अफलातून चित्रकार शशिकांत धोत्रे
30/05/2015
शशिकांत धोत्रेवर तयार करण्यात आलेली शोर्ट डॉक्युमेंटरी पहा
चित्र म्हटले म्हणजे कॅनव्हास व वॉटर, अॅक्रलिक किंवा तत्सम रंगांचे माध्यम... मात्र शशिकांत धोत्रे याची गट्टी जमली ती पेन्सिलशी. त्याने पेन्सिलच लहानपणापासून हाती धरल्याने त्याच्या चित्रांचे प्रमुख साधन ते बनले. त्याला वॉटर कलरसारख्या 'नव्या' माध्यमाची ओळख होऊ लागली असली तरी त्याची स्वतःची ओळख कायम झाली ती मात्र, कागद आणि पेन्सिल यांच्यामुळेच. चित्रे काढण्याची त्याची ती शैली कलारसिकांत परिचित आहे. शशिकांतला चित्रकलेची पार्श्वभूमी नाही वा त्याने औपचारिक कलाशिक्षणदेखील घेतलेले नाही. ब्लॅक पेपर व कलर पेन्सिल हाच त्याचा कलाप्राण राहिला आहे.