Member for

3 years 7 months

श्रीकांत कुलकर्णी हे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर. ते पुण्याचे. त्यांनी इंजिनीयर म्हणून सदतीस वर्षे काम करत असताना पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, मशीन ऑटोमेशन आणि सॉफ्टवेअर या क्षेत्रात निर्मिती केली आहे. त्यांनी लेखन छंद वयाच्या पन्नाशीनंतर जाणिवपूर्वक जोपासला. त्यांचा व्यवसायाला सामाजिक जाणिवेचे अधिष्ठान देणा-या व्यक्ती, तसेच सेवाव्रती व्यक्ती व संस्था यांचे योगदान लेखनातून मांडणे हा उद्देश आहे. कुलकर्णी ललित लेख, राजकीय व्यंग, प्रवासवर्णने अशा त-हेच्या लेखनातून व्यक्त होतात. त्यांच्या ‘माझ्या नजरेतून’ या ब्लॉगवर शंभराहून अधिक लेख प्रसिद्ध आहेत. कुलकर्णी यांचे लेखन विविध साप्ताहिकांत, मासिकांत नियमितपणे प्रसिद्ध होत असते. त्यांनी 'थिंक महाराष्ट्र'वर लिहिलेले दोन लेख वेबपोर्टलच्या (महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित - खंड दोन) या ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

98500 35037