Member for

5 years 11 months

तन्‍मय कानिटकर हे 'ग्रीनअर्थ सोशल डेव्‍हलपमेंट कन्‍सल्टिंग प्रा. लि.' या कंपनीत Governance या विषयाचे तज्ज्ञ आणि सल्‍लागार म्‍हणून कार्यरत आहेत. त्‍यांनी पुणे विद्यापिठांतर्गत डेक्‍कन एज्‍युकेशन सोसायटीच्‍या लॉ कॉलेजमधून BSL ही कायद्याची पदवी मिळवली असून पुणे विद्यापिठाच्‍या 'संज्ञापन अभ्‍यास विभागा'तून Communication Studies या विषयात 'व्हिडीओ प्रॉडक्श्‍ान' हा मुख्‍य विषय घेऊन M.Sc. हे पदव्‍युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. कानिटकर यांनी तीन लघुपटांचे लेखन-दिग्‍दर्शन केले आहे. 'सह्याद्री' वाहिनीवरील कार्यक्रमासाठी त्‍यांनी लेखन-निवेदन केले आहे. शासनव्‍यवस्‍था सुधारण्‍याच्‍या उद्देशाने स्‍थापन झालेल्या 'परिवर्तन' या संस्‍थेचे ते संस्‍थापक विश्‍वस्‍त आणि सचिव आहेत. सामाजिक संस्‍थांमधील संवाद वाढवण्‍यासाठी कार्यरत असलेल्या 'सेतू' या गटाचे ते संस्‍थापक सदस्‍य आणि सचिव. महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेच्‍या 'महाराष्‍ट्राच्‍या विकासच्‍या ब्‍ल्‍यू प्रिंट'मधील Governance या विषयावरील दोन मुख्‍य लेखकांपैकी ते एक होते. त्‍यांनी विविध नियतकालिकांमधून सामाजिक-राजकीय विषयांवर लेखन केले असून त्‍यांचा 'वर्तुळ' हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला आहे.

लेखकाचा दूरध्वनी

9823431138