आघाडा - औषधी वनस्पती


गुहाग्रजाय नमः। अपामार्गपत्रं समर्पयामि।।

आयुर्वेदामध्ये आणि अथर्ववेदात आघाड्याला ‘अपामार्ग’ म्हणून ओळखतात. आघाड्याची राख करून क्षार काढतात. त्याने पोट व दात स्वच्छ होतात म्हणून त्या क्षाराला ‘अपामार्गक्षार’ म्हणतात. आघाड्याला वेगवेगळ्या भाषांत अपांग, चिरचिरा, चिचरा, लत्‌जिरा, उत्तरेणी, कंटरिका, खारमंजिरी, मरकटी, वासिरा, काटेरी फुलोरा अशी नावे आहेत. वनस्पतिशास्त्रज्ञांनी त्याचे ‘अचिरॅन्थस अस्परा’ असे नामकरण केले आहे.

भाद्रपदात आघाडा या छोट्याशा वनस्पतीलासुद्धा पूर्वसुरींनी विशेष प्राधान्य दिले आहे. हरतालिका, गणेशचतुर्थी, ऋषिपंचमी आणि ज्येष्ठागौरीच्या पूजेत आघाड्याचा आवर्जून समावेश केलेला आहे. आषाढ-श्रावणात आघाडा वाढायला सुरुवात होते. श्रावणात जिवतीला आघाडा-दूर्वांची माळ वाहतात. भाद्रपदात आघाड्याची वाढ पूर्ण होते. त्यात जास्तीत जास्त औषधी गुणधर्मही एकवटतात. पूर्वी दिवाळीतील अभ्‍यंगस्‍नानात अंगाला उटणे लावून शरिरावरून दोन-तीन तांबे उष्‍ण पाणी घेतल्‍यानंतर तिच्‍यावरून आघाड्याची फांदी तीन वेळा मंत्र म्‍हणत फिरवण्‍याची प्रथा अस्तित्‍वात होती. आघाड्याच्या गुणधर्मांचा लाभ माणसाला व्हावा म्हणून त्याच्या पूर्वसुरींनी आघाड्याला व्रतवैकल्ये आणि धार्मिक कार्यात स्थान दिले, त्याच्याशी नातेसंबंध जोडून दिले.

आघाडा वनस्पती पावसाळ्यात जास्त प्रमाणात उपलब्ध होते. हे झुडूप एक ते तीन फूट उंचीपर्यंत वाढते. त्याचे खोड ताठ असून, थोड्या परंतु लहान फांद्या फुटतात. पाने एक ते दोन इंच लांब व एक ते पाऊण इंच रुंद असतात. त्याला फिकट हिरव्या रंगाची पुष्कळ फुले येतात. प्रथम फुलाचा दांडा आखूड असतो; परंतु तो वीस इंचांपर्यंत वाढू शकतो. फळांना लहान लहान काटे असल्यामुळे जनावरांच्या अंगाला चिकटतात व ते दूरवर पसरतात. त्यामुळे बहुतेक ठिकाणी ही वनस्पती सापडते. त्याचा औषधी वापर परंपरेने होत आला आहे. दात दुखत, हलत असतील तर काड्यांचा व पानांचा रस दातांना चोळावा. पोटदुखीवर आघाड्याची चार-पाच पाने चावून खावीत किंवा पानांचा रस काढून प्यावा. पित्त झाल्यास आघाड्याचे बी रात्री ताकात भिजत घालून सकाळी ते वाटून द्यावे म्हणजे पित्त बाहेर पडते किंवा शमते. त्यानंतर तूपभात खावा.

खोकला व कफ खूप झाला असेल, कफ बाहेर पडत नसेल, तोंडात चिकटून राहत असेल तर आघाड्याची झाडे मुळासकट उपटून ती जाळून त्याची राख करावी. ती थोडी थोडी मधात घालून त्याचे चाटण द्यावे. त्यामुळे कफ पातळ होऊन तो बाहेर पडतो व खोकलाही कमी होतो. खोकला झाल्यास आघाड्याचे चूर्ण व मिरी समभाग घेऊन मधातून चाटण द्यावे. खोकला व कफ यामुळे ताप आला असेल तर आघाड्याच्या पंचांगाचा काढा मधातून देतात. सर्दीमुळे खोकला, पडसे झाल्यास, नाक चोंदल्यास, नाकाची आग होत असल्यास, नाकाचे हाड वाढल्यास आघाड्याचे बी बारीक वाटावे. त्यात सैंधव, मेंदीचा पाला, जाईचा पाला समभाग घालून वाटावा, त्याच्या निम्मे तिळाचे तेल घालून ते निम्मे आटवावे. ते तेल दिवसातून दोन-तीन वेळा नाकात घालावे.

जलोदरामुळे पोटाला सूज आली असेल किंवा इतर अवयवांमध्ये काही कारणांनी सूज आली असेल तर आघाड्याची राख, पाणी व गूळ एकत्र करून द्यावी. त्यामुळे सूज उतरते. त्या राखेत पाण्याऐवजी गोमूत्र घातले तरी चालते. गळवे लवकर पिकत नसतील आणि ती वारंवार होत असतील तर त्यावर आघाड्याची पाने बारीक वाटून त्यामध्ये तेल, हळद घालून गरम पोटिसासारखे गळवांवर बांधावे, म्हणजे गळवे लवकर बरी होतात. बऱ्याच व्यक्तींच्या- विशेषतः घाम जास्त येणाऱ्या व्यक्तींच्या मानेवर, छातीवर, पाठीवर, चेहऱ्यावर पांढरे भुरकट डाग पडतात, त्यातून कोंडा पडतो, त्याला "शिबं' म्हणतात. त्या शिब्यास आघाड्याच्या क्षाराचे पाणी लावावे.

आघाड्याचा क्षार काढण्यासाठी आघाड्याची झाडे सावलीत वाळवावीत. नंतर त्यांची राख करून ती मातीच्या मडक्याीत घालावीत. त्यात राखेच्या चौपट पाणी घालून चांगली कालवावी. ते पाणी न हलवता दहा ते बारा तास तसेच ठेवून द्यावे. नंतर वरचे स्वच्छ पाणी काढून गाळून घ्यावे व लोखंडाच्या कढईत घालून ते पाणी तापवून आटवावे. कढईच्या तळाशी जो पांढरा क्षार राहील तो आघाड्याचा क्षार. त्या क्षाराला ‘अपमार्गक्षार’ - म्हणजे स्वच्छ करणारा- असे संस्कृतमध्ये नाव आहे. त्या क्षाराने पोट व दातही स्वच्छ होतात. पूर्वी परीट कपडे स्वच्छ करण्यासाठी त्याच क्षाराचा उपयोग करत असत. कानात आवाज येत असल्यास आघाड्याचे झाड मुळासकट उपटून ते बारीक कुटावे. त्यात आघाड्याच्या क्षाराचे पाणी घालावे व त्याच्या निम्मे तिळाचे तेल घालून ते निम्मे आटवावे. ते तेल कानात घालावे म्हणजे कर्णनाद बंद होतो. डोळे आल्यास आघाड्याच्या मुळाचे चूर्ण, थोडे सैंधव तांब्याच्या भांड्यात घालून दह्याच्या निवळीत खलवावे व ते अंजन डोळ्यात घालावे. विंचवाच्या विषारावर उपाय म्हणून आघाड्याचे तुरे किंवा मुळी पाण्यात उगाळून ते पाण्यात कालवावे. ते पाणी थोडे थोडे प्यायला द्यावे. पाणी कडू लागले, की विष उतरले असे समजावे.

उंदराच्या विषारावर आघाड्याच्या कोवळ्या तुऱ्यांचा रस काढून तो सात दिवस मधाबरोबर द्यावा किंवा आघाड्याचे बी वाटून मधातून द्यावे. कुत्र्याच्या विषारावर आघाड्याचे मूळ कुटून, मध घालून द्यावे. कोरफडीचे पान व सैंधव दंशावर बांधावे. आघाड्यासारख्या छोट्या पण मौल्यवान झाडाकडे माणसाचे दुर्लक्ष होऊ नये म्हणून त्याच्या पूर्वसुरींनी त्या झाडातील गुणधर्माचा उपयोग व्हावा, तसेच ज्या ऋतूत जी झाडे येतात त्यांचा उपयोग धार्मिक आचार-विचारांमधून, व्रतवैकल्यांतून केलेला आहे. श्रावणात मंगळागौरीच्या दिवशी मंगळागौरीच्या पत्रींमध्ये आघाड्याचा समावेश केला आहे.

श्रावणातील शुक्रवारी जिवतीच्या पूजेत आघाडा व दूर्वांच्या माळेला खूप महत्त्व आहे. भाद्रपदात ज्येष्ठा गौरी बसवतात. त्या वेळेस आघाड्याची रोपे एकत्र बांधून ती भांड्यावर ठेवतात. त्यावर गौरीचे चित्र बांधतात. देवीला ही पत्री प्रिय असल्यामुळे भाद्रपद शुद्ध षष्ठीला आघाडा व तेरडा मुळासकट उपटून आणतात. त्यांच्यावरून पाणी व तांदूळ ओवाळून टाकतात. घरातील कुमारिकेकडून पूजा करवून घेतात. नंतर आघाड्याची जुडी सर्व खोल्यांतून फिरवतात. तेव्हा गुलालाने गौरीची पावले काढतात. आघाड्याची जुडी ठेवून त्यावर गौरीचा मुखवटा बसवतात. तीन दिवसांनी गौरीचे विसर्जन करून आघाड्याची जुडी नदीच्या पाण्यात निर्माल्य म्हणून विसर्जन करतात. परत येताना नदीकाठची वाळू आणून घरी ठेवतात, त्यामुळे घरी भाग्यलक्ष्मी येते अशी समजूत आहे.

- डॉ. कांचनगंगा गंधे

लेखी अभिप्राय

आघाड्याचा आणखीन एक उपयोग - ज्वारीचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्‍ह्यातील मंगळवेढा तसेच कर्नाटकातील विजापूर जिल्‍ह्याच्या सीमावर्ती भागात पूर्वी खळ्यात ज्वारीची सुगी व्हायच्या. त्यावेळी शेतकरी आघाडा या वनस्पतीच्या वाळलेल्या काड्यांचे पसरट झाडू तयार करून त्याचा उपयोग ज्वारी वा-यावर उफाणणे करताना ज्वारीमधील गोंडं वेगळे करण्यास करत असत.

डाॅ.अरविन्द कु…26/11/2015

Today i have given pest of root aghada and utaran leaves to my subordinate shri ingle interigeted bite Obc scorpion ईगली he cure with in two minute .miracal of medicinal plant.mo no 9970847391

सिद्धार्थ देवर…29/10/2016

अत्यंत उपयुक्त माहिती .

गजानन रामभाऊ लांडगे 01/11/2016

आघाडा वनस्पतीची माहिती उपयुक्त आहे
आघाडा या वनस्पती अहिराणी भाषेत कुंद्रु kundru असे ही म्हणतात.

राजेंद्र गवळी …01/12/2016

ऊलटा आघाडा कोठे असल्यास कृपा करून कळवा.
9922464681,7385331786

नितीन शिंदे07/12/2016

Majhya kade aghada khup ahe tari tumahala gheycha ashes ta kalva 9325417702

sanjay suryvanshi23/12/2016

माहीती सुंदर मिळाली

अज्ञात06/02/2017

very good informative article

Rajendra Joshi
24.07.2017

Rajendra P. Joshi 25/07/2017

आनच्याकडे भरपूर वनसप्ती मिळते प्रत्येक वनसपती किलो.ग्राम प्रमाने भाव(दर)कळवा पूरवठा करु

नामदेव का.जाधव26/10/2017

Cat veins and mous veins

hanuman awchar 08/01/2018

Cat veins and mous veins mo 8956367540

hanuman awchar 08/01/2018

आजच्याजीवणातली फार दुर्मिळ माहिती मिळाली बद्दल धन्यवाद

Lalit23/01/2018

Aadhadhyachi ture pahije

Shyam gujar18/03/2019

सुंदर माहिती दिलीत.

ajitsutar09/05/2019

सविस्तर माहिती मिळाली. धन्यवाद .

संजय देवकते 24/09/2019

Mala aaghda che ture havet kothe miltil??

Manali shirwatkar01/12/2019

Aadhadhyachi तरू pahije.

Preeti Sawant09/12/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.