Member for

3 years 2 months

प्रमोद धुर्वे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कर्डीलेवस्ती येथे मुख्यध्यापक म्हणून कार्यरत आहेत. शिकवण्याची आवड असणारे प्रमोद धुर्वे हे शाळा सर्वांगाने सुंदर व्हावी यासाठी सतत प्रयत्नशील असतात. प्रमोद धुर्वे यांनी २००४ साली त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीची सुरुवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हनुमंत गाव येथे सहशिक्षक या पदाने केली. २००८ साली त्यांची बदली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कर्डीलेवस्ती येथे झाली. शिक्षणक्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना २०१७ साली ‘आसराबाई लोखंडे सेवाभावी संस्था, अहमदनगर’ या संस्थेद्वारे दिला जाणारा ‘आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार’ आणि ‘श्री. संत सावता माळी युवक संघा’च्यावतीने राज्यस्तरीय शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दिला जाणारा ‘संत सावता भूषण पुरस्कार’ हे दोन राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. प्रमोद धुर्वे यांनी केंद्रस्तरावर आणि राज्यस्तरावर शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे.

लेखकाचा दूरध्वनी

7756996060