Member for

5 years 9 months

विजयकुमार हरिश्चंद्रे हे फोटोग्राफी करतात. त्‍यांना निसर्ग भटकंतीची आवड आहे. ते मंदिर संस्‍कृतीचे अभ्‍यासक आहेत. ते गेल्‍या एकवीस वर्षांपासून खंडोबा विषयावर संशोधन करत आहेत. त्‍यांनी मराठी चित्रपटांसाठी स्टील फोटोग्राफी केली आहे.
हरिश्‍चंद्रे सह्याद्री खो-यात निसर्ग पर्यावरण रक्षणासाठी गेली नऊ वर्ष प्रयत्न करत आहेत. ते निसर्ग पूजेचा पुरस्‍कार करतात. ते अभिनय, पत्रकारिता आणि निवेदन अशा इतर क्षेत्रांतही मुशाफिरी करत असतात. त्‍यांना नाशिक येथील 'कलाभ्रमंती' संस्थेने 'चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके पुरस्कारा'ने सन्मानित केले आहे. तसेच निवेदानाकरता त्‍यांना 'शब्दमित्र पुरस्कारा'ने गौरवण्‍यात आले आहे. त्‍यासोबत त्‍यांना 'शिघ्र कवी शाहीर सगनभाऊ पुरस्कार', सामाजिक सांस्कृतिक व शोध पत्रकारितेसाठी 'सेवा रत्न' अशा इतर पुस्कारांनी त्‍यांचा सन्‍मान करण्‍यात आला आहे.

लेखकाचा दूरध्वनी

9822093048