Member for

4 years 11 months

किरण भावसार हे वडांगळी, ता. सिन्नर (नाशिक) येथील रहिवाशी असून सध्या नोकरीनिमित्त सिन्नर येथे स्थायिक आहेत. त्यांना कथा, कविता, ललित लिखाणाची आवड आहे. त्‍यांची ‘मुळांवरची माती सांभाळताना’ हा कवितासंग्रह, तसेच ‘आठवणींची भरता शाळा’ व ‘शनिखालची चिंच’ या दोन ललित लेखसंग्रहांची ईबुक्स प्रसिद्ध झाली आहेत. त्यांच्या ‘मुळांवरची माती...’ या कवितासंग्रहाला कुसुमाग्रजांच्या पहिल्या कवितासंग्रहाच्या नावाने दिला जाणारा ‘विशाखा’ पुरस्कार, अहमदनगर येथील ‘इतिहास संशोधन मंडळा’च्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ‘कवी अनंत फंदी’ पुरस्कार मिळाला आहे.

भावसारांना सामाजिक कार्याची आवड असून, त्यांनी बारा वर्षे सकाळ, लोकमत आदी दैनिकांतून पत्रकारिता केली आहे. वडांगळीचे ‘दिग्विजय कला, क्रीडा, साहित्य केंद्र’, तसेच गावातील वाचनालयाच्या उभारणीत त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. ते वडांगळीच्या वाचनालयाचे उपाध्यक्ष असून ते सिन्नर येथील ‘मंडळ साहित्य रसास्वाद’, ‘कामगार शक्ती फाउंडेशन’, तर मेंढी गावच्‍या ‘जयहिंद विकास संस्था’ आदी संस्थांशी संलग्न आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

7588833562