महाराष्ट्राचे व्हेनिस... नगर, सोळाव्या शतकातील


-headingअहमदनगर शहराला आणि निजामशाहीला मोठे महत्त्व महाराष्ट्राच्या मध्ययुगीन इतिहासात, विशेषत: शिवपूर्वकाळात होते. काही इतिहासकारांनी शिवपूर्वकाळ काळा रंगवला, तर काहींनी त्याकडे लक्षच दिले नाही. तथापि, सोळावे शतक हे निजामशाहीचे मानले जाते. मैलाचे दगड ठरलेल्या अनेक महत्त्वाच्या घटना त्या शतकात अहमदनगरमध्ये घडल्या. नगरच्या खापरी नळ असलेल्या पाणी योजना वैशिष्ट्यपूर्ण होत्या. त्यांचे अवशेष अभ्यासकांना आकर्षित करत असतात...  

शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, पण त्यासाठीची पार्श्वभूमी त्यांचे पिता शहाजीराजे यांनी निजामशाहीत असताना तयार केली. इतिहासकारांनी शहाजीराजे यांचा गौरव ‘स्वराज्य संकल्पक’ म्हणून केला आहे. मराठेशाहीची मुहूर्तमेढ जेथे रोवली गेली आणि मोगलांच्या पतनालाही जेथून सुरूवात झाली, ती आहे अहमदनगरची भूमी!

दक्षिण भारतातील बलाढ्य बहामनी साम्राज्याची पाच शकले उडाली आणि त्यांपैकी एक निजामशाही पंधराव्या शतकाच्या अखेरीस अस्तित्वात आली. अहमदनगर ही निजामशाहीची राजधानी बनली. जवळजवळ सगळा महाराष्ट्र तेव्हा निजामशाहीकडे, म्हणजे अहमदनगरच्या अखत्यारीत होता. सोळाव्या शतकात अहमदनगर हीच जणू काही महाराष्ट्राची निजामशाही राजधानी होती. 

फ्लोरा फाउंटन मुंबई फोर्टचे वास्तुवैभव


-flora-fountainफ्लोरा फाउंटन या शिल्पाकृतीचे समाजमनातील स्थान दीडशे वर्षें कायम आहे. त्याचे ‘हुतात्मा चौक’ असे नामकरण साठ वर्षांपूर्वी झाले. तरी तो चौक फ्लोरा फाउंटन या नावानेच ओळखला जातो. त्याची निर्मिती करण्यामागे धारणा काय होती? सत्ताधारी ब्रिटिश अधिकारी, त्यांची कुटुंबे आणि अन्य नागरिक त्यांच्या मायभूमीपासून हजारो मैल दूरवर वेगळ्या संस्कृतीच्या देशात वावरत होते. त्यांना त्यांच्या मातृभूमीची याद येणे स्वाभाविक होते. त्याच भावनेने मुंबईतील बऱ्याच वास्तू, शिल्पाकृती यांची निर्मिती मूळ ब्रिटिश वास्तूंच्या धर्तीवर झाली. फ्लोरा फाउंटनची निर्मिती इंग्लंडच्या प्रख्यात, सुशोभित ‘पिकॅडली सर्कस’च्या धर्तीवर असावी असे वाटते. त्यामुळे ब्रिटिश नागरिक आणि त्यांचे परिवार यांना ते विरंगुळ्याचे आकर्षक स्थळ ठरले.

भद्रावती (Bhadravati) गोपाल शिरपूरकर 28/03/2019

भद्रावती हे ठिकाण वर्धा नदीच्या खोऱ्यात वसले आहे. ते तालुक्याचे शहर आहे. ते चंद्रपूर या जिल्ह्याच्या ठिकाणावरून सव्वीस किलोमीटर अंतरावर येते. त्या ठिकाणाला तेथील अनेक पुरातन वास्तूंमुळे प्रसिद्धी मिळाली. शिवाय, ऑर्डनन्स फॅक्टरी या शस्त्रास्त्रनिर्मितीच्या कारखान्यामुळे वेगळी नवी ओळख निर्माण झाली. तेथील लोकसंख्या आहे साठ हजार पाचशे पासष्ट. व्यवस्थापन नगरपरिषदेकडे आहे. ठिकाणाच्या चतु:सीमेला पूर्वेला ताडोबा जंगल, पश्चिमेला देऊरवाडा, उत्तरेला बरांज, वरोरा आणि दक्षिणेकडे लोणारा, चंद्रपूर ही गावे. भद्रावती हे ठिकाण ‘भांदक’ ह्या नावानेही ओळखले जाते. ते मध्यरेल्वे मार्गावर आहे. रेल्वेस्टेशन ‘भांदक’ या नावाने जास्त परिचयाचे आहे.

भद्रावती नागपूर-चंद्रपूर या राज्य महामार्गावर (264) आहे. त्यामुळे दळणवळण दोन्ही मार्गांनी सुलभ आहे.

पैसचा खांब - ज्ञानोबांचे प्रतीक!


_Paisacha_Khamb_1.jpgसंत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे जन्मस्थान व त्यांच्या अलौकिक कार्याचे प्रतीक म्हणजे पैसाचा खांब होय. त्या खांबालाच ‘पैस’, ‘पैसचा खांब’ किंवा ‘ज्ञानोबाचा खांब’ असे म्हणतात.

'पैसचा खांब' अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. ते स्थळ नेवासे गावाच्या पश्चिमेला आहे. ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' त्या खांबाला टेकून बसून लिहिली असे समजतात. ज्ञानदेवांनी त्या स्थळाचे वर्णन ‘त्रिभूवनैक पवित्र | अनादी पंचक्रोश क्षेत्र | जेथे जगाचे जीवनसूत्र | श्री महालया असे ||’ असे केले आहे.

गढी वास्तू : संरजामी व्यवस्थेतील प्रशासन केंद्र


_GadhiVaastu_PrachinSaranjamiPrashasan_2.jpgसाम्राज्यांची, राजसत्तांची संस्कृती आणि त्यांचे धार्मिक अधिष्ठान असलेल्या ज्या अनेक प्रकारच्या वास्तू इतिहासक्रमात निर्माण झाल्या, त्यांत विविधतेबरोबर कलात्मकताही आहे. त्यात अभेद्य तटबंदीच्या गडकोटांचा हिस्सा फार मोठा आहे व त्यांचा उल्लेख वारंवार होत असतो. ते गडकोट म्हणजे त्यावेळच्या संरक्षण व्यवस्थेचा कणाच आहे. पण ‘गढी’ हा वास्तुप्रकार अधिसत्तेच्या नियंत्रणाखालील स्थानिक प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याकरता निर्माण झाला. ‘गढी’ वास्तू म्हणजे सपाट भूमी आणि पहाडावरील स्थानिक प्रशासन व्यवस्था सांभाळणारे सत्ताकेंद्र. सत्तेच्या विकेंद्रीकरणाची ती प्राथमिक अवस्था होय. गढ्या त्यांचे अस्तित्व मराठवाडा, खानदेश या प्रदेशांत टिकवून आहेत. गढ्या राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरातमधील सौराष्ट्र-कच्छ या भागांत तर जास्त आढळतात. ‘मिर्च मसाला’ या चित्रपटात गढी वास्तूमधील समाजजीवनाचे चित्रण होते.

इतिहासापासून अश्मयुगापर्यंतचा वारसा...


शांतिलाल पुरवार यांचा आगळा संग्रह

_Itihasapasun_Ashmayugaparyantcha_1.jpgऔरंगाबादचा पुरवार कुटुंबियांचा वंशपरंपरागत वाडा हा घर कमी आणि संग्रहालय जास्त भासतो. दहा पिढ्या नांदलेल्या त्या घरामध्ये औरंगाबाद जिल्ह्याचा आणि त्याहूनही मोठ्या पातळीवर सतरा हजार वस्तूंचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यात आला आहे. त्या वारशाचा संबंध काही दशकां-शतकांपूर्वीच्या वस्तूंसोबत आहेच, पण काही संदर्भ थेट हजारो वर्षांपूर्वीच्या आदिमानवापर्यंतदेखील जाऊन भिडतात- औरंगजेबाने लिहिलेल्या ‘कुराण-ए-शरीफ’पासून अश्मयुगीन मानवाच्या अंगठ्याचा ठसा असलेल्या दिव्यापर्यंत... 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' गावागावांत दडलेला असा सांस्कृतिक वारसा नोंदवण्याचा प्रयत्न करत आहे.

औरंगाबाद येथील छंदवेडे व ध्येयवेडे डॉ. शांतिलाल पुरवार यांनी दुर्मीळ वस्तूंच्या संग्रहासाठी आयुष्य वेचले. त्यांनी स्वखर्चाने एकेक ऐतिहासिक वस्तूचा संग्रह केला. त्यांचे देहावसान काही वर्षांपूर्वी झाले, परंतु त्यांचे चिरंजीव श्रीप्रकाश पुरवार आणि त्यांचे दोन भाऊ हे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून वडिलांचा वारसा समर्पित भावनेने जपत आहेत.

भुईंजकर जाधव – ऐतिहासिक घराणे


सिंदखेडकर लुकजी (लखोजी) जाधव यांच्या घराण्याचे वंशज पुणे-सातारा महामार्गावर कृष्णाकाठी वसलेल्या भुईंज या गावी राहतात. लुकजीराजे निजामशहाकडे पाच हजारी मनसबदार होते. त्यांच्या कर्तबगारीच्या जोरावर पुढे त्यांना दहा हजारी मनसबदारी, अठ्ठावीस महाल व बावन्न चावड्यांचे वतन मिळाले. त्यामुळे त्यांना निजामशाहीत मोठे महत्त्व प्राप्त झाले. अकबराने निजामशाहीवर आक्रमणे केली (१५९४ ते १६००), त्यावेळी चाँदबीबीने त्यास यशस्वी तोंड दिले, ते जाधवरावांच्या सहकार्यामुळेच. चाँदबीबीचा खून झाल्यावर, निजामशाही अस्तंगत होत असताना, ती वाचवण्यासाठी, मुर्तजा नावाच्या वारसास परिंडा येथे तख्तावर बसवण्याचा जो प्रयत्न झाला, त्यात जाधवरावांचा हात होता. निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न करणा-या जाधवरावांची पुढे मुला-नातवांसह निजामशहाकडूनच हत्या झाली! त्यानंतर जाधव कुटुंबातील काहीजण स्थलांतरित झाले. त्यांतील खंडोजीराव हे पुत्र भुईंज येथे वास्तव्यास आले. जाधवांचे ते घराणे भुईंज येथे नांदत आहे.

सोलापूर महापालिकेची देखणी इमारत प्रमोद शेंडे 30/06/2015

जगभरातील सर्वोत्कृष्ट स्थापत्य पद्धतीचा वापर करण्यात आलेली देखणी इमारत ‘इंद्रभुवन’! उद्योजक मल्लप्पा ऊर्फ आप्पासाहेब वारद यांनी सोलापूर शहराच्या सुवर्णवैभवी काळाची साक्ष देणारी ती इमारत 1899 साली बांधण्यास सुरुवात केली. तिचे बांधकाम तेरा वर्षे चालले. त्यांच्या कायमस्वरुपी वास्तव्यासाठी व्हिक्टोरियन स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेली ती इमारत (नव्हे महालच) बांधली. त्यांना त्या बांधकामासाठी साडेचार लाख रुपये खर्च आला. त्यांनी जगभर दौरे करून त्या इमारतीसाठी सुबक व आकर्षक वस्तू आणल्या; जगभरातील अत्याधुनिक बांधकाम साहित्यही वापरले. जगातील विविध स्थापत्यकलांच्या मिश्रणातून तो प्रासाद साकारला गेला आहे. ती इमारत इ.स. 1912 साली पूर्णत्वास आली, पण त्याआधी 1911 साली आप्पासाहेब वारद यांना मृत्यू आला व त्या भव्य महालात त्यांना राहता आले नाही. वारद कुटुंबीय त्या ‘इंद्रभुवन’मध्ये राहू लागले. त्यांना नंतरही वारद कुटुंबीयांना आणखी दोन लाख खर्च आला. नंतर ती शासनाने ताब्यात घेतली.

आर्यन चित्रमंदिर - पुण्यातील पहिले चित्रपटगृह

प्रतिनिधी 20/05/2015

'आर्यन चित्रमंदिर' हे पुण्यातील पहिले चित्रपटगृह. त्याचे संस्थापक होते, गंगाधर नरहरी ऊर्फ बापुसाहेब पाठक. ते चित्रपटगृह महात्मा फुले मंडई परिसरात लोकमान्य टिळक पुतळ्यासमोर होते. महापालिकेने ते 22 सप्टेंबर 1983 रोजी पाडले व तेथे पार्किंग स्टँड उभारले. कारण ती जागा महापालिकेची होती. त्याचा शतकमहोत्सवी समारंभ बापुसाहेबांचे चिरंजीव आनंदराव पाठक यांनी पुण्यातील फिल्म अर्काईव्हजच्या दालनात साजरा केला. 'आर्यन' 1915 मध्ये सुरू झाले, तेव्हा तेथे मूकपट दाखवले जात होते. मूकपटांतील दृश्यात जिवंतपणा यावा यासाठी पडद्यामागे बाजाची पेटी, तबला, घोड्याच्या पळतानाच्या टापांचा आवाज वाटावा म्हणून नारळाच्या रिकाम्या करवंट्या वाजवल्या जात. पेटी, तबला वाजवण्याचे काम करणा-या मुलांमध्ये राजा परांजपे यांचा समावेश होता. पुढे ते विख्यात दिग्दर्शक झाले.