मंगळवेढ्यातील श्री बिरोबा देवस्थान


दोन तोळे गांजाची तलफ रोज सकाळी व संध्याकाळी देण्यात येत असलेले श्री बिरोबाचे देवस्थान मंगळवेढा तालुक्यात हुन्नर येथे आहे. बिरोबा हा धनगर जाती समूहाचा देव मानला जातो.  श्री बिरोबा देवाचे बारा अवतार तर त्यांचे शिष्य महालिंगराया देवाचे सात अवतार आहेत.

बिरोबा व महालिंगराया यांचा काळ इ. सन पूर्वी साडेपाच हजार वर्षापूर्वीचा आहे. गुरू बिरोबा यांचे शिष्य महालिंगराया यांची भेट डोणज ता. मंगळवेढा येथील तलावाकाठी झाली. त्यानंतर श्री बिरोबा हे शिरढोण, ता. इंडी येथे स्थायिक झाले (इंडी हा कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातला तालुका आहे.) तर शिष्य महालिंगराया हे हुलजंती, ता. मंगळवेढा येथे स्थायिक झाले. पण त्यामधून एक विसंगती घडली. ती शिष्याच्या ध्यानी आली. महालिंगराया हुलजंती येथील ओढ्याच्या काठावर तर बिरोबा हे शिरढोण येथे त्याच ओढ्याच्या काठावर खालच्या बाजूला. शिष्याने वापरलेले पाणी गुरुंना जात असल्यामुळे महालिंगराया अस्वस्थ झाले. त्यांनी गुरू बिरोबा यांना विनंती केली, की तुम्ही ते ठाणके बदलून असे ठिकाण निवडा, की तुमच्या पूजेला वापरलेले पाणी मला मिळावे! म्हणून बिरोबांनी शिरढोण येथील जागा सोडली. ते पुढे फिरत फिरत सांगोला तालुक्यामतील हंगीरगे मार्गे हुन्नूर येथील ओढ्याच्या काठावर हिंगणीच्या वनात स्थायिक झाले. तेथून पुढे गुरू बिरोबा यांची सेवा शिष्य महालिंगराया यांच्याकडून अखंड केली गेली.

श्री बिरोबा यांचा महिमा वाढतच गेला. त्यांची सकाळ-संध्याकाळ पूजा-अर्चा झाल्यानंतर त्यांना दोन तोळे गांजाची तलफ देण्यात येते तसेच सायंकाळची पूजा झाल्यानंतरही दोन तोळे गांजाची तलफ देण्यात येते. ही परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे.

बिरोबाचा उत्सव दर अमावास्येला होत असतो. वर्षातून तीन वेळा गुढीपाडवा, अक्षयतृतिया आणि दस-याला भेट सोहळा असतो. त्या तिन्ही दिवशी मोठी यात्रा भरत असते. गुरू शिष्याच्या भेटीचा सोहळा सीमोल्लंघनापासून सातव्या दिवशी हुन्नूर येथील गावठाणमध्ये पार पडत असतो. भेट सोहळ्यानंतर गुरू बिरोबा व शिष्य महालिंगराया मिळून बिरोबा मंदिरात जातात. पुढे देवाच्या नावाने पुजारी पाऊसपाणी, रोगराई, धान्यकडधान्य, राजकारण या सर्वांबद्दल भाकणूक सांगतात. भाकणूक झाल्यानंतर रात्री धनगरी ओव्यांचा मराठी व कन्नड भाषांमध्ये कार्यक्रम होतो. दुसऱ्या दिवशी नैवेद्याचा दिवस असतो. त्या दिवशी महालिंगराया गुरू बिरोबाला पुरणपोळीचे जेवण देण्याची प्रथा आहे. भक्तगणपण पुरणपोळीचा नैवेद्य करतात. महालिंगराया तिसऱ्या दिवशी बिरोबाला अभिषेक घालून हुलजंती गावाकडे प्रयाण करतात.

भेट सोहळ्यास महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ या राज्यांतून भाविक लाखोंच्या संख्येने हजेरी लावत असतात. त्या भेटीच्या सोहळ्यामध्ये शिष्य गुरुला हुलजंती येथे भेटीचे आवतण देतात. म्हणून बिरोबा हुन्नूर येथील भेटसोहळ्यापासून नवव्या दिवशी हुलजंती येथील भेटसोहळ्यास जातात. भेट सोहळा तेथील ओढ्यात होतो.

भाविक श्रद्धेने त्यांच्या घरी श्री बिरोबाला पालखीमध्ये बसवून पायी चालत, वाजत गाजत घेऊन जातात व पूजाअर्चा करून तीर्थप्रसाद सोहळा करत असतात.

बिरोबा देवस्थान पंचकमिटीने भाविकांच्या सुविधांसाठी सहा धर्मशाळा बांधल्या असून सुमारे चोवीस हजार चौरस फुटांचा मोठा मंडप उभारलेला आहे. पिण्याच्या पाण्याकरता स्वतंत्र विहीर घेऊन मोठी टाकी बांधली आहे व पाईपलाईन टाकली आहे. तसेच परिसरामध्ये चार हौद बांधले असून एक बोअरवेल घेऊन त्यात इलेक्ट्रिक मोटार बसवली आहे. तसेच एक हातपंप घेऊन जागोजागी नळ कनेक्शन देऊन पाण्याची सोय केली आहे. तसेच परिसरामध्ये प्रत्येक खांबावर एल.ई.डी. बल्ब बसवले आहेत. अशाप्रकारे प्रकाशाची सुविधा करून परिसर प्रकाशमान केला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या तीर्थक्षेत्र आराखड्यामध्ये बिरोबा देवाचा समावेश ‘ब’ दर्जा गटात झाला आहे. दोन कोटींचा निधी मिळणार आहे. पूर्ण परिसराला वॉल कंपाउंड, दोन मोठे वाहन तळ, दोन भक्त निवास अॅटॅच संडास बाथरुमसह आणि सार्वजनिक शौचालये असे काम पूर्ण होत आले आहे.

माहिती स्रोत - राजाराम पुजारी - बिरोबा देवाचे पुजारी आणि सचिव.
9975582502, मु. पो. -हुन्नुर, ता - मंगळवेढा, जि- सोलापूर

- गणेश पोळ

लेखी अभिप्राय

Think mhahrashtra.com teamche aabhar......
Special thanks for my friend ganesh pol n Dhanshree madam.

Tanji gorad.04/05/2015

khup chan padhatine mahiti sankalit keli ahe.cha vatale biroba web page var ala...

satishkumar padolkar04/05/2015

बिरोबा मंदीराची अशीच सुंदर व नियोजनबद्ध व्यवस्था करून संपुर्ण देशात आपले हुन्नूरसिध्दाचे नाव व्हावे ही श्री चरणी ईच्छा.

वसंत गोरड एल आ…04/05/2015

माझ्या गावामध्ये बिरोबा महाराजाचे उंच माळावर मंदीर आहे. मला ही माहिती वाचून खूप छान वाटलं.

विनायक मस्के र…19/08/2015

हुन्नूरसिद्ध की जय

पुजारी धर्मवीर…05/10/2016

माहिती आतिशय छान आहे ,आपल्या देवाबद्द्ल माहिती वाचून खुपंच आनंद झाला पुजारी साहेब ,पण बिरोबा देवाच्या १२अवतार कोणते हे थोडे समजले असते तर बर् झाले असते. पुढच्या लेखात ती माहिती अवश्य द्या. जय बिरोबा जय महालिंगराया

सागर माने 26/11/2016

बिरोबा मदिर नांदगाव तालुका निफाड जि .नासिक जय विरभद्

भावराव जाधव मो…24/12/2016

माहिती आतिशय छान आहे

Pankàj pujari21/09/2018

खूप छान माहिती आहे.

महादेव गेजगे18/11/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.