संगय्या स्वामी

प्रतिनिधी 16/05/2015

सोलापुरात दक्षिण कसब्यात १९४९ साली, संगय्या स्वामी यांनी स्वामी 'ब्युरो अॅडव्हर्टायझिंग एजन्सी'ची सुरुवात केली. टांग्यातून लाऊड स्पीकरवरून जाहिरातीचा पुकारा, चित्रपटगृहांत स्लाईड शो अशी स्थित्यंतरे पार केल्याचे एजन्सीची धुरा सांभाळणारे सुभाष स्वामी यांनी सांगितले. त्यांच्या जोडीला पुतणे रवींद्र जंबगी, तिसर्याे पिढीचे गंगाधर, आनंद व स्वरुप धडे गिरवत आहेत.

त्याच पेठेतील चौपाडमध्ये १९६५ साली अरविंद अमृतलाल जव्हेरी यांनी जाहिरात एजन्सी सुरू केली. वयाच्या एकविसाव्या वर्षांपासून अनेक नवनवीन कल्पनांना आकार देत त्यांनी त्यांचा ठसा उमटवला. त्यांचा वारसा संदीप, कल्पेश आणि अक्षय जव्हेरी बंधू काळानुसार ग्राहकांना सेवा देत आहेत. हेही एक त्या भागाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

(दैनिक 'लोकमत'मधून)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.