‘थिंक महाराष्ट्र’साठी तालुका प्रतिनिधी

प्रतिनिधी 27/12/2018

_Maharashtra_Pratinidhi_1.jpg‘थिंक महाराष्ट्र’ने माहिती संकलनाला चालना देण्याच्या दृष्टीने एमकेसीएलच्या सहकार्याने तालुका प्रतिनिधी नेमण्याचे योजले आहे. तालुका प्रतिनिधीला त्याच्या तालुक्यातील माहिती गोळा करून देण्याचे काम करावे लागेल. माहिती त्यांनीच लिहिली पाहिजे असे नाही, परंतु लेखन/छायाचित्रे/व्हिडिओफिती असे अभिलेखनाचे साहित्य मिळवून देणे महत्त्वाचे. तालुका प्रतिनिधींना त्यांची नियुक्ती झाल्यास महिना तीन हजार रुपये मानधन देणे शक्य होईल. इच्छुकांनी त्यांची माहिती info@thinkmaharashtra.com या ई-मेलवर पाठवावी. त्यापूर्वी ‘थिंक महाराष्ट्र’चे वेबपोर्टल पाहून घ्यावे. www.thinkmaharashtra.com म्हणजे कामाच्या स्वरूपाचा अंदाज येईल.

1. सुधारित योजना १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ या बारा महिन्यांच्या कालावधीत राबवली जाईल.

2. दहा तालुक्यांमध्ये हा प्रयत्न करून पाहुया. दहा तालुक्यांत प्रत्येकी एक याप्रमाणे दहा प्रतिनिधी नेमले जातील.

सोलापूर जिल्हा संस्कृतिवेधचे साफल्य‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या माहिती संकलनासाठी 10 डिसेंबर ते 21 डिसेंबर अशी बारा दिवसांची मोहीम संपवून ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ची टीम सोमवारी, 22 डिसेंबरला सकाळी मुंबईत परतली. त्याच सुमारास, गावोगावचे टीममधील भिडूदेखील त्यांच्या त्यांच्या गावी गेले.

बारा दिवसांचा हा दौरा यशस्वी रीत्या संपला. तालुक्या तालुक्यातील माहिती संकलन बऱ्या प्रमाणात झाले आहे. ते अजून त्या त्या भिडूकडे आहे. त्याला पूर्णाकार देऊन, नंतर ते वेगवेगळ्या विभागात पोर्टलवर येत्या एप्रिलपासून प्रसिद्ध केले जाईल. त्याच बरोबर, त्यातील महत्त्वाचे लेख एकत्र करून साधारण पाच-सात महिन्यांत ग्रंथरूपाने प्रसिद्ध करण्याचा बेत आहे. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ने ‘महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित’ हा वर्ष-दीड वर्षांपूर्वी प्रकाशित केलेला ग्रंथ पाहण्या-वाचण्यात आला असेल तर जिल्ह्या जिल्ह्यातील असा ठेवा ग्रंथरूपाने उपलब्ध होण्याचे मोल कळू शकेल. टीममधील भिडूंकडील जमा माहितीमध्ये लेखी मजकुराबरोबरच ध्वनिचित्रफिती आणि छायाचित्रे चांगल्या प्रमाणात आहेत.