Member for

4 years 10 months

प्राध्यापक बाळकृष्ण अंजगावकर हे नाशिककर. त्यांनी एम.ए.बी.एड ची पदवी मिळवली. अंजनगावकर कनिष्‍ठ महाविद्यालय ना.सा.का. पळसे येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. ते लहानपणापासून महानुभाव पंथाशी संलग्‍न आहेत. वयाच्‍या चव्वेचाळीसाव्‍या वर्षापासून त्‍यांनी महानुभाव पंथ समितीमध्ये सह कार्यवाह व अ.भा. महानुभाव परिषदेचे सचिव म्हणून काम केले. त्‍यांनी पंथीयदृष्ट्या तीन वेळा भारतभ्रमण पदयात्राचे आयोजन केले. व्याख्याने दिली. अंजनगावकर यांनी 'ढो-या डोंगर आणि महानुभाव संत', 'भक्तिसुधा', 'आद्य आचार्य श्री नागदेवाचार्य चरित्र आणि कार्य', 'जयकृष्णी पंथी - एक सनातन भक्ति धारा (हिंदी), 'भक्तिरंग', 'महानुभाव पंथ आणि देववाणी मराठीभाषा', 'श्रीदत्तात्रेय प्रभु चरित्र, स्थाने व बाराखोडी, 'भगवान श्री चक्रधर स्वामी इत्यादी ग्रंथलेखन केले आहे. तसेच नासिक, जळगाव, नांदेड, नगर, भंडारा या जिल्ह्यासंबंधी पाच पुस्तकेही लिहिली.

लेखकाचा दूरध्वनी

94235 42773