कल्याणच्या तटबंदीचे अवशेष
शिवाजी महाराजांनी सागरी सत्तेचा पाया प्रथम कल्याण बंदरात १६५८ मध्ये घातला. त्या बंदराला कल्याणची खाडी म्हणून ओळखले जाते, पण कल्याण पूर्वी प्रसिद्ध होते ते, बंदर आणि बाजारपेठ म्हणून. मुसलमान राजवट आणि पेशवे राजवट कल्याणात असताना मुस्लिम वाडे, हिंदू वाडे, धार्मिक स्थळे (मंदिर, मशिदी) विहिरी, तळी; तसेच, ब्रिटिश राजवटीत चर्च अशा वास्तू बांधल्या गेल्या. तोच आज कल्याणचा ऐतिहासिक वारसा ठरलेला आहे. त्यात एक विशेष म्हणजे संपूर्ण कल्याणला तटबंदी बांधण्यात आली होती. परकीय आक्रमणांपासून गावाचे संरक्षण हाच तटबंदीचा हेतू होता. तटबंदीचा काहीसा भाग अस्तित्वात आहे. मात्र तोही दुर्लक्षित आहे. ना पालिकेचे, ना नागरिकांचे त्या वारसावस्तूबद्दल कुतूहल आहे.