गोविंद काणेगावकर १९६९ साली लंडनला आले. एफ.आर.सी.एस. झाले, घशाच्या कॅन्सरचे तज्ज्ञ बनले. त्यांनी सुमारे पंचवीस हजार शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यांच्या रुग्णालयाने ते राष्ट्रीय आरोग्य योजनेतून निवृत्त होत असताना, त्यांना त्यांच्या कारकिर्दीतील यशस्वी टप्प्याचा उल्लेख असलेली स्मरणिका भेट म्हणून दिली. हा मोठा सन्मान मानला जातो. त्याचबरोबर, त्यांच्याकडून निवृत्तीनंतरही आठवड्यातून तीन दिवस - बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार - रुग्णालयात येण्याचे वचन घेतले. स्थानिक वृत्तपत्राने त्यांचा ‘उत्कृष्ट डॉक्टर’ असा गौरव केला. त्यांचा आणि त्यांच्या डॉक्टर पत्नीचा ‘महाराष्ट्र मंडळ, लंडन’च्या वाटचालीत सक्रिय सहभाग असतो. त्यांनी मंडळाला २०१३ साली गोल्डन बाँड चॅरिटी मॅरेथॉन स्पर्धेमधून दोन हजार पौंड देणगी मिळवून दिली!
डॉ. गोविंद काणेगावकर - मराठीचा लंडनमधील आधार
आदिनाथ हरवंदे
28/04/2014