तरोटा (टाकळा) च्या संकटाचे संधीत रुपांतर! (Casia tora trouble Transforming into opportunity) i
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत तरोटा/टाकळा (casia tora) या वनस्पतीने धुमाकूळ घातला आहे. ती वनस्पती एक प्रकारचे तण (weed) आहे. ती स्थानिकच आहे. ती मध्य भारतात प्रामुख्याने आढळते. ती भाजी टायकळा किंवा टाकळा या नावाने महाराष्ट्राच्या काही भागांत खासकरून कोकणात ओळखली जाते. ती भाजी साधारण एक ते दोन फुटांपर्यंत उंच वाढते. त्याला पिवळसर रंगांची फुले येतात. पाने द्विलिंगी (उभयलिंगी पुष्प) - (एकलिंगी पुष्पात फक्त एक प्रकारचेच प्रजनन अंग असते. त्यामध्ये पुंकेसर किंवा अंडप असते. जर केवळ पुंकेसर असेल तर ते फूल नर म्हणून ओळखले जाईल, तर फक्त अंडपचे (carpel) अस्तित्व असेल तर ते फूल मादी होय. परंतु, द्विलिंगी म्हणजेच उभयलिंगी पुष्पात नर आणि मादी अशा दोन्ही प्रकारच्या प्रजननाचे अंग असते. त्या पुष्पामध्ये पुंकेसर आणि कारपेल अशा दोन्ही प्रकारच्या प्रजननाचे अस्तित्व असते.) ती फुले रात्रीच्या वेळी मिटतात. पाने लांबट- गोल किंवा अंडाकृती-आयताकृती आकाराची असतात. टाकळ्याला काळसर किंवा करड्या रंगाच्या शेंगा असून त्यांचे टोक आडवे कापल्यासारखे असते. मात्र, ते कठीण आवरणाचे असते. वनस्पतीचा वास उग्र असतो.