Member for

5 years 7 months

विनता कुलकर्णी या प्राध्यापक. त्या मास्टर्स आणि डॉक्टरल पदवी अभ्यासक्रमासाठी सांख्यिकी आणि संगणक विज्ञान शिकवतात. त्या भारत व उत्तर अमेरिकेतील काही प्रकाशनांमधून लिहितात. त्या बृहन्महाराष्ट्र मंडळाकडून प्रकाशित होणाऱ्या ‘बीएमएम वृत्त’ (उत्तर अमेरिका) मासिकाच्या संपादक आहेत. त्यांना मराठी आणि इंग्रजी साहित्यामध्ये आवड आहे. त्यांची मराठीमध्ये ‘क्षितिज पश्चिमेचे’ आणि ‘ठसे आठवांचे’ दोन पुस्तके ‘ग्रंथाली’तर्फे प्रकाशित झाली आहेत. तर इतर त्यांनी लिहिलेली चार पुस्तके - तीन शैक्षणिक आणि एक युनिव्हर्सिटी डिग्री लेव्हल फॉर क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स - आहेत. विनता कुलकर्णी यांना समाजसेवेची आवड आहे. त्या महाराष्ट्र मंडळ शिकागो आयएल, अमेरिकन रेड क्रॉस, इलिनॉय चॅप्टर अॅक्टिव्हिटीज, मराठी भाषिक मंडळ, महाराष्ट्र फाऊंडेशन (न्यू जर्सी) या संस्थांच्या कामात सहभागी असतात.