गिरीश अभ्यंकर - मजेत राहणारा माणूस!
ज्याला त्याला, प्रत्येकाला अन्न कसं आवडतं आणि ते कसं शिजवायचं आहे हे ठरवण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे ही गिरीश अभ्यंकरांची मूळ भूमिका. एक मशीन केलं आणि त्याच्या हजारोंनी प्रती बनवल्या अशी भानगड नाही. ज्याची त्याची (शारीरिक!) उंची, ज्याची त्याची जागा, ज्याची त्याची सर्व सोय बघून ज्याचं त्याला सर्व करता येईल अशी रचना हवी.
तशी चूल त्यांनी तयार केलेली आहे. ती त्यांच्या मित्राच्या वर्कशॉपमध्ये घडलेली आहे. ते म्हणतात, तशी चूल बघून माझ्याकडे येणारी माणसं विचारतात, की ती कुठे मिळते? कोण बनवून देतं? यावर मला उत्तर द्यावं लागतं, की ती चूल बनवण्याचा कारखाना नाही. उद्या जर मला आणखी एक चूल बनवावीशी वाटली तर ती माझी मलाच बनवता येणं अपेक्षित आहे. इंधन आणि जाळ यांचं तत्व समजलं, ज्याला त्याला उभं राहून काम करायचं आहे असं ठरलं, की मग पुढची गोष्ट ज्याची त्यानं करायची आहे.