पुकार - तरुण संशोधकांना सुवर्णसंधी


Pukar‘‘पुकार युवा पाठ्यवृत्तीच्या माध्यमातून संशोधन करणे हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा अनुभव ठरला. कारण इथे फक्त अकॅडमिक रिसर्च करायचा नव्हता, तर गटाला बरोबर घेऊन सहभागाने संशोधन करायचे होते. अकॅडमिक रिसर्चच्या अनेक चौकटी मोडून त्याजागी नवे स्ट्रक्चर उभे करण्याच्या प्रवासात खूप मजा आली. खूप काही मिळाल्यासारखे वाटले. लोकशाही आणि सहभाग ही तत्त्वे सांभाळताना उडालेली धांदल गंमतीशीर होती. या प्रक्रियेत अनेक बरेवाईट अनुभव आले. पण ते आयुष्याला वळण देणारे होते.’’ - पल्लवी शिंदे.
 

‘‘एकट्याने चालणे जितके सोपे असते, तितकेच सर्वांना बरोबर घेऊन चालणे कठीण असते. युवा पाठ्यवृत्तीमध्ये काम करताना जाणवले, की एकट्याने चालणे सोपे असेलही, पण सगळ्यांनी मिळून प्रवास करण्यात एक वेगळीच मजा आहे.’ - मनोज टांक
 

‘‘पुकारच्या युवा पाठ्यवृत्तीसोबत दोन संशोधन प्रकल्पांत काम करण्याची संधी मिळाली. पहिल्या वर्षी युवा संशोधक आणि दुस-या वर्षी मुख्य संशोधक म्हणून काम केले. त्या काळात टेबलाच्या एका बाजूने या प्रकल्पांकडे बघण्याची संधी मिळाली. आता युवा पाठ्यवृत्ती समन्वयक म्हणून दुस-यांची प्रोसेस अधिक मजेदार व्हावी यासाठी प्रयत्न करतोय. हे काम जितके जबाबदारीचे तितकेच स्वत:चा दृष्टिकोन आणि समज विस्तारणारे असे आहे.’’ - कपिल चव्हाण