Member for
6 years 7 monthsअरुण पुराणिक हे 'रिलायन्स' कंपनीतून उपाध्यक्ष पदावरून निवृत्त झाले. ते सध्या 'टाटा पॉवर'मध्ये सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. पुराणिक 1986 सालापासून वर्तमानपत्रे-साप्ताहिके यांमधून सातत्याने लेखन करतात. ते चित्रपट, संगीत, मुंबईतील जुनी स्थळे अशा विविध विषयांचा शोध घेऊन लेखन करतात. त्यांचे दीड हजारांहून अधिक लेख प्रसिद्ध झाले असून 'सरगम', 'अनसंग हिरोज', 'हमारी याद आयेगी', 'मुंबई टॉकिज' अशी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी 'सिनेमाची शंभर वर्षे', 'सिनेमा आणि मुंबई शहर' अशा विषयांवरील फोटो, पोस्टर्स, लॉबी कार्ड, पुस्तीका यांची प्रदर्शने भरवली आहेत.
अरुण पुराणिक यांच्या कुटुंबाला संगीताची पार्श्वभूमी आहे. त्यांचे आजोबा पंढरपूरकर बुवा हे 'गंधर्व नाटक कंपनी'त मुख्य गायक म्हणून कामास होते. त्यांनी अभिनेत्री शांता आपटे यांना शास्त्रीय संगीताचे धडे दिले होते.
9322218653