सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध


१० डिसेंबर ते २१ डिसेंबर २०१४

जिल्हाभराचे जनजागरण आणि माहितीसंकलन

(‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’, ‘ग्रंथाली’, ‘लोकसेवा ट्रस्ट’ आणि ‘मास कम्युनिकेशन डिपार्टमेन्ट, सोलापूर विद्यापीठ’ यांचा संयुक्त उपक्रम)


 

संस्‍कृतिवेध सोलापूरमहाराष्ट्राचा इतिहास व संस्कृती यांचे जतन-संवर्धन करण्याच्या हेतूने ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चार वर्षांपूर्वी सुरू झाले. महाराष्ट्रभरातील कर्तृत्ववान, सेवाभावी व्यक्तींची छोटी चरित्रात्मक माहिती आणि गावोगावच्या सांस्कृतिक माहितीचे संकलन यासंबंधी मुख्यत: पोर्टलवरून दर्शन घडवले जाते. ही माहिती जिल्ह्या जिल्ह्यांतून जोमाने जमा करावी व त्यासोबत जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये जनजागरणाचे कार्यक्रम विविध माध्यमांमधून घडवावे अशी जोरकस मोहीम हाती घेण्यात येत आहे. तिचा आरंभ सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यांत १० डिसेंबर ते २१ डिसेंबर २०१४ या दरम्यान ‘संस्कृतिवेध सोलापूर’ या पंधरवडाभराच्या महोत्सवाने होत आहे. या मोहिमेस 'जैन इरिगेशन सिस्टिम'चे आर्थिक सहकार्य लाभले आहे.

सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्राचे आद्य दैवत, विठ्ठलाचे स्थान आहेच, पण या आरंभासाठी त्याहून अधिक समर्पक गोष्ट म्हणजे सोलापूर जिल्हा हा ‘मिनी महाराष्ट्र’ आहे. मुदलात महाराष्ट्र हा स्थलांतराने घडलेला देश आहे हे आपण जाणतो. त्यातील सोलापूरचे वर्णन ‘सघन स्थलांतरा’चा प्रदेश असे करता येईल. तेथे कन्नड, तेलगू आणि मराठी या तिन्ही भाषा-संस्कृतींचे विलोभनीय दर्शन होते. गुजराती, मारवाडी, शीख भारतभर-जगभरदेखील सर्वत्र पसरले तसे सोलापुरी येऊनदेखील स्थिरावले. सोलापूरला इतिहास दोन हजार वर्षांपासूनचा आहे. सोलापूर-पैठण मार्गे भारताच्या पश्चिम किनाऱ्याला पोचून युरोपपर्यंत महाराष्ट्र-कर्नाटकाने व्यापार केल्याची नोंद पुरातन काळापासूनची आहे.

या नोंदी ढोबळ झाल्या. आजच्या सूक्ष्मतेच्या जगात आपल्याला सोलापूर जिल्ह्यात गावागावात काय घडले-काय टिपले-आज कोणत्या खुणा सापडतात-इतिहासाची थोरवी काय आणि वर्तमानातील श्रेष्ठता कोणती अशी सारी माहिती जमा करायची आहे. त्यासाठी ‘संस्कृतिसमाराधना’चे हे आवाहन आहे. कारण अशा तऱ्हेचे माहिती संकलन केवळ सामुहिक प्रयत्नांमधून होऊ शकेल. सुशिक्षित-सुसंस्कृत लोक जागे झाले, त्यांनी त्यांचा परिसर या दृष्टीने तपासून पाहिला व ते संकलित माहितीच्या नोंदी करत गेले तर त्यामधून सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासाचा व संस्कृतीचा पट आपल्यापुढे उलगडला जाऊ शकतो. जिल्ह्या जिल्ह्यांतून अशा मोहिमा झाल्या तर अवघ्या महाराष्ट्राचा चांद्यापासून बांद्यापर्यंतचा आणि जळगावपासून सोलापूरपर्यंतचा संस्कृतिसंपन्न इतिहास सर्व तपशिलांनिशी उभा करणे शक्य होईल. मात्र, प्रत्येक सुशिक्षिताचे, प्रत्येक विचारी व संवेदनाशील माणसाचे त्यासाठी सहकार्य मिळाले पाहिजे. इंटरनेट माध्यमाची गंमतच ही आहे, की सायबर स्पेसची संग्रहाची क्षमता अमर्याद आहे आणि तेथे अक्षरश: व्यक्ती व्यक्तीचे वैशिष्ट्य नोंदले जाऊ शकते आणि त्या माहितीस अॅक्सेस घरबसल्या सहजसोपा आहे. 

माहिती संकलनाच्या या मोहिमेचा दुसरा पदर आहे तो जनजागरणाचा. शाळा, कॉलेजेस, ग्रंथालये येथे तज्ज्ञांची आधुनिक विद्याशाखांमधील व्याख्याने, स्लाईड शो, चित्रपट प्रदर्शन असे अनेकविध कार्यक्रम योजून लोकांना आधुनिक ज्ञानाची, त्यामध्ये निर्माण झालेल्या विविध विषयशाखांची – त्यातील शक्यतांची जाणीव करून देणे हा या मोहिमेचा दुसरा मुख्य हेतू आहे. भारतातील तरुण वर्ग हा लोकसंख्यादृष्ट्या गर्वाचा विषय मानला जातो. परंतु या तरुण वर्गाचे देशाच्या संपत्तीत रूपांतर व्हायचे असेल तर आजच्या ‘नॉलेज प्रभावित’ जगामध्ये आपले तरुण, एकूणच समाज बौद्धिकदृष्ट्या सक्षम असले पाहिजेत. त्यासंबंधी जाणीव निर्माण करणे हाही या मोहिमेचा हेतू आहे.

मोहीम घडणार कशी?
 

संस्‍कृतिसमाराधन सोलापूर‘संस्कृतिवेध’च्या दोन आठवड्यांच्या काळात सुमारे चाळीस विषयतज्ज्ञ त्यांच्या आयुधांसहित सोलापुरात अवतरतील. ते शाळा-कॉलेज-ग्रंथालये येथे पूर्वनियोजित पद्धतीने व्याख्याने देतील/कार्यक्रम सादर करतील.

त्यांच्या सोबतीने ‘सोलापूर विद्यापीठा’चे पत्रकारितेचे तरूण विद्यार्थी ‘थिंक महाराष्ट्र’च्या माहितीसंकलनासाठी आमच्यासोबत गावोगावी फिरतील. त्यातून गावागावांत दडलेल्या कर्तृत्ववान व्यक्तीे, संस्था, प्रथा-परंपरा, स्थानिक कलाकार, ग्रामदेवता, इतिहास आणि संस्कृ्तिच्या खुणा अशी विविधांगी माहिती नोंदवली जाईल.

याखेरीज प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संस्कृती शिबीर होईल. त्या शिबिरामध्ये तालुक्यातील साहित्यिक, कलावंत, विचारवंत, छांदिष्ट असे तऱ्हतऱ्हेचे लोक एकत्र येऊन संस्कृतीसंबंधातील एका निबंधाच्या अनुषंगाने चर्चा करतील; आपापल्या क्षेत्रातील प्रश्नांचा, अडचणींचा ऊहापोह करतील. शिबिरास संस्कृती क्षेत्रातील नाणावलेला सूत्रसंचालक असेल.

या तिन्ही उपक्रमांत स्थानिक सहकार्य महत्त्वाचे आहे; किंबहुना, त्याविना हा एकूणच प्रयत्न फोल ठरेल. त्यामुळे स्थानिक मंडळींपैकी ज्यांना हे उपक्रम महत्त्वाचे वाटतात त्यांनी सत्वर धनश्री लुंगसे (९७०२१७६२८१) यांच्याशी संपर्क साधावा.

तालुक्या तालुक्यांत उत्थापन

 

‘संस्कृतिवेध’ जिल्हाभर दोन आठवड्यांपर्यंत चालणार हे खरेच, परंतु मोहिमेचा तळ तालुक्या तालुक्यांतून फिरत पुढे जाणार. खाली दिलेल्या पद्धतीने सोलापूर जिल्ह्याचे अकरा तालुके पादाक्रांत केले जातील.

१० डिसेंबर ते १२ डिसेंबर - माढा, करमाळा, बार्शी.

१३ डिसेंबर ते १५ डिसेंबर - पंढरपूर, माळशिरस, सांगोला.

१६ डिसेंबर ते १८ डिसेंबर - मंगळवेढा, मोहोळ.

१९ डिसेंबर ते २१ डिसेंबर - सोलापूर, अक्कलकोट.

प्रत्येक तालुक्यातील तळाच्या तीन दिवसांच्या कार्यकालात त्या तालुक्यामध्ये तीन ते पाच विषयतज्ज्ञ, पाच माहिती संकलक – त्यांच्यापैकीच एक शिबिरसूत्रसंचालक एवढे लोक हजर असतील. स्थानिक ज्या शाळा-कॉलेजांनी-ग्रंथालयांनी इच्छा व्यक्त केली असेल त्यांना या कार्यक्रमांचा लाभ घेता येऊ शकेल. तसेच, आपल्या परिसरातील ज्यांची व्याख्याने देण्याची वा कार्यक्रम करण्याची इच्छा आहे त्यांनीही स्वत:संबंधीची माहिती कळवल्यास त्यांच्या मोहिमेतील सहभागाबाबत ठरवणे शक्य होईल.

हा उपक्रम खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्याच्या संयोजनामध्ये अनेक व्यक्ती स्वत:चे उद्योग सांभाळून, काही स्वत:ची पदरमोड करून सहभागी होत आहेत. कार्यकर्ते, विषयतज्ज्ञ इष्ट तालुक्यांपर्यंत येऊन पोचतील, त्यांची तेथील सोय व आदरातिथ्य स्थानिक पातळीवर होऊ शकले तर सोयीचे होईल.

शाळा-कॉलेजे-ग्रंथालये यांच्याकडून विचारणा झाल्यास त्यांना विषयतज्ज्ञ, माहिती संकलक यांची नावे व अन्य तपशील कळवता येतील.

ज्या स्‍थानिक अथवा इतर ठिकाणच्‍या व्यक्तींना या मोहिमेमध्ये सक्रीय सहभागी व्हायचे आहे त्यांनी पुढील पत्त्यावर संपर्क साधावा.

व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन
२२ मनुबर मॅन्शन, १९३ डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड,
चित्रा सिनेमासमोर, दादर (पूर्व), मुंबई ४०० ०१४
(०२२) २४१८३७१०/ ९७०२१७६२८१
thinkm2010@gmail.com

लेखी अभिप्राय

‘संस्कृतिवेध सोलापूर’महाराष्ट्राचा इतिहास व संस्कृती यांचे जतन-संवर्धन करण्याच्या चागला व अभिनव उपक्रम आहे .या उपक्रम ला हार्दिक शुभेच्या

Dhondappa Nande05/11/2014

We, Narmada Kidney Foundation, congratulates you & wishes you all the best for the mega event.
We will be pleased to participate in the event, if possible, by way of giving lectures with skit, on Organ Donation.
You may get in touch with us @9821011419.

dnyanraj patkar20/11/2014

Very good work. Actually we work INTACH (Indian National Trust for Art & Cultural Hertage, Delhi) Solapur Chapter. We have already stared our work in Building, Cultural, Art & Natural heritage fields. We will be very happy to share this information & doc. with you & be a part of this work. How can we be a part of this team? what to know more about your way of study & documentation. I tried to call Dhanashri Mam. But Couldn't contact her. Good work Keep it up...

Ar. Pushpanjal…24/11/2014

आपल्या उपक्रमाची पहिल्यांदाच माहिती मिळाली. वाचून खुपच आपलंसं वाटलं ! मला व माझ्यासारख्या अनेक पुणे स्थित सोलापूर कराना आपल्या उपक्रमात सहभागी होण्याची मनापासून इच्छा, जीआहे. क्रुपया माहिती द्यावी. फोन नंबर 9168151355

किरण महादेव काळे 25/11/2014

प्रतमत: शतशः आभार आपण एक चांगल्या पद्धतीने काम करत आहात त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि असेच काम सुरू ठेवा त्यासाठी शुभेच्छा आमची साथ आहे आपणास.

कांतिलाल किसन मुळे 30/11/2014

उपक्रम ला हार्दिक शुभेच्या

shrikantsabale…01/12/2014

Hardik Shubecha................bhagwan paralikar saamana solapur

bhagwan paralikar08/12/2014

खूप चांगल काम करत आहात. जुन्या गोष्टीला उजाळा देणे हा खूप चांगला उपक्रम आहे. मोडनिंबचा इतिहास समोर आणण्‍याचे हे प्रथमच होत आहे. त्यामुळे मी दिपक सुर्वे तुमच्या पूर्ण टिमचे आभारी आहे.

अज्ञात12/12/2014

मोडनिंबचे नाव पूर्ण महाराष्ट्रात होणार खूप आनंदाची गोष्ट आहे. थिंक महाराष्ट्र हा छान उपक्रम राबवत आहे. ह्या कामासाठी तुमच्या पूर्ण टिमचे अभिंनंदन. 8888070237

दिपक सुर्वे र…12/12/2014

मोडनिंबचे नाव पूर्ण महाराष्ट्रात होणार ही आनंदाची बातमी आहे. हे फक्त थिंक महाराष्ट्र मुळे होत आहे. त्यामुळे तुमच्या सर्व टिमचे अभिनंदन.

दिपक सुर्वे रो…13/12/2014

उपक्रम अगदी चांगला असून संकलित झालेली माहिती पाहण्यास आतुर आहोत.

अनुप23/12/2014

चांगला उपक्रम आहे . सोलापूरचा इतिहास जगासमोर येईल . सोलापूरने भारताच्या स्वातंत्र्यआधी स्वातंत्र्य उपभोगले आहे .. येथील मुक्तीपूर स्वराज्य, हैद्राबाद मुक्तीसंग्राम , चार हुतात्मे सारे जगासमोर येईल .... अरविंद मोटे मु . पो. वाळूज ता. मोहोळ जि. सोलापूर

Arvind Mote26/12/2014

Great to be with you India has wide space of all criticism posativeand constructive

Birajdar Vijay11/01/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.