प्राण्यांचे संगोपन


- माधवी हेगडे-करंदीकर

      वैशाली परब यांचा ‘निर्व्याज प्रेम’ लेख आवडला. पाळीव प्राण्यांचे संवर्धन, संगोपन हे आता छंदपातळीवर राहिलेले नाही. माणसाला पाळीव प्राणी आनंदी करतात, त्याचे कारण त्यांचे ‘निर्व्याज प्रेम’ हे सत्यच आहे, परंतु प्राण्यांना पाळणे याकडे एक उपचारपध्दत म्हणूनदेखील पाहतात. थोडा विचार केला तर ते पटतेदेखील. कुत्र्यांचा लडिवाळपणा अंगभर ..

- माधवी हेगडे-करंदीकर

     वैशाली परब यांचा ‘निर्व्याज प्रेम’ लेख आवडला. पाळीव प्राण्यांचे संवर्धन, संगोपन हे आता छंदपातळीवर राहिलेले नाही. माणसाला पाळीव प्राणी आनंदी करतात, त्याचे कारण त्यांचे ‘निर्व्याज प्रेम’ हे सत्यच आहे, परंतु प्राण्यांना पाळणे याकडे एक उपचारपध्दत म्हणूनदेखील पाहतात. थोडा विचार केला तर ते पटतेदेखील. कुत्र्यांचा लडिवाळपणा अंगभर चालतो हे सर्वांना माहीत आहेच. त्यांचा हा स्पर्श ही माणसाच्या त्वचेची गरज असते. शरीराचा सर्वात मोठा अवयव म्हणजे त्वचा. तिला सतत स्पर्शाची गरज असते. आणि कुत्रे व मांजरी यांच्याकडून हे सुख लाभत असल्याने कुत्रे व मांजरी हे सर्वांत अधिक लोकप्रिय पाळीव प्राणी असतात.

     लहान मुलांमधील तोतरेपणासारखी व्यंगे कुत्र्यांच्या सहवासात दूर होऊ शकतात, कारण मुले त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संकोच, लज्जा, गंड न बाळगता बोलू शकतात. अशा मुलांना कुत्र्यांशी बोलताना-खेळताना सर्वात जास्त मोकळेपणा वाटतो. त्यामधून मुलांचा आत्मविश्वास जोपासला जातो.

     मी स्वत: अनेक कुत्री-मांजरे पाळते. तो एकटेपणावरचा नामी इलाज असतो. अलिकडे मुले मोठी झाली, की Emptiness Syndrome येतो. घरातलीही मंडळीदेखील वेगवेगळ्या उद्योगांत मग्न असतात. अशा वेळी ‘हाथी मेरे साथी’ हेच खरे. हाथी दूर जंगलात असतो. कुत्रे-मांजरी-मासे-ससे हे घरातील सोबती होऊ शकतात.

     मला तर कुत्र्यांचे मानसशास्‍त्रदेखील जवळून कळते. मी ‘अॅनिमल सायक़ॉलॉजी’चा थोडा अभ्यास केला आहे. मी मुलांच्या अॅडॉप्शनप्रमाणे अॅनिमल अॅडॉप्शन करते. मी असा स्वीत्झर्लंडमधला सेंट बर्नार्ड कुत्रा गेल्या आठवड्यात सुस्थळी पोचता केला. त्या पिल्लाची बाजारातील किंमत पासष्ट हजार रुपयांपर्यंत आहे. हे अॅडॉप्‍शन करताना ज्‍या मालकाने तो कुत्रा नेला, त्‍याची मनःस्थिती जाणून घेऊन काउन्‍सीलिंग करणे हेही महत्‍त्‍वाचे असते.

     वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षानंतर माणसांच्या जीवनात म्हणजे मनात अधिकाधिक रिकामपण (Emptiness Syndrome) येते. त्यावेळी असा सोबती जीवनाला आधार देतो. आमचे डॉक्टरमित्र सांगतात, की व्यवसायानिमित्त, काही वेळा रात्री एक-दोन वाजल्यानंतर घरी येणे होते. त्‍यापूर्वीच घरातील कुत्रा दाराशी येऊन येरझार्‍या घालू लागतो. आपण घरी पोहोचण्‍याच्‍या दहा मिनीटे आधीच त्‍याची ही हालचाल सुरू होते. त्याची आपल्याबाबतची ती ओढ इतकी आनंददायी व सुखकारक असते! घरातील बाकी माणसे झोपलेली असतात, परंतु आपले स्‍वागत करायला तो मुका जीव सज्‍ज असतो. पाळीव प्राणी हे हक्‍काचे साथीदार असतात. वृक्षवल्‍लींप्रमाणेच हे पाळीव प्राणी जगायला आधार देतात. त्यांची मनस्थिती जपणे महत्त्वाचे आहे. माझ्या मैत्रिणीकडील पर्शियन मांजराला अतोनात खरूज झाली. त्यामुळे ते अस्वस्थ असे. त्या मांजराला काही दिवसांनी ‘डिप्रेशन’ आले आणि त्‍याला थायरॉइडचा त्रास असल्‍याचे कळले. त्यावर इलाज केल्यानंतर ते खुटखुटीत झाले. पाळीव प्राण्यांची अशी व इतकी काळजी घ्यायला हवी. माझ्या मैत्रिणीने आठ कासवे पाळली आहेत ती परिचित माणसांना अचूक ओळखतात. त्यांच्या नावानं हाका मारल्या की तशतशी काठाशी येतात. कुत्र्यांना सुध्दा ओळख सूक्ष्मपणे कळते, माझ्या फिरोझा आणि फिरेंझी या कुत्र्यांना त्यांच्या नावांतील फरक बिनचूक कळतो.

     रेसचे घोडे रेसला उतरतात तेव्‍हा त्‍यांचेही सायकॉलॉजिकल काउन्‍सीलिंग केले जाते. त्‍यांचा ट्रेनर त्‍यांच्‍याशी बोलतो. त्‍यांना गोंजारतो. त्‍याचा आत्‍मविश्‍वास जागृत करतो आणि हे त्‍या घोड्यांना कळते. रेसमध्‍ये पहिला येणारा घोडा जर दुसरा आला तर तो डिप्रेशनमध्‍ये जातो. त्‍याचे काउन्‍सीलिंग करून त्‍याला पुन्‍हा विजयी केले जाते. हा प्रकार मूल वाढवण्‍यासारखाच आहे. रेस्‍क्यू ऑपरेशनमध्‍ये कुत्र्यांचा वापर केला जातो. जर या कुत्र्यांना दिवसभरात एकही जिवंत माणूस सापडला नाही तर ते डिप्रेशनमध्‍ये जातात. आपण हरल्‍याची भावना त्‍यांच्‍या मनात निर्माण होते. असे होऊ नये यासाठी संबंधीत अधिकारी त्‍या कुत्र्यांसाठी जाणूनबुजून ढिगा-याखाली लपून जिवंत माणूस सापडल्‍याचा आभास निर्माण करतात.

माधवी हेगडे-करंदीकर
संपर्क - 9820092464

madhavikarandikar1212@gmail.com

{jcomments on}

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.