बाळासाहेब माने यांची संगीतसाधना


बाळासाहेब माने यांचा जन्म मोहोळ तालुक्यातील कुळे या गावचा. त्यांचे वडील मजुरी करत. त्यामुळे घरात गाठीला पैसा उरताना मुश्किल असे. तशा परिस्थितीत बाळासाहेब जिद्दीने शिकले. पण पुरेसा पैसा नव्हता. त्यामुळे शिक्षण अर्ध्यावरच सुटले असते. पण मोलमजुरी करून त्यांनी शिक्षण साधले. त्यांना संगीताची आवड उपजत होती.

बाळासाहेबांनी चौथीपर्यंतचे शिक्षण गावात पूर्ण केले. मोठे भाऊ लातूरला टेलिफोन डिपार्टमेंटमध्ये काम करत होते. त्यांनी सर्वांना लातूरला नेले. बाळासाहेब तेथे हॉटेलमध्ये काम करू लागले. पुढे, त्यांनी शिकण्यासाठी पंढरपूर गाठले. पंढरपूरचे नगराध्यक्ष कै. गणपतराव अभंगराव यांच्याशी एका सहकाऱ्याने ओळख करून दिली. अभंगराव यांचे पंढरपुरात लॉज होते. त्यांनी लॉजवर काम कर, तेथेच राहा आणि शाळापण कर अशी बाळासाहेबांची सोय करून दिली.

बाळासाहेब ‘कवठेकर हायस्कूल’मध्ये शिकू लागले. तेथे त्यांची मैत्री फिरोज बाह्याणे यांच्याशी झाली. त्याला संगीताची आवड होती. तो बाळासाहेबांना पंढरपुरात कार्यरत असलेल्या ‘रसिक मंडळा’त नेऊ लागला. तेथे पंडित भीमसेन जोशी, किराणा घराण्यातील गायिका प्रभा अत्रे, पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे कार्यक्रम होत. बाळासाहेबांची संगीतातील रूची त्या कार्यक्रमांमुळे वाढली.

त्यांनी महाविद्यालयात एनसीसीत सहभाग घेतला. एनसीसीने त्यांच्या आयुष्याला छान वळण लावले. त्यांनी एनसीसी करताना हॉर्स रायडिंग, पॅराग्लायडिंग, प्राणायाम-योग अशी कौशल्ये आत्मसात केली. छंद म्हणून या सगळ्या गोष्टी ते अजून जोपासतात. “त्यातून मिळणारे रिलॅक्सेशन कशातच नाही. माझ्या सकारात्मक विचारसरणीत माझ्या छंदामधून मिळणाऱ्या आनंदाचा मोठा हात आहे.” – बाळासाहेब म्हणतात.

बाळासाहेब संगीतात रूची घेत असल्याचे पाहून हॉटेलमालक अभंगराव यांनी त्यांना पट्टीचा बेंजो भेट दिला. बाळासाहेबांना वाद्य वाजवण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण नव्हते. त्यांनी स्वतःच मिळेल तेथून ताल-लय शोधून बुलबुलवर गाणी वाजवण्यास सुरूवात केली. शिवाय, फिरोजचे वडील अझीझभाई समाजसेवक होते. त्यांचा पंढरपुरात कलामंच होता. तेथे बाळासाहेबांनी पहिल्यांदा बुलबुल वाजवले!

बाळासाहेबांचा सराव जोरात सुरू झाला. त्याच दरम्यान त्यांची मैत्री चंद्रकांत साठे यांच्याशी जमली. ते मिरजेचे. शास्त्रीय भजनाचा वारसा त्यांच्या घरात. बाळासाहेब तेव्हा बावीस वर्षांचे होते. ते साठे यांच्याबरोबर भजनाच्या कार्यक्रमांना जाऊ लागले. ते पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवालाही जाऊ लागले. तेथे संगीताचे क्षेत्र फार व्यापक असल्याची जाणीव बाळासाहेबांना झाली.

बाळासाहेब 1982 मध्ये ‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये कॅशियर म्हणून नोकरीला लागले. ते आवडीची वाद्ये विकत घेऊ लागले. बुलबुल, सतार, हार्मोनियम... काही जुनी काही नवी. अशा वाद्यांवर सराव सुरू झाला. मीच माझा शिक्षक होतो. लग्न होऊन माळशिरसला गेल्यावर गायनाचार्य पं. शिवाजीराव भारती यांचा सहवास लाभला. बाळासाहेब 1986 पासून वीस वर्षे त्यांच्याकडे शिकले. तबला, हार्मोनियम विशारद झाले.

‘अकलूजमध्ये प.पू. भाईनाथ महाराज यांचा उत्सव असे. तेथे त्यांच्यासमोर भजनाची सेवा सादर केली. त्यांचा आर्शिवाद लाभला.

त्याच दरम्यान अकलूज येथील आनंदी गणेश मंदिरात सांगितिक कार्यक्रमात बाळासाहेबांनी संगीतबद्ध केलेली भक्तीगीते प्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर, चंद्रशेखर गाडगीळ, उत्तरा केळकर यांनी गायली! बाळासाहेबांचा आत्मविश्वास वाढला. मग ते विविध रचना स्वरबद्ध करू लागले. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या प्रत्येक लावणीला पहिला किंवा दुसरा क्रमांक मिळाला आहे. स्त्रीभ्रूण हत्येवरील गीताला दिलेले संगीत अकलूजच्या लावणी महोत्सवात गाजले. त्याला पहिला क्रमांक मिळाला. ते गीतही सुंदररीत्या लिहिले गेले होते, बाळासाहेब सांगतात, त्या लावणीने लोकांच्या डोळ्यांत पाणी उभे केले. सुहास म्हस्के यांनी ती लावणी लिहिली आहे. म्हस्के यांची चहाची टपरी आहे. बाळासाहेब म्हणतात, कल्पकता ही कोणाची मिरासदारी नाही. ती गरीबाकडेही असते. म्हस्के यांच्याकडे थिएटरवाले, लावणी सादर करणारे त्यांचे स्क्रीप्ट घेऊन येतात आणि म्हस्के त्यांना हवी तशी गाणी लिहून घेतात. बाळासाहेबांचा विद्यार्थी कुंडलिक मोहोरकर अशिक्षित आहे, पण त्याच्या तबला वाजवण्याच्या कौशल्यापुढे नामी तबलावादकही हार पत्करतील, असे बाळासाहेबांचे निरीक्षण!

मुंबईतील कार्यक्रमास प्रसिद्ध ड्रमर आनंदन शिवमणी आले होते. त्यांनी कुंडलिकचे तबलावादन ऐकले. त्यांनी त्यांच्या ड्रमरसोबत कुंडलिकला तबला वाजवण्यास सांगितले. शिवमणींच्या ड्रमर्सनी काही वेळातच कुंडलिकसमोर हार पत्करली!

बाळासाहेब यांची पत्नी रोहिणी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होत्या. त्यांची मोठी मुलगी रश्मी. ती आता ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या सांगली शाखेत क्लर्क म्हणून काम करते. तिचे लग्न झाले आहे. दुसरी मुलगी श्वेता हिने एमबीए केले. ती प्रायव्हेट कंपनीत नोकरीला आहे. दोघींनाही संगीतात रूची आहे. त्यांनी संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले आहे, पण तेवढेच. त्याचा पुढे पाठपुरावा नाही.

बाळासाहेब ग्रामीण भागातील मुलांना हौसेने निरनिराळी वाद्ये वाजवण्यास शिकवतात. केवळ गाठीला पैसे नाहीत म्हणून कोणाची संगीताराधना चुकू नये म्हणून मोफत शिकवणीचा बाळासाहेबांचा तो छोटासा प्रयत्न!

बाळासाहेबांना विविध छोटेमोठे पुरस्कार मिळाले आहेत.

बाळासाहेब यांना मेंडोलिन वाजवायला आवडते. ते म्हणतात, त्याच्या तारांचा नाद वेगळाच येतो. इतर वाद्यांपेक्षा मेंडोलिन अतिशय वेगळे आहे. त्यांनी संगीत विशारद होईपर्यंत मेंडोलीन वाजवले नव्हते. त्यांना जेव्हा रागांचे ज्ञान मिळाले तेव्हा त्यांनी त्यांचा सराव मेंडोलिनवर सुरू केला. ते मेंडोलिन शास्त्रीय गायकीच्या अंगाने वाजवतात.

त्यांचा ‘आनंदमूर्ती वंदना’ हा आल्बम प्रसिद्ध झाला आहे. आता त्यांचे चित्रपटांना संगीत देण्याचे स्वप्न अधुरे आहे.

बाळासाहेब माने
9822068207
शिवरंजनी, माळशिरस रोड, डॉ. इनामदार रूग्णालयामागे,
संग्राम नगर, अकलूज, तालुका माळशिरस, जि. सोलापूर 413101

- अर्चना राणे

लेखी अभिप्राय

Excellent achievement in adverse conditions! Hats off.

Ravindra Raut I 30/11/2015

Mendolin vaadnaat late music director sajjad Husain no 1 hote

Vijay Deshpand…30/11/2015

I liked article on Shri. Balasaheb Mane (mussian).Thank you.

Prof. V. R . Surve30/11/2015

माने साहेब यांच्‍यावरील हा लेख वाचून आनंद झाला. माने साहेबांनी परिस्थितीवर मात करून आज हा यशाचा सर्वोच्च पल्ला गाठला आहे. संपूर्ण आयुष्यभर संगीताची सेवा केली. नोकरी बघत बघत त्यांनी संगीतावर प्रेम करणाऱ्यांवरही प्रेम केले आहे. सर्वसामान्यांना मदत करण्याची त्यांची धडपड बघून त्यांच्‍याबद्दल नेहमीच आदर वाटतो. त्यांची प्रगती व्हावी अशी ईश्वर चरणी प्रार्थना आणि शुभेच्छा!

सुधीर भानुदास …30/11/2015

Great. Khup mehanti ahat apan. Khup pragati kara. Namaskar

Kalyan apegaonkar30/11/2015

Very nice and hard work and congratulations to shri Balasaheb Mane for future.

Parbatrao shri…01/12/2015

Balasahebanch karel tevadh kautuk kamich aahe. Wish you all the best. Go ahead and fulfill all your dreams.

Brigadier Suni…03/12/2015

EK number motivation

lakhan sathe03/12/2015

सर अभिमान वाटला आपली जीवन कहाणी वाचून. खरोखरच आदर्श व्यक्तिमत्व तुमचे माने साहेब! पण मी अचंबीत आहे की, इतका मोठा माणूस आणि गर्वाचा लवलेश पण नाही!

जीवन पाटील सर 10/12/2015

Hats off to the dedication,devotion & decidedeness. We are really proud of you Balasaheb. Wish you every success, peace & happiness in your life. God Bless You.

Prakash Koli11/12/2015

एका कर्तृत्ववान ओळखीच्या व्यक्तीची पुन्हा नव्याने ओळख झाली. आपली साधना आणि छंद समाजाला नक्की श्रवण श्रीमंत करेल. भावी काळासाठी हार्दिक शुभेच्छा!

श्री.अनिल जाधव05/01/2016

Balasaheb yancha ani maza sanbandh amache ajoba Ganpat Rao yanchya mule ala. Purvi pasun jidd, kasht ani manmilau pane kelelya kamache yash ahe. Tyanna Abhangrao Parivara kadun shubhecha!

UTTAM ABHANGRA…10/01/2016

संगीत प्रवास तर मोठा आहेच. पण अतिशय प्रतिकूलतेतही ती आवड बहरली याचा आनंद व तुम्‍ही आमच्‍या परिवारातले, आहात म्हणून अभिमानही आहे. अन्यथा कोमेजल्याची किंवा कारणामागे दडण्याची उदाहरणे भरपूर सापडतात. असो. तुमचा एवढा व्यासंग असेल असे माहीत नव्हते. आगे बढो. शुभेच्छा.

प्रसाद अतनूरकर…20/01/2016

Im proud of myself that I m one of your relatives! Hats off to you!

Aruna Atram 26/01/2016

खूप सुंदर! इच्छाशक्ती असेल तर जगात काहीही अशक्य नाही हे माने साहेबांनी दाखवून दिले. आपणास पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्‍छा.

मिलिंद गाढवे18/02/2016

अतिशय जुनी ओळख असूनही आज अखेर आपल्या या अंगभूत कलेची मला इतक्या उशीरा माहिती झाली याचे शल्य मनात कायम राहिली. असो गुलाब सुगंधाचा लाभ घेण्‍याकरिता आपण त्याच्‍या सहवासात गेले पाहिजे. गुलाब कधीही त्याचा सुगंध स्वतः सांगत फिरत नाही हेच खरे. अतिशय कष्टमय परिस्थितीवर मात करून जी कला तुम्‍ही हस्तगत केली तिला खरोखरच तोड नाही. तुमच्‍या भावी आयुष्यास लाख लाख शुभेच्छा. तुमच्‍याकडून असेच सामाजिक कार्य भविष्यातही घडत रहो. त्या करीता देवाने तुम्‍हाला अधिक बळ द्यावे हिच प. पुज्य भाईनाथ चरणी प्रार्थना.

श्री. एस. एन. …22/06/2016

Adrniy mane siranch yashshvi pravas .

Ravi nagtilak29/07/2016

Great dedication,efforts and hardwork for your achievement! May you always be successful with Health And Prosperity.

Sushama Yadav30/07/2016

manesaheb i m inspire & motivate off this article & god bless u.

atul sangule11/08/2016

काही माणसे स्वतां साठी नाही तर दुसर्या च्या हितासाठी झटतात त्यामधे मानेसाहेब यांचे नाव घ्यावे लागेल ज्याज्या वेळी आमचा महाविलयास आवश्यकता होती त्या त्या वेळी माने साहेबानी सहकार्थ केलेआहे म्हपून त्यांचा या कार्य कर्तृत्वाला सलाम

Prof. Vishwana…07/10/2016

श्रीमान बाळासाहेब माने आपले जीवन आदर्शवादी आहे.तुमच्या सारख्या इतक्या साध्या व्यक्तींकडे एवढी प्रचंड गुणवत्ता असावी यांच्यासारखे भाग्य ते कोणते?
Best of Luck the Future

संजय कुदळ25/10/2016

खुप प्रयत्न करून आपण यशाचे शिखर गाठले.माझे गुरू आहातयाचा अभिमान आहे .

Pramod Kasture10/11/2017

I am his colleague and a witness to his days of struggle and growth. He is passionate about music. He is a multifaceted personality. I still cherish the days we spent in Mhaswad in 1982. God bless him.

Kodagi S S 03/04/2018

Very nice ...
Good luck for future.

Suvarna jadhav06/07/2018

बाळासाहेब माने हे माझे बॅंक ऑफ महाराष्ट्र मधील सहकारी. संगीत प्रेमी, कष्टाळू, स्वछंदी, चोखंदळ, जीवनाचा आनंद उपभोगणारे व समाधानी व्यक्ती.भावी
संगीतकार आहेत, या मित्रास खूप शुभेच्छा.

सुभाष धोंडीराम…26/12/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.