मेळघाटातील पोषणबागांचा माळी - मनोहर खके
24/02/2015
पोषण बागेद्वारे कुपोषणावर मात करण्याचा अनोखा प्रयोग
मेळघाटातील कुपोषण हटवण्याच्या व तेथील जनतेच्या विकासाच्या कार्याला आपापल्यापरीने दिशा देण्याचे काम व्यक्तीगत पातळीवर काही लोकांनी केले आहे. त्यात पुण्यातील कृषितज्ज्ञ डॉ. मनोहर खके यांचा अनोखा शेती प्रयोग उल्लेखनीय आहे.
विदर्भातील मेळघाट हा परिसर गेली कित्येक वर्षे गाजतोय तो तेथील कुपोषणाच्या समस्येमुळे. कुपोषणाचा संबंध नेहमी आरोग्य व गरीबीशी तसेच साधनांच्या अभावाशी जोडला जातो. पण मेळघाटात त्या जोडीला इतरही अनेक समस्या असल्याने हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे.