर्षांच्या आतील मुलांचा सांभाळ करणाऱ्या संस्था. पण खरा प्रश्न मूल अठरा वर्षांचे झाल्यानंतर काय...
ase-ghadle-sulbha-special-school

असे घडले – सुलभा स्पेशल स्कूल

सात मुलांची धावण्याची शर्यत होती. शर्यत सुरू होऊन, सर्वांनी धावण्यास सुरुवात केली. एक मुलगा अडखळला आणि धपकन खाली पडला. त्याच्या ओरडण्याने, बाकीच्या मुलांनी वळून...
-heading-

आमचा रामशास्त्री – न्या. अभय ओक

न्यायमूर्ती अभय ओक यांची कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक मे 2019 मध्ये झाली. आम्ही त्यांच्या बंगलोरमधील शपथविधी समारंभास उपस्थित राहिलो. मी शिक्षक म्हणून...
-barve-sir

क्षण कृतज्ञतेचा, अविनाश बर्वे सरांच्या पंच्याहत्तरीचा…!

अविनाश दामोदर बर्वे हे ठाण्याच्या मो ह विद्यालयातील उपक्रमशील, कनवाळू, संयमी, सतत हसतमुख असणारे निवृत्त शिक्षक. बर्वेसर छत्तीस वर्षें मो ह विद्यालयात सेवारत होते....
_DeshpandeYanache_Deshatan_1.jpg

देशपांडे यांचे आगळेवेगळे देशाटन

ते कन्याकुमारीहून थेट जम्मूला ट्रेनने प्रवास करतात; ते गुवाहाटीपासून अगदी ओखापर्यंत जातात आणि ते सगळे फिरण्यासाठी नव्हे, तर फक्त प्रवास अनुभवण्यासाठी! बरे, त्यांनी भारताचा...