Member for

2 years 2 months

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार, पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. ते महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते पु. ल. म्हणून ओळखले जातात. त्यांनी देवबाप्पा, गुळाचा गणपती, देव पावला इत्यादी असे अनेक चित्रपट त्यांनी केले. रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग एक, भाग दोन ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. बटाट्याची चाळ हे त्यांचे एकपात्री नाटक प्रसिद्ध आहे. ‘तुका म्हणे आता’, ‘एक झुंज वाऱ्याशी’ अशी अनेक नाटके त्यांनी लिहिली.