कल्याण नागरिकच्या ईला रवाणी

प्रतिनिधी 22/05/2017

_Ila_Rawani_1.jpgईला रवाणी या ‘कल्याण नागरिक’ साप्ताहिकाच्या संपादक आहेत. त्या साप्ताहिकाची स्थापना कै. प.य. घारे यांनी १९४८ साली केली. त्यांनी ते साप्ताहिक पंचवीस वर्षें यशस्वीपणे चालवले. नंतर समाजवादी विचाराचे शिक्षक कै. वा.ना. देवधर यांनी त्याची धुरा सांभाळली. त्यांनी साप्ताहिकास प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांना २००० सालानंतर वयपरत्वे साप्ताहिक चालवणे कठीण झाले. त्यांनी ती गोष्ट राम कापसे यांना सांगितली. तेव्हा रामभाऊंनी त्यांना ती धुरा सांभाळण्यासाठी ईला रवाणी यांचे नाव सुचवले.

कै. देवधर यांनी ईला रवाणी यांना पाच वर्षें मार्गदर्शन केले व प्रशिक्षण दिले. त्यानंतर १ एप्रिल २००५ रोजी साप्ताहिकाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. ती जबाबदारी त्या यशस्वीपणे सांभाळत आहेत. साप्ताहिकात कल्याण, डोंबिवली पालिका क्षेत्रातील समस्यांबाबतच्या बातम्या, लेखन यांस प्राधान्य दिले जाते.

‘साप्ताहिक कल्याण नागरिक’चे पाच हजार सभासद आहेत. ते साप्ताहिक पुण्यापर्यंत पोस्टाने पाठवले जाते. ईला रवाणी सर्व सामाजिक कार्य सांभाळून अंक संपादनाचे काम करत आहेत. त्यात त्यांचे पती श्री हेमल रवाणी यांचा वाटा मोलाचा आहे.

साप्ताहिकाला साठ वर्षें पूर्ण झाली, त्या वेळी अनेक उपक्रम राबवले गेले. साप्ताहिकाचे त्या निमित्ताने वेगवेगळे विशेषांक काढले गेले - जसे ‘कल्याण नगरपरिषद’, ‘सुभेदारवाडा’, ‘नाट्य विशेषांक’, ‘संगीत विशेषांक’, ‘वाडा संस्कृती विशेषांक’, ‘नव कवी-लेखक विशेषांक’, ‘गोवामुक्ती विशेषांक’, ‘उत्तुंग व्यक्तिमत्त्व विशेषांक’ इत्यादी. अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून त्या निमित्ताने झालेले कार्यक्रम यशस्वी केले. मान्यवरांमध्ये देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, अरुण गुजराथी, गिरीश कुबेर, अरुण टिकेकर, दिनकर रायकर, राजदत्त, माधव भंडारी, जगन्नाथ पाटील, गणपत गायकवाड यांचा समावेश होता.

इला रवाणी १९९० साली भिवंडी तालुक्याच्या पडघा गावातून कल्याण शहरात लग्न होऊन आल्या. त्यांचे पती हेमल रवाणी कल्याण शहराच्या विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांमध्ये सक्रिय होते. त्यामुळे सौ. इला रवाणीही सामाजिक कार्यात गुंतत गेल्या. इला रवाणी यांनी गुजराथी लोहाणा समाज, कल्याणच्याच जायंट्स इंटरनॅशनल या संस्थांमध्येही महत्त्वाचे काम केले.

माळशेज घाटातील मोधलवाडी सारख्या दुर्गम वनवासी क्षेत्रात कुपोषित बालके व गरोदर महिला यांच्यासाठी नियमित पोषक आहार व तज्ज्ञ डॉक्टरांकडून औषधोपचार यांची व्यवस्था, जव्हार तालुक्यातील डेंग्याची मेट व गेढा या दुर्गम आदिवासी पाड्यातील माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी गणवेश व इतर शैक्षणिक साहित्याची सोय, पत्रीपुलजवळील कचोरे गावातील कुष्ठरोग्यांच्या वसाहतीमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी व औषधोपचार, आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या बारा शाळांमध्ये पाणपोई, पाण्याच्या सिंटेक्स टाक्या व वॉटर प्युरिफायर, आरोग्य शिबिरे व शैक्षणिक साहित्याचे -तसेच युनिफॉर्मचे वाटप असे सौ. रवाणी यांचे कार्य आहे.

ठाणे व रायगड जिल्ह्यांत साठहून अधिक प्राथमिक व माध्यमिक शाळा; तसेच, ज्युनियर व सिनियर कॉलेज असलेली संस्था म्हणजे ‘छत्रपती शिक्षण मंडळ’! त्या संस्थेच्या संचालकपदी सौ. रवाणी यांची नेमणूक झाली आहे. एवढेच नव्हे तर संस्थेने त्यांच्यावर तीन शाळांच्या शालेय समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवली आहे. इला रवाणी गुजराती भाषिक असल्याने कल्याण शहराच्या ‘श्री बृहद गुजराती एज्युकेशन सोसायटी’च्या संचालक मंडळावरदेखील कार्यरत आहेत. संस्थेच्या कल्याण व कोन या गावांमध्ये मिळून गुजराथी माध्यमाच्या सहा शाळा आहेत.

डोंबिवली महानगरपालिकेने त्यांचा ८ मार्च २०१२ रोजी कर्तृत्ववान महिला म्हणून सत्कार केला आहे.

ईला रवाणी - ९३२४९०७४१९

- सुमन कढणे

 

लेखी अभिप्राय

Very nice work done by hon.ila rajani.
Very good info.gave by hon suman karne

Shantaram nikam23/05/2017

प.य. घारे ,वा.ना. देवधर व ईला रवाणी..यांचा वाटा मोलाचा आहे....‘कल्याण नागरिक’ ....to Success..
कर्तृत्व ...Great..

shrikant Petkar24/05/2017

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.