कलांगणचा ‘भावे’ प्रयोग

प्रतिनिधी 08/09/2011

- सरोज जोशी

वर्षा भावे संगीताची आराधना अनेक वर्षांपासून करत आहेत, परंतु त्यांची ‘झी मराठी’च्या ‘सारेगमप....लिटिल चॅम्पस्’ कार्यक्रमासाठी २००८-२००९ मध्ये संगीत समुपदेशक म्हणून नेमणूक झाली आणि त्या प्रकाशझोतात आल्या! ‘लिट्ल चॅम्पस्’स्पर्धेने अनेकांची आयुष्ये या प्रकारे उजळून टाकली आहेत. वर्षा भावे यांना तर जीवनध्येयपूर्तीची सार्थकता लाभली!

- सरोज जोशी

 

वर्षा भावे संगीताची आराधना अनेक वर्षांपासून करत आहेत, परंतु त्यांची ‘झी मराठी’च्या ‘सारेगमप....लिटिल चॅम्पस्’ कार्यक्रमासाठी २००८-२००९ मध्ये संगीत समुपदेशक म्हणून नेमणूक झाली आणि त्या प्रकाशझोतात आल्या! ‘लिट्ल चॅम्पस्’स्पर्धेने अनेकांची आयुष्ये या प्रकारे उजळून टाकली आहेत. वर्षा भावे यांना तर जीवनध्येयपूर्तीची सार्थकता लाभली!

 

वर्षा भावे या स्वतः संगीत, नाट्याभिनय यांमधील कर्तबगार व्यक्ती. त्यांनी या दोन्ही कलांमधील कामगिरीसाठी महाराष्ट्र शासनापासून अनेक संस्थांचे पुरस्कार मिळवले आहेत. तथापि त्यांनी लहान मुलांचे संगीतशिक्षण व त्यांचा सांस्कृतिक विकास हा मुख्य ध्यास मानला. मुलांना संगीताचे शिक्षण देण्यासाठी अभिनव अभ्यासक्रम तयार केले. त्यात वेणू, संतुर, सनई आणि सारंगी यांचा उपयोग केला. त्यांनी त्यांच्या एकूण कामासाठी ‘संवर्धिनी’ हा अभ्यासक्रम आणि ‘कलागंण’ ही संस्था निर्माण केली. ‘लिटल चॅम्पस्’च्या अभूतपूर्व यशानंतर वर्षा भावे यांचे आधीचे सर्व कार्य नजरेत भरले. त्यांतील दोन गोष्टींचा उल्लेख मुद्दाम केला पाहिजे. एक म्हणजे ‘ईटीव्ही ’वरील ‘गुणगुण गाणी’या संकल्पनेसाठी मार्गदर्शन आणि दुसरे म्हणजे लंडन येथील महाराष्ट्र मंडळाच्या ‘प्रभातदर्शन’ या कार्यक्रमाचे सादरीकरण. त्यांनी लंडनमधील मुलांकडून ‘प्रभात फिल्मस ’च्या इतिहासावर व गीतांवर आधारित हा कार्यक्रम बसवून घेतला होता. मात्र त्यांचे हे सारे ‘भावे प्रयोग’ ‘लिटिल चॅम्पस्’च्या यशानंतर प्रसिद्धीच्या अग्रभागी आले. तेच सूत्र पकडून ठेवून, त्यांनी ‘लिटल चॅम्पस्’चा ‘आठवा स्वर’ हा आल्बम सादर केला.

 मुलांच्यासाठी एक मोकळे अंगण उपलब्ध करून द्यावे असे ठरवून, मुलात मूल होऊन रमणारे एक सहृदय कलासक्त, हसरे व्यक्तिमत्त्व म्हणजे वर्षा भावे!
 वर्षा भावे म्हणजे पूर्वाश्रमीची वर्षा खा़डिलकर. प्रख्यात गायिका इंदिराबाई खाडिलकर यांची नात. नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खा़डिलकर ह्यांची पणती. त्यामुळे त्यांना नाट्य व संगीत यांचा पिढीजात वारसा लाभला. त्याचे शिक्षण सांगलीमध्ये मनोहर पोतदार, प्रभाकर शेंडे (इचलकरंजीकर) आणि चिंतुबुवा म्हैसकर ह्या गुरुजींकडे कधी गुरुकुल पध्दतीने तर कधी शिकवणी स्वरूपात झाले. त्यांनी संगीताचे उच्च शिक्षण इचलकरंजीचे काणेबुवा आणि विवाहानंतर माणिकराव ठाकुरदास व नीळकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे घेतले. त्यांनी एस.एन.डी.टी. विद्यापीठाची पदवी १९८३ साली मिळवली. त्यांना नीळकंठबुवांनी शास्त्रीय संगीत आणि भावसंगीत, दोन्ही बारकाव्यांसह शिकवले असे त्या म्हणतात.
 गाण्यांचे कार्यक्रम मिळत होते. उत्तम गायिका होण्याच्या दृष्टीने प्रवास चालू होता. पण खूप निर्मितीक्षम असे काही घडत नव्हते. त्यांनी त्यांच्या वयाच्या एका बाईला त्यांच्या घरी जाऊन गाणे शिकवायला घेतले, पण ती शिकवणी टिकली नाही. त्याच दरम्यान, त्यांनी त्यांची छोटी भाची राधिका आणि तिच्या पाच-सहा मैत्रिणींना शिकवायला सुरुवात केली. त्या बॉम्बे स्कॉटिशच्या मुलांनाही शास्त्रीय संगीत शिकवत होत्या! त्याच ओघात त्यांनी स्वतः छोटीशी बंदिश लिहिली, चाल लावली आणि मुलींच्या मुखांतून चीज ऐकली. त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले. त्यांना जाणवले, की त्या ज्या शोधात होत्या ती गोष्ट त्यांना सापडली आहे! मग त्या छोटी-छोटी बालगीते शोधून ती स्वरबध्द करू लागल्या. त्यांना ती गाणी मुलांच्या तोंडून ऐकताना सुख वाटू लागले. या क्लासचे नाव त्यांनी  ‘संवर्धिनी’ असे ठेवले. संगीताच्या माध्यमातून मुलांचे वर्धन करणारा गायनवर्ग! त्यांनी उद्यान गणेश मंदिरात ‘गाऊ देवाची गाणी’ हा स्वत:च्या रचनांचा कार्यक्रम सादर केला व तो गाजला. वर्षा भावे यांनाही जीवितध्येय गवसले!
 वर्षाताईंनी सुरूवात केली गुणी मुलांना हुडकून काढण्याची. त्यांना गुणनिधी संगीत स्पर्धेतून हुशार मुलांचा शोध लागला. वर्षाताईंकडे शिष्यपरिवार इतका मोठा की वेणू-१, वेणू-२ संतुर-१, संतुर-२, स्वराली १-२-३ अशा सात तुकड्या कराव्या लागतात. छंदोव्रती ग्रूपच्या मोठ्या ताया म्हणजे रसिका जोगळेकर, केतकी भावे, अनन्या, भौमिक, वैदही तारे, दीप्ती लोखंडे, गीता, पूर्वी, भैरवी, अभिजित, हनुमंता, ह्या सर्वांच्या मदतीने वर्षा भावे विद्यादानाचे काम करतात. कमलेश भडकमकर हे संस्थेसाठी भक्कम खांब आहेत. शिबिर नावाचा उपक्रमही राबवला जातो. स्वरांगी मराठे, गौरी वैद्य, आनंदी जोशी, अनघा ढोमसे, सायली महाडिक, वैभव लोंढे अशा अनेक कलावंतांनी संगीतक्षेत्रात यशस्वी पदार्पण केले आहे. अशा प्रयत्नांतून एखादा तरी रविशंकर, भीमसेन, केसरबाई किंवा तिरखवॉ निर्माण व्हावा एवढीच त्यांची इच्छा आहे आणि आपल्या त्यांना आहेत सदिच्छा...!
   

- सरोज जोशी 9833054157, 022-25222317

 

वर्षा भावे  9870473836 022-24468021 kalavarsha@yahoo.com 

 

पत्‍ता - 4, कौस्‍तुभ, अनंत पाटील मार्ग, दादर (प.), मुंबई – 400028

 

कलांगण - www.kalangan.org

     

नाव – वर्षा भावे

 

गायिका, भारतीय शास्‍त्रीय सं‍गीत शिक्षीका

   

शिक्षण – बी. ए. हिंदी (शिवाजी विद्यापीठातून सर्वप्रथम 1982)

 

एम. एम. शास्‍त्रीयगायन (एस.एन.डी.टी. विद्यापीठ 1984)

   

पुरस्‍कार आणि सन्‍मान

 

1980 ते 82 – (भावे नाट्यमंदीर, सांगली) या कालावधीत सं. संजीवनी, संग. मंदारमाला, सं. सौभद्र या नाटकातून प्रमुख भूमिका आणि गायिका व अभिनेत्री म्‍हणून महाराष्‍ट्र शासनातर्फे प्रथमू पुरस्‍कार आणि रौप्‍यपदके.

 

1995– (देवल स्‍मारक मंदिर, सांगली) सं. स्‍वयंवरमधील रूक्‍मीणीच्‍या भूमिकेसाठी गायन, अभि नयाबरोबरच सर्वोत्‍तम कलावंत हा विशेष बहुमान.

 

1996– स्‍वरराज छोटा गंधर्व पुरस्‍कार.

 

1997 – नाट्दर्पण पुरस्‍कार (नाट् संगीतातील विशेष उल्‍लेखनीय कामगरी)

 

2003– संगीतकार राम कदम पुरस्‍कार (उल्‍लेखनीय गायिका)

 

2004– संस्‍कारभारती पुरस्‍कार.

 

2009– समाजशक्‍ती पुरस्‍कार (हरिहरपुत्र भजनसमाज, मुंबई)

   

संगीत दिग्‍दर्शन

   

अडगुलं मडगुलं (फाउन्‍ट - बालगीते)

 

उपासना साधना आराधना (गायत्री परिवार)

 

अध्‍यात्मिक गीत (परमपूज्‍य बापू अनिरूद्ध जोशी)

 

एक मुंगी नेसली लुंगी (कृणाल - बालगीते)

 

चांदसे बाते (प्रायव्‍हेट – देवकी पंडीत)

 

राष्‍ट्रभक्‍तीधारा (शिवप्रतिष्‍ठान)

 

शतजन्‍म शोधिताना (मनसा)

 

आणि इतर

   

कॅसेटस् आणि सीडीज – गायन

 

अभिजीत नाट्संगीत

 

पालखीच्‍या संगे आज

 

श्री गणपती अथर्वशीर्ष

   

विशेष कार्यक्रम -

 

महाराष्‍ट्र, दिल्‍ली, गोवा, गुजरात या ठिकाणी शास्‍त्रीय व सुगमसंगीताचे कार्यक्रम

 

इंग्‍लंड आणि दुबई येथे गायनाचे कार्यक्रम

 

बैठकीची लावणी – गायन (एन.सी.पी.ए. – संकल्‍पना, संगीत – डॉ. अशोक रानडे)

 

देवगाणी – गायन (एन.सी.पी.ए. – संकल्‍पना, संगीत – डॉ. अशोक रानडे)

 

नाट्यसंगीताचे शिल्‍पकार – गायन (संकल्‍पना श्रीकृष्‍ण दळवी)

 

विविध कलामहोत्‍सवात शास्‍त्रीय गायन (महाराष्‍ट्र शासन)

 

दूरदर्शन, आकाशवाणी आणि विविध वाहिन्‍यांवरून गायिका, अभिनेत्री, परिक्षक म्‍हणून सहभाग.

 

नक्षत्रांचे देणे, झी मराठी ‘झिन चॅक झिंग’ (संगीत दिग्‍दर्शन)

 

आणि इतर

   

लेखन

 

लोकसत्‍ता, मुंबई सकाळ आणि विविध अंकातून ललित आणि संगीत विषयक लेखन

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.