Member for

1 year 11 months

विनया खडपेकर या 'राजहंस प्रकाशन'च्या संपादक आहेत. त्यांनी एम ए पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, सकाळ, केसरी, स्त्री, किर्लोस्कर, वाङमय शोभा, कालनिर्णय, रसिक, विवेक या नियतकालिकांत विविध विषयांवर स्फुटलेखन लिहिले आहे. त्यांची 'ज्ञात-अज्ञात अहिल्याबाई होळकर', 'प्रतिसाद', 'एक होती बाय' ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांचा दूरदर्शन आणि आकाशवाणीवरील कार्यक्रमांत सहभाग असतो.